मॉरिशसचे राष्ट्रपती,
महामहिम धर्मबीर गोकुल जी,
पंतप्रधान महामहिम नवीन चंद्र रामगुलाम जी,
मॉरिशसमधील बंधू आणि भगिनींनो,

मॉरिशसचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. हा केवळ माझा सन्मान नाही. हा 1.4 अब्ज भारतीयांचा सन्मान आहे. भारत आणि मॉरिशसमधील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नातेसंबंधांचा हा सन्मान आहे. प्रादेशिक शांतता, प्रगती, सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी आमच्या सामायिक वचनबद्धतेची ही पावती आहे. तसेच, ग्लोबल साउथच्या सामायिक आशा आणि आकांक्षांचे प्रतीक देखील आहे. या पुरस्काराचा मी अत्यंत नम्रतापूर्वक आणि कृतज्ञतेने स्वीकार करतो. हा पुरस्कार मी अनेक शतकांपूर्वी भारतातून मॉरिशसमध्ये आलेल्या तुमच्या पूर्वजांना आणि त्यांच्या सर्व पिढ्यांना समर्पित करतो. त्यांच्या कठोर परिश्रमातून त्यांनी मॉरिशसच्या विकासात एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे आणि मॉरिशसच्या विविधतेत योगदान दिले. एक जबाबदारी म्हणूनही मी या सन्मानाचा स्वीकार करतो. भारत-मॉरिशस धोरणात्मक भागीदारी नव्या शिखरावर नेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहू या आमच्या वचनबद्धतेचा मी पुनरुच्चार करतो.

खूप खूप धन्यवाद.