पंतप्रधानांचा इस्रायल दौरा

Published By : Admin | February 24, 2026 | 17:34 IST

इस्रायलचे पंतप्रधान, महामहिम बेंजामिन नेतन्याहू यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलला अधिकृतपणे भेट देतील. पंतप्रधानांचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे.

या भेटीदरम्यान, पंतप्रधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतील. दोन्ही नेते भारत-इस्रायल धोरणात्मक सहयोगाने झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतील आणि विज्ञान  तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, सुरक्षा, कृषी, जल व्यवस्थापन, व्यापार आणि अर्थव्यवस्था आणि लोकांमधील देवाणघेवाण यांच्यासह सहकार्याच्या विविध क्षेत्रांतील आगामी संधींवर विचार विनिमय करतील. उभय देशांतील नेत्यांकडून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दृष्टिकोनांची देवाणघेवाण होण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष महामहिम  आयझॅक हर्झोग यांचीही यावेळी भेट घेतील.

या भेटीमुळे उभय देशांमधील सघन आणि दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीला दुजोरा  मिळेल तसेच समान आव्हानांचा आढावा घेण्याची तसेच दोन्ही देशांच्या  लोकशाहींमधील मजबूत भागीदारीसाठी तसेच त्यांचे सामायिक दृष्टिकोन साध्य करण्याच्या दिशेने होणाऱ्या उद्दिष्टांशी पुनश्च उजाळा देण्याची संधी मिळेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
10 Years of UPI: From 18 mln to 219 bln transactions, volumes jump 12,000x

Media Coverage

10 Years of UPI: From 18 mln to 219 bln transactions, volumes jump 12,000x
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 एप्रिल 2026
April 10, 2026

Safe Anchor, Green Engine, Digital Dynamo: PM Modi’s Blueprint for India’s Economic Renaissance