दिल्लीमधील काल्काजी भागात ‘ जहा झुग्गी वही मकान’ योजने अंतर्गत पक्की घरे देण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामुळे आपल्याला अतिशय आनंद झाला असून आपण भारावून गेलो असल्याचे ट्वीट केले आहे. या भागाला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भेट दिल्यावर या महिलांनी त्यांच्याकडे आपण लिहिलेली पत्रं सोपवली. या लाभार्थी महिलांनी आपली स्वप्ने साकार करण्यासाठी मदत केल्याबद्दल आणि या योजनेच्या माध्यमातून आपले जीवन सुकर केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
गरिबांच्या कल्याणासाठी काम करत राहण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे.
"दिल्लीच्या कालकाजी भागात ‘ जहा झुग्गी वही मकान’ योजने अंतर्गत पक्की घरे मिळालेल्या त्या माता भगिनींची पत्रं मिळाल्यानंतर अतिशय भारावून गेलो आहे. परराष्ट्रमंत्री @DrSJaishankar जी जेव्हा तेथे गेले त्यावेळी या महिलांनी ही पत्रं त्यांच्याकडे सोपवली, ज्यामध्ये त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. त्या सांगतात की या योजनेमुळे कशा प्रकारे त्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले आणि संपूर्ण कुटुंबाचे जीवन सुकर झाले. या पत्रांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार! आमचे सरकार गरीबांच्या कल्याणासाठी अशाच प्रकारे वचनबद्ध होऊन काम करत राहील."
दिल्ली के कालकाजी की उन माताओं और बहनों के पत्रों को पाकर अभिभूत हूं, जिन्हें ‘जहां झुग्गी वहीं मकान’ स्कीम के तहत पक्के घर मिले हैं। विदेश मंत्री @DrSJaishankar जी जब वहां गए तो महिलाओं ने ये पत्र उन्हें सौंपे, जिनमें उन्होंने अपनी खुशी जाहिर की है। वे बताती हैं कि कैसे इस स्कीम… pic.twitter.com/M1nOtV3Phj
— Narendra Modi (@narendramodi) August 4, 2023


