पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अफगाणिस्तानसंदर्भातल्या जी 20 विशेष शिखर परिषदेत दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.जी -20 चे विद्यमान अध्यक्ष असणाऱ्या इटलीने ही बैठक आयोजित केली होती. इटलीचे पंतप्रधान मारीओ द्रागी या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी होते. अफगाणिस्तान मधली मानवविषयक परिस्थिती, दहशतवादाबाबत चिंता आणि मानवाधिकार या संदर्भात बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.

अफगाणीस्तानमधल्या सध्याच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यासाठी इटलीने घेतलेल्या पुढाकाराचे पंतप्रधानांनी स्वागत केले. भारत आणि अफगाणीस्तान यांच्या जनतेमध्ये शतकांपासून असलेल्या संबंधांचा त्यांनी उल्लेख केला. गेल्या दोन दशकांमध्ये अफगाणीस्तानमध्ये सामाजिक-आर्थिक विकासाला चालना, युवक आणि महिलांसाठी क्षमता वृद्धी यामध्ये भारताने योगदान दिले आहे. अफगाणीस्तानमध्ये  500 पेक्षा जास्त विकास प्रकल्पांची भारताने अंमलबजावणी केल्याचे स्मरण त्यांनी केले.

अफगाणी जनतेला भारतासाठी मित्रत्वाची भावना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. उपासमार आणि कुपोषणाचा सामना करणाऱ्या अफगाणी जनतेच्या वेदना प्रत्येक भारतीयाला जाणवतात. अफगाणीस्तानला मानवतेच्या दृष्टीकोनातून तातडीने आणि विनाव्यत्यय मदत आंतरराष्ट्रीय समुदायाने सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.

क्षेत्रीय आणि जागतिक स्तरावर अफगाण क्षेत्र कट्टरता आणि दहशतवाद यांचा स्त्रोत होऊ नये हे सुनिश्चित करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. कट्टरतावाद, दहशतवाद, शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांची तस्करी यांच्यातल्या संबंधा विरोधातल्या संयुक्त लढा व्यापक करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी भर दिला.

अफगाणीस्तानमधल्या गेल्या 20 वर्षातल्या सामाजिक-आर्थिक लाभांचे जतन करण्यासाठी आणि कट्टरतावादी मानसिकतेचा प्रसार रोखण्यासाठी, महिला आणि अल्पसंख्याक यांचा समावेश असलेले समावेशक प्रशासनाचे आवाहन पंतप्रधानांनी केले. अफगाणीस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी त्यांनी आपला पाठींबा दर्शवला आणि  अफगाणीस्तानबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव 2593 मधल्या संदेशासाठी जी-20 च्या नव्याने समर्थनाचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजुटीने आंतरराष्ट्रीय प्रतिसादाचे आवाहन त्यांनी केले, याविना अफगाणीस्तानमधल्या सद्य स्थितीत बदल घडवणे कठीण होईल.    

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Small towns emerge big growth driver for connected TV in India

Media Coverage

Small towns emerge big growth driver for connected TV in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates H.E. President Hakainde Hichilema on re-election as President of Zambia
August 20, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has extended his heartiest congratulations to President H.E. Hakainde Hichilema on his re-election as the President of Zambia.

The Prime Minister said that India greatly values its multifaceted partnership with Zambia.

Shri Modi expressed his desire to work together with President Hakainde Hichilema to further strengthen the relations between India and Zambia under his leadership.

The Prime Minister said in a X post;

“Heartiest Congratulations to President Hakainde Hichilema on being re-elected as the President of Zambia.

India greatly values its multifaceted partnership with Zambia and I look forward to working together to further strengthen our relations under his leadership.

@HHichilema”