PM Modi inaugurates various urban development projects at the Madhya Pradesh Shehari Vikas Mahotsav in Indore
PM Modi felicitates the winners of Swachh Survekshan 2018 & give awards to the representatives of Indore, Bhopal & Chandigarh – the top three cleanest cities
In the past 4 years we have built more than 8 crore 30 thousand toilets: PM Modi in Indore #SwachhBharat
Our Govt is working on 5 big plans for cities, these plans include #SwachhBharat, #AwasYojana, Smart City Mission, #AmrutYojana & Deendayal National Urban Livelihood Mission: PM Modi
Our dream of #SwachhBharat for Gandhi Ji's 150th birth anniversary is now on the verge of becoming a reality: PM Modi in Indore

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातील विविध ठिकाणी नागरी विकास प्रकल्पाचे उदघाटन केले. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, शहरी पेयजल पुरवठा योजना, शहरी घनकचरा व्यवस्थापन, शहरी स्वच्छता, शहरी वाहतूक व शहरी लँडस्केप प्रकल्प या योजनांचा समावेश आहे.

इंदोर येथे एका कार्यक्रमात त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण -2018 पुरस्कार ही वितरीत केले आणि स्वच्छ सर्वेक्षण -2018 च्या निकालाच्या डॅशबोर्डची सुरुवात केली.

या प्रसंगी एका मोठ्या समारंभास संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, ‘स्वच्छ भारत’ हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते आणि आता तो 125 कोटी भारतीयांचे संकल्प बनला असल्याचे ही ते म्हणाले. संपूर्ण देश इंदोर शहराकडून स्वच्छतेची प्रेरणा घेऊ शकेल, ज्याला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी झारखंड, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या देशाच्या तीन शहरांचे देखील उत्कृष्ठ स्वच्छतेसाठी कौतुक केले.

त्यांनी देशातील विविध राज्यांनी स्वच्छतेत केलेल्या प्रगती बद्दल माहिती सांगितली. पुढील वर्षी आपल्या 150 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींचे हे स्वप्न सत्यात उतरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतामध्ये शहरी पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार कशाप्रकारे काम करत आहे, या संबंधी पंतप्रधान बोलत होते. स्वच्छ भारत अभियाना व्यतिरिक्त, त्यांनी प्रधान मंत्री आवास योजना (शहरी), स्मार्ट सिटी मिशन, एएमआरयूटी, आणि दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय शहरी जीविका मिशनचा उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी नूतन रायपूरमध्ये भारताच्या पहिल्या स्मार्ट सिटीमध्ये एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटरचे उद्घाटन त्यांनी केले होते. मध्यप्रदेशातील सात शहरांमध्येही अशीच कार्यवाही सुरू आहे, असेही ते म्हणाले.

मध्यप्रदेशमधील विविध नागरी विकास उपक्रमात प्रगती करण्याच्या प्रक्रियेबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज उद्घाटन गृहनिर्माण प्रकल्प माध्यमातून, एक लाख पेक्षा अधिक बेघर लोकांना मध्य प्रदेशात स्वत:चे घर मिळाले आहे.

भारत सरकार वर्ष 2022 पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून काम करत आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत जवळजवळ 1.15 कोटी घरे बांधण्यात आली आहेत आणि 2 कोटी पेक्षा अधिक घरे निर्मिती प्रक्रियेत आहेत जे वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण करण्याच्या लक्ष्यांतर्गत आहेत.ते पुढे म्हणाले की, प्रधान मंत्री गृह योजनाही रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरणाचे साधन बनत आहे.

पंतप्रधानांनी विकासाच्या इतर क्षेत्रातील प्रगती विषयी माहिती सांगितले.

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Merchandise Exports Defy Global Headwinds, Rise 15 Per Cent In April–14 June Period

Media Coverage

India's Merchandise Exports Defy Global Headwinds, Rise 15 Per Cent In April–14 June Period
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the passing of Smt. Bhavnaben Patel
June 22, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed sadness over the passing of Smt. Bhavnaben Patel, wife of Shri Prabhulbhai Patel, Administrator of the Union Territory of Dadra and Nagar Haveli and Daman and Diu.

The Prime Minister said that he had shared a close acquaintance and cordial relationship with the family for many years.

Shri Modi extended his heartfelt condolences to the bereaved family and prayed that the Almighty grants peace to the departed soul.

The Prime Minister wrote on X;