फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत मिश्र सांघिक कंपाऊंड खुल्या तिरंदाजीमध्ये कांस्य पदक जिंकून शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक भावनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर  पोस्ट केले:
 "सांघिक कामगिरीचा विजय! 

मिश्र सांघिक कंपाऊंड खुल्या तिरंदाजीमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि राकेश कुमार यांचे अभिनंदन.  त्यांनी उल्लेखनीय कौशल्य आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन केले. या पराक्रमामुळे संपूर्ण भारत आनंदी झाला आहे.  #Cheer4Bharat"