It is wonderful how Daman has become a mini-India. People from all over the country live and work here: PM
I congratulate the people and local administration for making this place ODF. This is a big step: PM
The Government is taking several steps for the welfare of fishermen, says PM Modi
Our entire emphasis on the 'blue revolution' is inspired by the commitment to bring a positive difference in the lives of fishermen: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दमण आणि दिवमध्ये 1 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी विविध कार्यक्रमांच्या लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप केले तसेच दमण महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेला संबोधित केले.

 

दमण मधली जाहीर सभा ही ऐतिहासिक घटना असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी उपस्थित राहिलेल्या लोकांच्या प्रचंड संख्येमुळेच नव्हे, तर इथे शुभारंभ झालेल्या विकास प्रकल्पांमुळेही घटना ऐतिहासिक आहे, असे ते म्हणाले.

दमणच्या लोकांनी स्वच्छतेला सर्वोच्च महत्व द्यावे असे आवाहन करत पंतप्रधानांनी स्वच्छताअसेल, तिथे पर्यटनाच्या संधी वाढतात, असे स्पष्ट केले. उघड्यावर शौच करण्यापासून दमण मुक्त केल्याबद्दल पंतप्रधानांनी स्थानिक जनता आणि स्थानिक प्रशासनाचे अभिनंदन केले. ई-रिक्षांचा आणि सीएनजीचा वापर अशा माध्यमातून दमणने स्वच्छतेचा लोक चळवळ म्हणून केलेला स्वीकार हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

दमणच्या सर्वसमावेशक संस्कृतीचा उल्लेख करुन दमण हा मिनी-भारत झाला असून, देशभरातून आलेले लोक इथे वास्तव्य करतात आणि काम करतात, या शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केले. मच्छीमारांच्या कल्याणासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, असे ते म्हणाले, आणि मच्छीमारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या कटीबद्धतेमुळे नील क्रांतीची प्रेरणा मिळाली असून नील क्रांतीवर आपला भर असल्याचे ते म्हणाले.

उडान योजनेअंतर्गत एअर ओदिशाच्या अहमदाबाद-दिव उड्डाणाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. दमण ते दिव दरम्यानच्या पवन हंस हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभही पंतप्रधानांनी व्हिडीओ लिंक द्वारे केला.

पंतप्रधानांनी नवजात बालिकांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अंतर्गत ‘बधाई कीट’चे वाटप केले. दमण-दिव प्रशासनातर्फे वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आलेल्या महिलांना त्यांनी प्रमाणापत्र दिली तसेच शालेय विद्यार्थिनींना सायकल प्रदान केल्या. सीएनजी वाहनांसाठीचे परवानेही पंतप्रधानांनी वितरीत केली. प्रधानमंत्री शहरी आणि ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या लाभधारकांना पंतप्रधानांनी प्रमाणपत्रांचे वाटप केले. तसेच त्यांनी ई-रिक्षा, पहली सवारी आणि रुग्णवाहिकांनाही हिरवा झेंडा दाखवला.

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways clears ₹755-crore project to build third line between Champa and Korba

Media Coverage

Indian Railways clears ₹755-crore project to build third line between Champa and Korba
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 जून 2026
June 17, 2026

PM Narendra Modi's Dual Legacy: Commanding Global Respect While Delivering Health Miracles, Rail Revolution & Digital Leadership