1. विकास सहाय्य

अ. क्र.

शीर्षक

1.

सेशेल्स सरकारला एक जलदगती गस्ती नौका भेट म्हणून देणे

2.

सेशेल्स संरक्षण दलाकडे 10 बहुउपयोगी वाहने (युटिलिटी वाहने) आणि लेझर रेडियल क्लासच्या नौकांचे संच सुपूर्द करणे

3.

सेशेल्स सरकारकडे रुग्णवाहिका सुपूर्द करणे

4.

सेशेल्स सरकारकडे 500 मेट्रिक टन तांदूळ सुपूर्द करणे

5.

सेशेल्स सरकारकडे 8500 मेट्रिक टन सिमेंट सुपूर्द करणे

२. घोषणा

अ. क्र.

शीर्षक

1.

भारत आणि सेशेल्स यांच्यातील 50 वर्षांच्या राजनैतिक संबंधांनिमित्त स्मृती बोधचिन्हाचे अनावरण

2.

व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण केंद्रदूरदृष्य पद्धतीने भूमीपूजन

3.

सेशेल्स कोस्ट गार्डसाठी 'पीएस जोरोएस्टरची दुरुस्ती आणि आधुनिकीकरण यशस्वीरित्या पूर्ण

4.

डॉर्नियर विमानाचे 'ग्लास कॉकपिट'सह आधुनिकीकरण

5.

'आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची आघाडीमध्येसेशेल्स सहभागी

3. सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या / नूतनीकरण (

अ. क्र.

शीर्षक

संक्षिप्त वर्णन

1.

सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस (SSIFS) आणि सेशेल्सचे परराष्ट्र व्यवहार आणि अनिवासी समुदाय मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार

हा करार देवाणघेवाणप्रशिक्षण कार्यक्रम आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून दोन्ही संस्थांमधील सहकार्याला सक्षम करेल.

2.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि सेशेल्सची मध्यवर्ती बँक यांच्यातील सामंजस्य करार

हा करार सेशेल्समध्ये 'यूपीआयडिजिटल पेमेंट पायाभूत सुविधा लागू करण्यास सुलभता आणेल आणि पेमेंट क्षेत्रात व्यापक सहकार्याच्या संधी शोधेल.

3.

मेसर्स एचएलएल लाईफकेअर लिमिटेड आणि सेशेल्सचे आरोग्य मंत्रालय यांच्यात 'जनऔषधी योजने'अंतर्गत झालेला करार

हा करार जनऔषधी योजनेअंतर्गत भारतातून सेशेल्सला परवडणारी जेनेरिक औषधे आणि वैद्यकीय साहित्याची निर्यात करण्यास मदत करेल.

 

 

4.

कृषी संशोधन आणि शिक्षण यांच्यातील सहकार्यासाठी, भारतातील, कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि सेशेल्सचा कृषी विभाग, मत्स्यव्यवसाय, कृषी आणि नील अर्थव्यवस्था मंत्रालय यांच्यादरम्यान सामंजस्य करार आणि 2026-2031 या कालवधीसाठी कृती आराखडा.

आयसीएआर आणि सेशेल्स कृषी विभाग यांच्या दरम्यान संयुक्त संशोधन, प्रशिक्षण आणि तांत्रिक अभ्यास या क्षेत्रांतील निकट सहकार्य विकसित करणे, त्याला चालना देणे आणि ते गतिमान करणे हा सामंजस्य करार आणि कृती आराखड्याचा उद्देश आहे.

5.

भारत आणि सेशेल्स यांच्यादरम्यान प्रत्यर्पण करार

 

या कराराचा उद्देश सीमापार गुन्हेगारीला तोंड देण्याबाबतचे द्विपक्षीय सहकार्य बळकट करणे आणि दोन्ही देशांमधील फरारी गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठीची कायदेशीर चौकट अधिक सक्षम करणे.

6.

सेशेल्सचे वाहतूक, बंदरे आणि नागरी उड्डाण मंत्रालय आणि भारताच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय यांच्यादरम्यान सेशेल्सच्या ध्वजधारी जहाजांवरील सेवेसाठी खलाशांचे प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण याला मान्यता देण्याबाबतचा सामंजस्य करार.

सामंजस्य करारामुळे सेशेल्सच्या ध्वजधारी जहाजांवरील सेवेसाठी भारतीय खलाशांच्या प्रशिक्षण आणि प्रमाणीकरणाला मान्यता देणे सुलभ होणार आहे.

7.

सेशेल्स सरकार आणि भारतीय आयात-निर्यात बँक यांच्यातील अम्ब्रेला लाइन ऑफ क्रेडिट अॅग्रीमेंट करार.

 

विशेष आर्थिक सहकार्याअंतर्गत (एसईपी) प्रकल्पांच्या अंमलबजावणीला पाठिंबा देणे हा कराराचा उद्देश आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांच्या भेटीदरम्यान हे सहकार्य जाहीर करण्यात आले होते आणि त्याचा मागचा उद्देश सेशेल्समधील प्राधान्यक्रमाच्या पायाभूत सुविधा आणि विकास उपक्रमांना चालना देणे असा होता.

8.

भारत आणि सेशेल्स सरकार यांच्यादरम्यान शांतता उद्देशांसाठी बाह्य अंतराळाचा शोध आणि त्याचा वापर यांच्यातील सहकार्याबाबत सामंजस्य करार.

 

या सामंजस्य कराराचा उद्देश उपग्रह उपयोजन, अंतराळ तंत्रज्ञान आणि क्षमता बांधणी या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करणे असा आहे.

9

भारत आणि सेशेल्स सरकार यांच्यादरम्यान, नवीन सेशेल्स राष्ट्रीय रुग्णालयाच्या प्राथमिक तयारीसाठी सामंजस्य करार.

 

या सामंजस्य करारामुळे नवीन सेशेल्स राष्ट्रीय रुग्णालयाच्या विकासासाठी द्विपक्षीय सहकार्याचा आराखडा निश्चित करता येईल.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12

Media Coverage

Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 ऑगस्ट 2026
August 12, 2026

India Rising on Every Front: Economic Strength, Global Recognition & Self-Reliance Under PM Modi’s Vision