PM Modi takes to twitter, wishes Indian Women’s Cricket Team for the finals
As our women's cricket team plays the World Cup finals today, I join 125 crore Indians in wishing them the very best: PM Modi
PM Modi wishes every player of Indian Women’s cricket team individually on Twitter

विश्व चषक स्पर्धेच्या आजच्या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या.

“आपला भारतीय महिला क्रिकेट संघ आज विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे, 125 कोटी भारतीयांसोबत मी त्यांना शुभेच्छा देतो.

कर्णधार मिथाली राज संघाचे उत्तम नेतृत्व करत आहे. तिचा खेळाप्रती असलेला शांत दृष्टिकोण संपूर्ण संघाला नक्कीच मदत करेल.

स्‍मृती मंधानाला शुभेच्छा. शांत आणि संयमी खेळी खेळ.

महिला विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पूनम राऊतला भारताकडून शुभेच्छा. तिच्या खेळावर सर्वांना अभिमान आहे.

हरमनप्रित कौरचे कोण चाहते नाहीत ? उपांत्य फेरीतील तिचा खेळ सगळयांच्याच लक्षात आहे. आज तू तुझा सर्वोत्तम खेळ खेळ.

अंतिम फेरीसाठी दिप्ती शर्माला शुभेच्‍छा. तिने संघाला अफाट महत्व प्राप्‍त करुन दिले आहे आणि तिच्या खेळामुळे अनेक सामन्यांचा निकाल बदलला आहे.

अनुभवी वेद कृष्णमुर्ती मधल्या फळीसाठी खूप आवश्यक स्थिरता देते. आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा.

सुषमा वर्मा यष्टीरक्षकाची महत्वपूर्ण भूमिका बजावते. लक्षात ठेवा, झेल सामने जिंकून देतात.

झुलन गोस्वामी हा भारताचा अभिमान आहे. तिच्या अद्‌भूत गोलंदाजीने महत्वपूर्ण परिस्थितींमध्ये संघाला मदत केली आहे. झुलन तुला शुभेच्छा.

शिखा पांडेची चौफेर कामगिरी संघासाठी निर्णायक आहे. शुभेच्छा.

पूनम यादवची उत्कृष्ट गोलंदाजी सर्वोत्तम फलंदाजीसाठी देखील अगदीच घातक ठरु शकेल. हार्दिक शुभेच्छा. राजेश्वरी गायकवाड तिच्या गोलंदाजीसाठी प्रसिध्द आहे. शुभेच्छा. असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's forex reserves hit all-time high of $729.33 billion after $12.42 billion jump

Media Coverage

India's forex reserves hit all-time high of $729.33 billion after $12.42 billion jump
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 ऑगस्ट 2026
August 29, 2026

New India, New Speed, New Stage: Missiles, Medals, Multilateralism under PM Modi