प्रशासक

Published By : Admin | May 15, 2014 | 16:18 IST

 

भारतीय जनता पार्टीमधले कुशल संघटक ते उत्तम प्रशासक असा नरेंद्र मोदी यांचा झालेला प्रवास ही त्यांच्या ध्येयासक्ती आणि दृढनिश्चयातून केलेल्या परिश्रमाची कथा आहे. 

admin-namo-in1

सात आक्टोबर २००१ ला नरेंद्र मोदी यांचा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला . एक राजकीय कार्यकर्ता आणि संघटक यापासून ते एक प्रशासक म्हणून असे स्थित्यंतर त्यांना लगेचच करावे लागले, आणि राज्याचा कारभार चालवताना त्यांना स्वतःला एक उत्तम प्रशासक म्हणून प्रशिक्षित करण्याची संधी मिळाली. मोदींना प्रशासकीय मुद्द्यांना गती द्यायची होती, भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना कामा करायचे होते आणि पहिल्या दिवसापासून राजकीयदृष्ट्या अतिशय वाईट परिस्थिती असताना त्याच्याशी सामना करायचा होता. त्याकाळात तर त्यांच्या पक्षातले सहकारी सुद्धा त्याना उपरे आणि प्रशासनाचा अनुभव नसल्याने नवखे समजत होते. मात्र त्यांनी या प्रत्येक आव्हानाचा समर्थपणे सामना केला.

admin-namo-in2

पहिले शंभर दिवस

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता आपल्याला कळते की त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतांनाच, त्यांनी प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी अनेक अनवट मार्ग चोखाळले. भाजपाची गुजरातमध्ये झालेली जैसे थे परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी अनेक अभिनव कल्पना राबवायला सुरुवात केली. याचा शंभर दिवसात कच्छ भागातल्या भूकंपग्रस्तांची मदत आणि पुनर्वसन त्वरीत व्हावे यासाठी त्यांनी प्रशासकांसोबत काम करून लालफितीच्या विलंबाचा कारभार बंद केला, मदतीच्या प्रक्रिया सुलभ केल्या.  

या १०० दिवसात आपल्याला नरेंद्र मोदींच्या तत्वांचीही ओळख होते- अवास्तव खर्चांना कात्री लावा, एक उत्तम श्रोता व्हा आणि उत्तम विद्यार्थी व्हा, हे मोदींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. तसेच सर्वसामावेशक मूल्यव्यवस्थेवरचा त्यांचा विश्वासही याकाळात दिसून आला. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आणि ज्या गावात एकमताने निर्णय घेतले जातील अशा गावांना विकासासाठी अधिक निधी देण्याची योजना सुरु केली.

शेवटी सांगायचे झाल्यास,त्यांच्या कारकीर्दीतल्या पहिल्या तीन महिन्यांचा आढावा घेतल्यास, त्यांनी त्यांच्या राज्यातल्या जनतेला सक्षम केले आणि त्यांना प्रशासन प्रक्रियेत सहभागी करून घेतले. त्यांनी आपली दिवाळी कच्छमधल्या भूकंपग्रस्तासोबत साजरी केली. तसेच, पुनर्वसनाच्या कामाला गती दिली. गुजरात कशी कूस बदलू शकतो आणि भूकंपानंतरच्या संकटातून सावरत विकास आणि सुप्रशानाच्या राजकारणाची कास कशी धरु शकतो, याचे प्रत्यक्ष उदाहरणच नरेंद्र मोदींनी आपल्या कार्यकाळात दाखवून दिले.

admin-namo-in3

गुजरातला विकास आणि सुप्रशानाचे उत्तम उदाहरण म्‍हणून देशात एक आदर्श राज्य निर्माण करणे हे नरेंद्र मोदींचे ध्येय गाठण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या मार्गावर अनेक प्रतिकूलता आणि आव्हानांचे अडथळे होते. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित अडथळे होते, त्यात काही अडथळे तर स्वपक्षीयांनीच निर्माण केले होते. मात्र त्यांच्या कुशल नेतृत्वगुणामुळे अशा कठीण परिस्थितीतून ते तावून सुलाखून निघाले. उर्जा क्षेत्रात सुधारणा घडवण्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वीच २००२ मध्ये झालेल्या  काही दुर्दैवी घटनांमुळे त्यांची आग्निपारीक्षा झाली.

या घटनांमध्ये झालेल्या मोठ्या जीवितहानीमुळे आणि त्यानंतर गुजरात पुन्हा रुळावर येण्याविषयी निर्माण झालेली निराशा अशा परिस्थितीत इतर कुठलीही व्यक्ती असती तर तिने आपली जबाबदारी टाळली असती किंवा राजीनामा दिला असता. मात्र नरेंद्र मोदी हे वेगळ्या मातीचे बनले आहेत. त्या काळात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरून होणारी अतिशय तीव्र टीका त्यांनी सहन केली. राजकीय विरोधकांकडून येणारा प्रचंड दबाव सहन करत त्यांनी आपले सुप्रशासानाची वाटचाल पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

आणि तिथे प्रकाश उजळला  : ज्योतिग्राम योजना

अतिशय विपरीत राजकीय परिस्थितीत एक भक्कम नेता म्हणून काम करण्याचे आदर्श उदाहरण द्यायचे असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी यांनी राबवलेली ज्योतिग्राम योजना, गुजरातमधल्या उर्जा क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा घडवून आणणारी ही योजना होती. गुजरातमधल्या महानगरांपासून ते दुर्गम भागातल्या खेड्यांपर्यंत चोवीस तास विजेचा पुरवठा करणारी ही एक क्रांतिकारक योजना होती.

शेतकऱ्यांनी  या योजनेला लगेच विरोध सुरु केला. शेतकरी लॉबीच्या मागे अनेक मोठमोठे , श्रीमंत लोक उभे असतानाही नरेंद्र मोदी ही योजना राबवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळेच ज्योतिग्राम योजना राज्यभरात यशस्वी झाली. या योजनेच्या यशास्वितेतून मोदी यांनी दाखवून दिले की त्यांचे भक्कम नेतृत्व आणि प्रशासनाविषयीचा एकात्मिक दृष्टीकोन यातून समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात हवा तसा बदल घडवता येतो. त्यांच्या कामाविषयीचा दृष्टीकोन सांगणारा  नारा, “सबका साथ सबका विकास”आजही कायम आहे.

admin-namo-in4

राजकारणापेक्षा प्रशासन श्रेष्ठ :

सरकार आणि प्रशासन हे राजकारणापेक्षा अधिक महत्वाचे असते, यावर नरेंद्र मोदी यांचा नेहमीच विश्वास राहिला आहे. विकासात्मक बदल घडवून आणणाच्या कामात त्यांनी राजकीय मतभेद कधीच अडथळे बनू दिले नाही. सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण करणे आणि नर्मदेचे पाणी गुजरातच्या भागात पोहोचवण्याचे काम मोदी यांनी ज्याप्रकारे पूर्ण केले त्यातून सुप्रशासानात, सर्वसहमती आणि शहाणपणाचा समतोल राखता येऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केले.

मोदी यांनी शेजारच्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातल्या सरकारांशी अतिशय मुत्सद्देगिरीने चर्चा करून त्यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी त्यांचे मन वळवले. या प्रकल्पात भागीदार बनण्यासाठी त्यांनी कॉंग्रेसच्या दोन मुख्यंमंत्र्यांना सोबत घेतले, ही गोष्ट आजच्या राजकीय वातावरणात अतिशय दुर्मिळ आहे.

पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करून मोदी यांनी हे उदाहरण घालून दिले की सरकारचे काम केवळ मोठमोठे प्रकल्प उभारणे नाही, तर त्या प्रकल्पांचा लाभ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे अधिक महत्वाचे आहे.

admin-namo-in5

हाकेच्या अंतरावर प्रगती :

प्रकल्प राबवण्यावर नरेंद्र मोदी यांचा भर आणि त्यातल्या बारीकसारीक तपशीलांवर, प्रगतीवर त्यांची असलेली नजर यातून विकासाची फळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतः किती मेहनत घेतली, ते आपल्याला कळते.

विविध क्षेत्रात , जसे की ई कोर्टाचे नकाशे बनवणे, अशा अनेक ठिकाणी त्यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. तसेच स्वागत आणि एक दिवसाचे प्रशासन असे अभिनव उपाक्रम राबवून त्यांनी नागरिक आणि सरकार यांच्यातल्या संबंधाना एक नवा आयाम दिला.

नरेंद्र मोदी सरकार आणि प्रशासनाच्या विकेंद्रीकरणासाठी देखील ओळखले जातात. उदाहरणार्थ ए टी वी टी या उपक्रमातून त्यांनी विकास नितोजन आणि प्रशासनाला तालुका पातळीपर्यंत पोहोचवले आणि गावखेड्याच्या जवळ आणले. उगीच भाराभार कायदे बनवण्यापेक्षा कृती करण्यावर त्यांनी भर दिला. याचे उदाहरण म्हणजे, त्यांनी सुरु केलेल्या एकल खिडकी योजनेमुळे उद्योग क्षेत्राला अतिशय लाभ झाला. पर्यावरणविषयक परवानग्या देण्यातही त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि प्रभावी व्यवस्था आणली. 

यशाचे तीन स्तंभ :

गुजरातची यशोगाथा नरेंद्र मोदींनी तीन स्तंभांवर उभारलेली आहे. ते स्तंभ म्हणजे कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र. त्यांच्या कार्यकालात गुजरातमध्ये कृषी क्षेत्रात १० टक्क्यांची वाढ झाली, गुजरात हे दुष्काळग्रस्त राज्य म्हणून प्रसिद्ध असताना, एवढी मोठी वाढ लक्षणीय होती. कृषी महोत्सवासारख्या उपक्रमातून त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठे स्थित्यंतर घडवले. दर दोन वर्षानी होणारी व्हायब्रंट गुजरात परिषद त्यांनी सुरु केली, या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी गुजरातमध्ये विक्रमी गुंतवणूक आणली. यातून राज्यात रोजगारनिर्मिती वाढली. लघुउद्योग आणि मध्यम उद्योगांसाठी सुध्दा गुजरात हे मोठे आकर्षणाचे केंद्र बनले.

admin-namo-in6

संस्थांचे महत्त्व :

एक प्रशासक म्हणून नरेंद्र मोदी यांची दोनदा कसोटी लागली. २००६ मध्ये जेव्हा सूरतमध्ये मोठा पूर आला तेव्हा आणि २००८ साली जेव्हा दहशतवाद्यांनी गुजरातमधल्या अनेक शहरांवर हल्ला केला तेव्हा. या दोन्ही परिस्थितींमध्ये उत्तमोत्तम पद्धतीचा वापर करण्याचा मोदींनी जो यशस्वी प्रयत्न केला, त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यात मोठी मदत मिळाली.

आपत्ती व्यवस्थापनासाठी मोदींनी जो संस्थात्मक दृष्टीकोन वापरला, त्याला कच्छ मधल्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या जनतेचे पुनर्वसन करताना एक आकार मिळाला. हिंदी महासागरात आलेल्या त्सुनामीच्या वेळी आणि उत्तराखंडमधील प्रलयाच्या वेळी आपत्ती व्यवस्थापनासाठी हाच दृष्टीकोन आणि कार्यपध्दती मार्गदर्शक ठरली.

हाच संस्थात्मक दृष्टीकोन, मोदींनी २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था हाताळताना दाखवला. प्रशासन आणि सरकार चालवतांना एखाद्या राजकीय नेत्याने आपला विशेष ठसा उमटवला असेल, तर त्याचा संस्थात्मक वारसा आपल्याला पुढेही जाणवत राहतो. या निकषांवर पाहिल्यास, नरेंद्र मोदीच्या पुरोगामी विचारसरणीमुळे त्यांच्या काळात गुजरातमध्ये उर्जा सुरक्षेच्या उद्देशासाठी पेट्रोलियम विद्यापीठापासून , न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि अंतर्गत सुरक्षेसाठी रक्षा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 

मोदी यांच्या संस्थात्मक वारशातून, सुप्रशासन म्हणजे केवळ आजचे प्रश्न सोडवणे नाही तर उद्याच्या आव्हानांचा अंदाज घेऊन त्यांचा सामना करण्याची तयारी करणे, हा त्यांचा दृढ विश्वासच व्यक्त होतो.

admin-namo-in7

admin-namo-in8

सर्वसमावेशकतेवर विश्वास :

जेव्हा नरेंद्र मोदी यांनी भारताचे पुढचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारण्याची तयारी सुरु केली, तेव्हाच प्रशासन आणि सरकारकडे बघण्याचा त्यांचा सर्वसामावेशक दृष्टीकोन अधिकच अधोरेखित झाला. ‘सबका साथ सबका विकास’ हे नरेंद्र मोदी यांचे तत्वज्ञान आहे, त्यांच्या पंचामृत कार्यपद्धतीतून आपल्याला दिसते की त्यांनी कसे सरकारी कामे आणि योजना यांचा समन्वय साधला. या दोन्हीमध्ये असलेल्या कचऱ्याचा त्यांनी निचरा केला. आणि मंत्रालय व विभागांमधील भिंती त्यांनी काढून टाकल्या.

नरेंद्र मोदी यांच्या मते भारत सरकारसमोरचे सर्वात मोठे आव्हान हे कामांच्या अंमलबजावणीकडे पाहण्याच्या एकात्मिक दृष्टीकोन आणि सर्वसामावेशकतेचा अभाव हे आहे. गेल्या काही वर्षात -उर्जा क्षेत्रात अपारंपारिक स्त्रोत निर्माण करण्यापासून ते अत्याधुनिक पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करण्यापर्यंत-मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला जाणवते की त्यांनी प्रत्येक वेळी प्रशासन आणि सरकार यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. या समन्वयाचा लाभ भारताला येत्या काही वर्षात नक्कीच  होईल.

admin-namo-in9

admin-namo-in10

२००१ ते २०१३ या काळात प्रशासनामार्फत योजनेची उत्तम अंमलबजावणी करण्याच्या कलेत मोदी निपुण झाले. त्यांच्या या प्रगतीची साक्ष आपल्याला त्यांना मिळालेल्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारातून पटते.

मान्यवरांची प्रशस्तीपत्रके :

‘’प्रत्येकाला नरेंद्र मोदी हे अतिशय कणखर नेता आणि कुशल प्रशासक म्हणून परिचित आहेत. माझ्या शुभेच्छा आणि प्रार्थना सदैव त्यांच्यासोबत असतील. भारताविषयी त्यांची स्वप्ने आणि भविष्यातील योजना पूर्ण व्हाव्यात अशा माझ्या शुभकामना’’- रजनीकांत, सुपरस्टार.

‘मी नरेंद्र मोदी यांना भेटलो, ते अतिशय सज्जन गृहस्थ आहेत, त्यांनी गुजरातसाठी अतिशय उत्तम काम केले आहे.’- श्री श्री रविशंकर, संस्थापक, आर्ट ऑफ लिविंग..

“नरेंद्रभाई माझ्या भावासारखे आहेत. आम्हा सगळ्यांना ते पंतप्रधान झाल्याचे बघायचे आहे. दिवाळीच्या मंगलमय सणाच्या वेळी आमची इच्छा पूर्ण होईल अशी अशा आहे,”गानसाम्राज्ञीलता मंगेशकर.

“आता देशाला महत्वाच्या कार्यालयात दृढनिश्चयी लोकांची गरज आहे. एका शब्दात सांगायचे तर, आम्हाला नरेंद्र मोदींची गरज आहे,”अरुण शौरी, माजी केंद्रीय मंत्री, पत्रकार, लेखक.

“ह्या वेळी नरेंद्र मोदी हे देवदूतासारखे आले आहेत. ते पुढील पंतप्रधान होतील. ते जगात देशाची मान उंचावतील,”श्री चो रामास्वामी, संपादक, ‘तुघलक’.

श्री नरेंद्र मोदी यांना देशातील सर्वात यशस्वी मुख्यमंत्री आणि सर्वोत्तम प्रशासक म्हणून समृध्द अनुभव आहे. ते देशाचे चौदावे पंतप्रधान आहेत.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Centre releases ₹50,571 cr to states as capex loans during Apr-Nov

Media Coverage

Centre releases ₹50,571 cr to states as capex loans during Apr-Nov
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
A heart-touching letter from PM Modi
December 03, 2024

For Divyang artist Diya Gosai, a moment of creativity turned into a life-changing experience. During PM Modi’s Vadodara roadshow on October 29th, she presented her sketches of him and H.E. Mr. Pedro Sánchez, the President of the Government of Spain. Both leaders stepped out to personally accept her heartfelt gift, leaving her overjoyed.

Weeks later, on November 6th, Diya received a letter from the PM praising her artwork and sharing how even H.E. Mr. Sánchez admired it. PM Modi encouraged her to pursue fine arts with dedication, expressing faith in the youth’s role in building a "Viksit Bharat." He also extended warm Diwali and New Year wishes to her family, showcasing his personal touch.

Overwhelmed with joy, Diya read the letter to her parents, who were elated that she brought such immense honour to the family. "I take pride in being a small part of our country. Thank you, Modi Ji, for giving me your love and blessings," said Diya, adding that receiving the letter from the PM deeply inspired her to take bold actions in life and empower others to do the same.

PM Modi’s gesture reflects his commitment to empowering Divyangs and recognising their contributions. From numerous initiatives like the Sugamya Bharat Abhiyan to personal connections like Diya’s, he continues to inspire and uplift, proving that every effort matters in shaping a brighter future.