वक्फ (सुधारणा)  विधेयक व मुसलमान वक्फ (निरसन) विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे हा ऐतिहासिक निर्णय असून  हे सामाजिक आर्थिक न्याय , पारदर्शिता व सर्वसमावेशक प्रगतीसाठी चाललेल्या आपल्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेले  यश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे स्वागत केले आहे.  

एक्स वर लिहिलेल्या त्यांच्या पोस्ट साखळीत त्यांनी म्हटले ,

“वक्फ ( सुधारणा ) विधेयक व मुसलमान वक्फ (निरसन) विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे हा ऐतिहासिक निर्णय असून  हे सामाजिक-आर्थिक न्याय , पारदर्शिता व सर्वसमावेशक प्रगतीसाठी चाललेल्या आपल्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेले  यश आहे. अनेक वर्षे ज्यांना केवळ आपले मत मांडण्याची संधी नसल्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होता येत नव्हते, त्यांना यामुळे मोठी मदत होणार आहे.”

“संसदीय तसेच समितीच्या चर्चेत सहभागी होऊन स्वतःचे दृष्टिकोन मांडून या कायद्यांना अधिक बळकट बनवणाऱ्या  सदस्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करीत आहे. संसदीय समितीकडे आपल्या अमूल्य  सूचना पाठवणाऱ्या  देशभरातील अगणित नागरिकांना विशेष धन्यवाद. व्यापक चर्चा व संवादाचे महत्व यातून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.”

“अनेक दशकांपासून वक्फ प्रणालीतील अपारदर्शकता व उत्तरदायित्वाचा अभाव दिसून येत होता. यामुळे मुस्लिम महिला, गरीब मुस्लिम व पसमांदा मुस्लिमांच्या हितांना बाधा येत होती. संसदेत मंजूर झालेल्या या कायद्यांमुळे पारदर्शकता वाढेल व लोकांच्या हक्कांचे रक्षण होईल.”

“आता आपण अशा एका पर्वात प्रवेश करत आहोत, जिथे संरचना आधुनिक व सामाजिक न्यायानुरूप असेल. देशातील  प्रत्येक नागरिकाच्या जीवनाची प्रतिष्ठा सर्वोपरी राखण्यास आपण वचनबद्ध आहोत. याच प्रकारे आपण एक अधिक बळकट, अधिक सर्वसमावेशक व अधिक अनुकंपा असलेल्या  भारताची  निर्मिती करत आहोत.” 

 

“संसद के दोनों सदनों से वक्फ (संशोधन) विधेयक और मुसलमान वक्फ (निरसन) विधेयक का पारित होना देश के लिए एक ऐतिहासिक क्षण है। यह सामाजिक-आर्थिक न्याय, पारदर्शिता और समावेशी विकास की हमारी सामूहिक प्रतिबद्धता को सामने लाता है। यह विशेष रूप से उन लोगों के लिए फायदेमंद होगा, जो लंबे समय से हाशिये पर रहे हैं, जिनकी आवाज अनसुनी रही और जिन्हें अवसरों से वंचित रहना पड़ा है।”

“उन सभी सांसदों का हृदय से आभार, जिन्होंने संसद और कमेटी की चर्चाओं में हिस्सा लिया और अपने विचार रखे। इन चर्चाओं ने विधेयक को और सशक्त बनाने का काम किया है। इस अवसर पर संसदीय समिति को अपना बहुमूल्य सुझाव भेजने वाले अनगिनत लोगों का भी मैं विशेष रूप से आभार व्यक्त करना चाहता हूं। इससे एक बार फिर यह पता चलता है कि व्यापक बहस और संवाद कितना महत्वपूर्ण होता है।”

“दशकों से वक्फ व्यवस्था में पारदर्शिता और जवाबदेही की कमी नजर आ रही थी। इससे मुख्य रूप से हमारी मुस्लिम माताओं-बहनों, गरीब और पसमांदा मुसलमान भाई-बहनों के हितों को बहुत नुकसान हो रहा था। अब संसद द्वारा पारित विधेयक पारदर्शिता को बढ़ाने के साथ-साथ लोगों के अधिकारों की रक्षा में भी मददगार बनेगा।”

“इसके साथ ही हम एक ऐसे युग में प्रवेश करेंगे, जो आज के समय के अनुरूप होने के साथ ही सामाजिक न्याय को लेकर प्रतिबद्ध होगा। देश के हर नागरिक की गरिमा को प्राथमिकता मिले, इसके लिए हम संकल्पबद्ध हैं। यह मार्ग ज्यादा सशक्त, समावेशी और संवेदनशील भारत के निर्माण में काफी महत्वपूर्ण होने वाला है।”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's services exports rise by 12.7 pc in April despite West Asia crisis: RBI

Media Coverage

India's services exports rise by 12.7 pc in April despite West Asia crisis: RBI
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 मे 2026
May 30, 2026

Viksit Bharat in Motion: How PM Modi is Building a Self-Reliant Global India”