सामंजस्य करार आणि करार
स्थलांतर आणि दोन्ही देशांदरम्यान प्रवासः
एका देशाच्या नागरिकांच्या दुसऱ्या देशाच्या भूभागातील तात्पुरत्या कामगार कामकाजासाठी भारत सरकार आणि रशियाचे सरकार यांच्यातील करार
अवैध स्थलांतराविरोधात सहकार्य करण्याबद्दल भारत सरकार आणि रशियाचे सरकार यांच्यातील करार
आरोग्य आणि अन्न सुरक्षाः
आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि विज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबद्दल भारतीय प्रजासत्ताकाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि रशियन महासंघाचे आरोग्य मंत्रालय यांच्यातील करार
अन्न सुरक्षेच्या क्षेत्रात भारतीय प्रजासत्ताकाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण व ग्राहक हक्क संरक्षण आणि मानवी कल्याणासाठीची संनिरीक्षण फेडरल सेवा यांच्यातील करार
सागरी सहकार्य आणि ध्रुवीय जलः
ध्रुवीय जलामध्ये संचार करणाऱ्या जहाजांसाठी तज्ञांना प्रशिक्षण देण्याबद्दल भारत सरकारचे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि रशियन महासंघाचे परिवहन मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार
भारतीय प्रजासत्ताकाचे बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि रशियन महासंघाचे सागरी मंडळ यांच्यातील सामंजस्य करार
खते:
मेसर्स जेएससी उरलकेम आणि मेसर्स राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड तसेच नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड आणि इंडियन पोटॅश लिमिटेड यांच्यातील सामंजस्य करार
सीमाशुल्क आणि वाणिज्य:
भारतीय प्रजासत्ताक सरकारचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ आणि फेडरल सीमाशुल्क सेवा यांच्यातील, भारतीय प्रजासत्ताक आणि रशियन महासंघादरम्यान ने-आण केल्या जाणाऱ्या वस्तू आणि वाहनांच्या संदर्भात 'आगमनापूर्वीची माहिती' देवाणघेवाण करण्याच्या सहकार्यासाठीचा प्रोटोकॉल
भारतीय प्रजासत्ताकाच्या संचार मंत्रालयाचा टपाल विभाग आणि जेएससी "रशियन पोस्ट" यांच्यातील द्विपक्षीय करार
शैक्षणिक सहकार्य
संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे आणि फेडरल स्टेट ऑटोनॉमस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन "नॅशनल टोम्स्क स्टेट युनिव्हर्सिटी", टोम्स्क यांच्यातील वैज्ञानिक आणि शैक्षणिक सहकार्याबाबतचा सामंजस्य करार
मुंबई विद्यापीठ, लोमोनोसोव्ह मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीआणि जॉइंट-स्टॉक कंपनी मॅनेजमेंट कंपनी ऑफ रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यातील सहकार्याबाबतचा करार
प्रसारमाध्यम सहकार्य
प्रसार भारती, भारत आणि जॉइंट स्टॉक कंपनी गॅझप्रॉम-मीडिया होल्डिंग, रशियन महासंघ यांच्यातील प्रक्षेपणविषयक सहकार्य आणि समन्वयासाठी सामंजस्य करार
प्रसार भारती, भारत आणि नॅशनल मीडिया ग्रुप, रशिया यांच्यातील प्रक्षेपणावरील सहकार्य आणि समन्वयासाठी सामंजस्य करार
प्रसार भारती, भारत आणि बिग एशिया मीडिया ग्रुप यांच्यातील प्रक्षेपणविषयक सहकार्य आणि समन्वयासाठी सामंजस्य करार
प्रसार भारती, भारत, आणि एएनओ "टीव्ही-नोवोस्ती" यांच्यातील प्रक्षेपणाविषयक सहकार्य आणि समन्वयासाठी सामंजस्य कराराला पूरक कलमे
टीव्ही ब्रिक्स" जॉइंट-स्टॉक कंपनी आणि "प्रसार भारती " यांच्यातील सामंजस्य करार
घोषणा
भारत - रशिया आर्थिक सहकार्याच्या धोरणात्मक क्षेत्रांच्या विकासासाठी 2030 पर्यंतचा कार्यक्रम
इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (IBCA) मध्ये सामील होण्यासाठी रशियन बाजूने फ्रेमवर्क कराराचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नॅशनल क्राफ्ट्स म्युझियम आणि हस्तकला अकादमी (नवी दिल्ली, भारत) आणि झारित्सिनो स्टेट हिस्टोरिकल, आर्किटेक्चरल, आर्ट अँड लँडस्केप म्युझियम-रिझर्व्ह (मॉस्को, रशिया) यांच्यातील "इंडिया: फॅब्रिक ऑफ टाईम" या प्रदर्शनासाठीचा करार
रेसिप्रोकल पद्धतीने रशियन नागरिकांना 30 दिवसांचा ई-पर्यटन व्हिसा मोफत (gratis basis) प्रदान करणे.
रशियन नागरिकांना समूह पर्यटन व्हिसा मोफत (gratis basis) प्रदान करणे.


