पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान महामहिम प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्याशी संवाद साधत त्यांचे वडील सर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
अनेक वर्षे पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोन्ही पदावर कार्य करताना सर अनिरुद्ध यांच्या मॉरिशसमधील दीर्घ सार्वजनिक जीवनाचे स्मरण पंतप्रधानांनी केले.
सर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या प्रति भारताचा मनापासून आदर अधोरेखित करताना, सर्वच राजकीय पक्षांसह मॉरीशसशी असलेल्या भारताच्या अतिशय खास मैत्रीच्या विकासात त्यांनी निभावलेल्या भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
त्यांना अभिमानी अनिवासी भारतीय म्हणून संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, अनिवासी भारतीय सन्मान आणि पद्मविभूषण या दोन पुरस्कारांनी सर अनिरुद्ध यांचा सन्मान करण्याचा बहुमान भारताला मिळाला आहे.
सर अनिरुद्ध यांचा वारसा पुढे कायम ठेवण्याच्या दृष्टीने त्यांच्या स्मरणार्थ द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि सक्षम करण्यासाठी उभय नेत्यांनी स्वतःला वचनबद्ध केले.


