केनटुस्कीचे राज्यपाल मॅट बेव्हीन यांनी आज पंतप्रधानांची गांधीनगर येथे भेट घेतली. पंतप्रधानांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील एककेंद्राभिमुखतेवर तसेच भारत- अमेरिकी दरम्यान धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर जोर दिला.
त्यांनी अमेरिकन कंपन्यांकडून भारतात निर्मिती क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचे स्वागत केले आणि अमेरिकन कंपन्यांना भारताच्या ‘मेक इन इंडिया’ मध्ये अन्वेषण संधी प्राप्त करून देण्यासंदर्भात सांगितले.
राज्यपालांनी केनटुस्की आणि भारत दरम्यान, व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ झाल्यासंदर्भात पंतप्रधानांना अवगत केले. त्यांनी भारतीय व्यवसायिकांच्या अमेरिका आणि केनटुस्कीसाठी दिलेल्या योगदानाचे स्वागत केले.