पुण्यातील एका कारखान्यास लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना भरपाईपोटी मदतीची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे.
"महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यास लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती शोकभावना." असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
या आगीत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून' दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे.
Pained by the loss of lives due to a fire at a factory in Pune, Maharashtra. Condolences to the bereaved families.
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2021


