भारत 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याची तयारी करत असून यानिमित्ताने भरड धान्यापासून केलेल्या पदार्थांचा समावेश असलेल्या दुपारच्या भोजनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य नेत्यांनी संसद भवनात आस्वाद घेतला.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आपण 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याची तयारी करत असून, आज दुपारी संसद भवनात उत्कृष्ट भोजनाला उपस्थित राहिलो. यावेळी भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ वाढण्यात येत होते. सर्व पक्षांचे सदस्य यात सहभागी झालेले पाहून आनंद झाला."
As we prepare to mark 2023 as the International Year of Millets, attended a sumptuous lunch in Parliament where millet dishes were served. Good to see participation from across party lines. pic.twitter.com/PjU1mQh0F3
— Narendra Modi (@narendramodi) December 20, 2022






