पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दिल्लीच्या गोकुळपुरी भागात आग लागल्यामुळे झालेल्या जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“दिल्लीच्या गोकुळपुरी भागात अग्नितांडवामुळे घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेत ज्या व्यक्तींनी जीव गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देव त्यांना देवो हीच प्रार्थना.”
दिल्ली के गोकुलपुरी में अग्निकांड से हुआ हादसा हृदयविदारक है। इस हादसे में जिन लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है, उनके परिजनों के प्रति मैं गहरी संवेदना प्रकट करता हूं। ईश्वर उन्हें इस अपार दुख को सहने की शक्ति प्रदान करे।
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2022


