उद्घाटन:
1. 1020 मेगावॅट पुनात्सांगछु-II जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन - भारत सरकार आणि भूतान सरकार यांच्यातील द्विपक्षीय करारांतर्गत या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
घोषणा:
2. 1200 मेगावॅट पुनात्सांगछु- I जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य धरण रचनेवरील काम पुन्हा सुरू करण्याबाबत सहमती .
3. वाराणसीमध्ये भूतानी मंदिर/बौद्ध मठ आणि अतिथीगृह बांधण्यासाठी भूखंड देण्याची घोषणा
4. हतिसार (गेलेफूच्या पलिकडे) येथे इमिग्रेशन चेक पोस्ट स्थापन करण्याचा निर्णय
5. भूतानला 4000 कोटी रुपयांची कर्जसाहाय्याची (एलओसी) घोषणा
सामंजस्य करार (एमओयू):
|
अनुक्रमांक |
सामंजस्य कराराचे नाव |
वर्णन |
भूतानकडून स्वाक्षरीकर्ता |
भारताकडून स्वाक्षरीकर्ता |
|
6. |
नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रातील सहकार्य संदर्भात सामंजस्य करार | या कराराद्वारे दोन्ही देशातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य संस्थात्मक करण्याचा उद्देश आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास, ऊर्जा साठवणूक, हरित हायड्रोजन तसेच या क्षेत्रातील क्षमता वृद्धी यावर एकत्रितपणे काम करण्याचा हेतू आहे. | ल्योनपो जेम शेरिंग, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने मंत्री, भूतान सरकार | प्रल्हाद व्यंकटेश जोशी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री, भारत सरकार |
|
7. |
आरोग्य आणि वैद्यक क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार | या कराराद्वारे दोन्ही देशांमधील आरोग्य क्षेत्रातील सहकार्य संस्थात्मक करण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये औषधे, निदान उपकरणे, मातृ आरोग्य; संसर्गजन्य/असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध आणि उपचार; पारंपरिक औषधशास्त्र; टेलिमेडिसिनसह डिजिटल आरोग्य उपाय; तसेच तांत्रिक सहकार्य, संयुक्त संशोधन आणि आरोग्य व्यावसायिकांचे प्रशिक्षण यांचा समावेश आहे. | पेम्बा वांगचुक, सचिव, आरोग्य मंत्रालय, भूतान सरकार | संदीप आर्य, भूतानमधील भारताचे राजदूत |
|
8. |
भूतानचे पेमा सचिवालय आणि भारतातील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरो सायन्सेस संस्था (निमहांस) यांच्यात संस्थात्मक सहकार्य निर्माण करण्याबाबत सामंजस्य करार | या करारामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांच्या क्षमतावृद्धीसाठी तसेच देशांतर्गत मानसिक आरोग्य अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी, संशोधन आणि सेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही संस्थांमधील भागीदारी मजबूत होईल. | देचेन वांगमो, प्रमुख, पेमा सचिवालय, भूतान | संदीप आर्य, भूतानमधील भारताचे राजदूत |


