दोन्ही नेत्यांनी भारत आणि नेदरलँडमधील विश्वासाची आणि मोलाची भागीदारी अधोरेखित केली
द्विपक्षीय भागीदारी आणखी पुढे नेत अधिक मजबूत करण्याच्या उपायांवर दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा

नेदरलँडचे पंतप्रधान डिक शूफ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि नेदरलँड दरम्यानची विश्वासाची आणि मोलाची भागीदारी अधोरेखित केली, जी सामायिक मूल्ये आणि लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावरील विश्वासावर आधारित आहे. पाणी, कृषी, आरोग्य या क्षेत्रांमधील सध्याचे सहकार्य आणखी वाढवण्याच्या उपायांवर त्यांनी चर्चा केली. व्यापार, संरक्षण, सुरक्षा, नवोन्मेष, हरित हायड्रोजन आणि सेमीकंडक्टर, यासह विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यावर, तसेच त्याला धोरणात्मक आयाम प्रदान करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. परस्परांच्या नागरिकांमध्ये दृढ संबंध प्रस्थापित करण्यावर आणि शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात आदान प्रदान करण्यावर त्यांनी भर दिला.

दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली आणि शांतता, सुरक्षा सहकार्य आणि स्थैर्य वाढवण्यासाठी काम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्यावर सहमती दर्शवली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
EV retail sales expand in January, with gains across PVs and two-wheelers

Media Coverage

EV retail sales expand in January, with gains across PVs and two-wheelers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to Maharshi Dayanand Saraswati ji
February 12, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi paid tributes to Maharshi Dayanand Saraswati ji on his birth anniversary, today. Shri Modi stated that he made unparalleled contributions not only in promoting education but also in enriching Indian culture and tradition. "His efforts for social reform will continue to serve as a source of inspiration for the people of the country", Shri Modi added.

The Prime Minister posted on X:

"मां भारती की सेवा में आजीवन समर्पित रहे महर्षि दयानंद सरस्वती जी को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। उन्होंने शिक्षा को बढ़ावा देने के साथ-साथ भारतीय संस्कृति और परंपरा की समृद्धि के लिए अतुलनीय योगदान दिया। सामाजिक सुधार के उनके प्रयास देशवासियों के लिए प्रेरणापुंज बने रहेंगे।"