मध्य प्रदेशातील सतना येथे प्रधानमंत्री घरकूल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 4.51 लाख लाभार्थींचा गृहप्रवेश धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर होणार आहे. दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या ‘गृह प्रवेशम’ कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
देशातील प्रत्येक नागरिकाला सर्व मूलभूत सुविधांसह स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सतना येथे बांधण्यात आलेली घरकुले म्हणजे, या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत, मध्य प्रदेशात आतापर्यंत सुमारे 38 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत आणि सुमारे 29 लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यासाठी 35,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे.


