अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाचे अध्यक्ष जॉन चेंबर्स यांनी आज गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी त्यांच्या या पूर्वीच्या भेटीचे स्मरण केले आणि भारत-अमेरिका दरम्यान वाढत्या द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांचे स्वागत केले. भारत आणि अमेरिका दरम्यान वाढती भागीदारी तसेच धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारतातील उत्पादन क्षेत्रात अमेरिकेकडून वाढत्या गुंतवणुकीचे त्यांनी स्वागत केले आणि ‘मेक इन इंडिया’ साठी संभाव्य संधींचा लाभ घेण्यासाठी अमेरिकन कंपन्यांना निमंत्रित केले.


