शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या केवडिया येथे तंत्रज्ञान प्रदर्शन स्थळाचे उद्‌घाटन केले.

प्राणघातक शस्त्रांसह इतर शस्त्रांबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन घडवणारे पोलीस आणि अर्धसैनिक दलांचे विविध स्टॉल्स येथे आहेत.

हवाई सुरक्षा, सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण, डिजिटल उपक्रम यासारख्या संकल्पनांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार सीआयएसएफ, सीआरपीएफ, बीएसएफ, एनएसजी आणि विविध राज्यांच्या पोलीस दलांनी घडवला.

विमानतळावर जलद आणि प्रभावीपणे चेहरा ओळखणाऱ्या प्रणालीची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याची संकल्पना सीआयएसएफने सादर केली तर एनएसजीने सुरक्षा संच, आधुनिक हत्यारं आणि रिमोट कंट्रोलद्वारे चालणारी वाहनं आणि उपकरणं सादर केली. 

 गृह मंत्रालयाने 112 हा सर्व आपात्कालीन परिस्थितीतल्या सेवेसाठीचा क्रमांक प्रामुख्याने दर्शवला.

सीआरपीएफने आपल्या जवानांना मिळालेली शौर्य पदकं आणि सन्मान तसेच 1939 पासूनच्या पराक्रमाची गाथा, युद्ध यांची समग्र गाथा सादर केली.

गुजरात पोलिसांच्या प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली. यामध्ये विश्वास प्रकल्प आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार दर्शवण्यात आला. दिल्ली पोलिसांनी डिजिटल उपक्रम ठळकपणे मांडले तर जम्मू काश्मीर पोलिसांनी सुरक्षिततेची खातरजमा करण्यासाठी उपयोगात येणारी सुरक्षा वाहने प्रदर्शनात ठेवली.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Over 28,300 artisans and 1.49 lakh weavers registered on the GeM portal

Media Coverage

Over 28,300 artisans and 1.49 lakh weavers registered on the GeM portal
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
September 20, 2021
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांची भेट घेतली. उभय देशांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या धोरणात्मक भागीदारी परिषदेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांसह , सध्या सुरु असलेल्या विविध द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

भारतात उर्जा,माहिती तंत्रज्ञान,संरक्षण उत्पादन यासह महत्वाच्या इतर क्षेत्रामध्ये  सौदी अरेबियाकडून मोठ्या  गुंतवणूकीची अपेक्षा  पंतप्रधानांनी व्यक्त केली.

अफगाणीस्तानमधल्या परिस्थितीसह प्रादेशिक घडामोडींवर या बैठकीत विचारांचे आदान-प्रदान करण्यात आले.

कोविड -19 महामारीच्या काळात सौदी अरेबियामधल्या भारतीय समुदायाच्या कल्याणाची काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी, सौदी अरेबियाचे विशेष आभार मानत प्रशंसा केली.

सौदी अरेबियाचे राजे आणि युवराज  यांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.