भारत - भूतान उपग्रह, भूतानच्या जनतेशी असलेल्या आमच्या विशेष संबंधांचा दाखला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. संयुक्तपणे विकसित केलेल्या या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मोदी यांनी भूतानच्या माहिती आणि दूरसंवाद विभाग(डीआयटीटी) आणि इस्रोची प्रशंसा केली आहे. भारत -भूतान उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल भूतानच्या राजांनी पाठवलेला संदेश प्रदर्शित करत भूतानच्या पंतप्रधानांनी केलेल्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले,
"भारत - भूतान उपग्रह, भूतानच्या जनतेशी असलेल्या आमच्या विशेष संबंधांचा दाखला आहे. संयुक्तपणे विकसित केलेल्या या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी @dittbhutan आणि @isro यांचे कौतुक करतो.”
India Bhutan Satellite is a testament to our special relationship with the people of Bhutan. I commend @dittbhutan and @isro on the successful launch of this jointly developed satellite. @PMBhutan https://t.co/bWbFgRVLkp
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2022


