PM Modi interacts with with NCC Cadets, NSS Volunteers and Tableaux Artists

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आलेल्या राष्ट्रीय छात्र सेना, एनएसएसचे छात्र, आदिवासी अतिथी आणि टॅब्लो कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

तीन मूर्ती इथे एनसीसी छात्रांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी भारताच्या विविधतेविषयी बोलण्याबरोबरच युवक, देशात परिवर्तन घडवून आणू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.

एकमेकांकडून शिकण्यासारखे खूप असते, असे सांगुन आपल्या भोवतालचे बदल स्वीकारणे महत्वाचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

देशाच्या सशस्त्र दलाचा देशाला अभिमान आहे. देशाची सेवा करणाऱ्या शुरवीरांविषयी अधिक जाणून घ्यायला हवे.

देशासाठी प्राणांचे बलिदान देणारे अनेक पोलीस आहेत, त्यांच्या बलिदानाविषयी जाणुन घेणे महत्वाचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

स्वच्छतेचे महत्वही पंतप्रधानांनी विषद केले. महात्मा गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात 10 देशांचे नेते सहभागी होणार असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Marvell to invest $250 million, double India workforce in 3 years

Media Coverage

Marvell to invest $250 million, double India workforce in 3 years
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 जुलै 2026
July 30, 2026

Aatmanirbhar in Action: How PM Modi Turned Vision into Export Multipliers & Safer Rails