पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की नक्षलवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी आपण सुरु केलेली मोहीम योग्य दिशेने सुरु आहे हेच सुरक्षा दलांना मिळालेल्या यशातून दिसून येते. “नक्षलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याप्रती आम्ही संपूर्णपणे कटिबद्ध आहोत,” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संदेशाला प्रतिसाद देत पंतप्रधान एक्स मंचावरील संदेशात म्हणतात:
“सुरक्षा दलांना मिळालेले हे यश हेच दाखवून देत आहे की नक्षलवाद मुळापासून संपवण्यासाठीचे आपले अभियान योग्य दिशेने वाटचाल करत आहे. नक्षलवादामुळे प्रभावित भागात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याप्रती आम्ही संपूर्णपणे कटिबद्ध आहोत.”
सुरक्षा बलों की यह सफलता बताती है कि नक्सलवाद को जड़ से समाप्त करने की दिशा में हमारा अभियान सही दिशा में आगे बढ़ रहा है। नक्सलवाद से प्रभावित क्षेत्रों में शांति की स्थापना के साथ उन्हें विकास की मुख्यधारा से जोड़ने के लिए हम पूरी तरह से प्रतिबद्ध हैं। https://t.co/7wBmsjGBkl
— Narendra Modi (@narendramodi) May 14, 2025


