पंतप्रधान नरेंद्र मोदी 02-03 जुलै 2025 दरम्यान घानाला भेट देतील. पंतप्रधानांचा  घानाचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल. तीन दशकांनंतर भारताचे  पंतप्रधान घानाला भेट देणार आहेत.  या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान घानाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करून मजबूत द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेतील आणि आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य आणि विकास सहकार्य भागीदारीद्वारे ती वाढवण्यासाठी अन्य मार्गांवर चर्चा करतील. हा दौरा  दोन्ही देशांचे  द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि ECOWAS [पश्चिम आफ्रिकन देशांचा आर्थिक समुदाय] आणि आफ्रिकन संघासोबत भारताचे संबंध मजबूत करण्याप्रति  सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.

त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकच्या  पंतप्रधान महामहिम कमला प्रसाद-बिसेसर यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान 03 - 04, जुलै 2025  दरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगोला अधिकृत भेट देतील. पंतप्रधान म्हणून या देशांमधील त्यांचा हा पहिलाच दौरा असेल आणि 1999 नंतर पंतप्रधान स्तरावर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान त्रिनिदाद आणि टोबॅगोचे राष्ट्राध्यक्ष महामहिम क्रिस्टीन कार्ला कांगालू आणि पंतप्रधान महामहिम कमला प्रसाद-बिसेसर यांच्याशी चर्चा करतील आणि भारत-त्रिनिदाद आणि टोबॅगो संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करतील. पंतप्रधान त्रिनिदाद आणि टोबॅगो संसदेच्या संयुक्त सत्रालाही  संबोधित करण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या त्रिनिदाद आणि टोबॅगो दौऱ्यामुळे  दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या आणि ऐतिहासिक संबंधांना नवी चालना मिळेल.

आपल्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान 04-05 जुलै 2025 या कालावधीत अर्जेंटिनाच्या अधिकृत दौऱ्यावर जातील. यावेळी पंतप्रधान अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मिलेई यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही नेते संरक्षण, शेती, खाणकाम, तेल आणि वायू, अक्षय ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक आणि परस्परांच्या नागरिकांमधील संबंध यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत-अर्जेंटिना भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या उपायांवर चर्चा करतील. पंतप्रधानांच्या द्विपक्षीय भेटीमुळे भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील बहुआयामी धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल.

आपल्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला द सिल्वा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान 5 ते 8 जुलै 2025 दरम्यान 17 वी ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी ब्राझीलला जातील आणि त्यानंतर त्यांचा राजकीय दौरा होईल. पंतप्रधानांचा हा चौथा ब्राझील दौरा असेल. 17 वी ब्रिक्स नेत्यांची शिखर परिषद रिओ दि जानेरो येथे होणार आहे. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. यामध्ये जागतिक प्रशासन, शांतता आणि सुरक्षा, बहुपक्षीयतेला बळकटी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर, हवामान कृती, जागतिक आरोग्य, आर्थिक आणि वित्तीय बाबी, या मुद्द्यांचा समावेश असेल. शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान अनेक द्विपक्षीय बैठका घेण्याची शक्यता आहे. ब्राझीलच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान ब्रासीलिया येथे जातील, जिथे ते व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आणि परस्परांच्या नागरिकांमधील संबंध यासह परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी च्या विस्तारावर अध्यक्ष लुला यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. नेटुम्बो नंदी-नदाइटवाह यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान 9 जुलै 2025 रोजी नामिबियाच्या दौऱ्यावर जातील. पंतप्रधानांचा हा पहिलाच नामिबियाचा दौरा असेल आणि भारताच्या पंतप्रधानांचा हा तिसरा नामिबिया दौरा असेल. आपल्या भेटीदरम्यान, पंतप्रधान नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नंदी-नदैतवाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पंतप्रधान नामिबियाचे संस्थापक आणि पहिले राष्ट्राध्यक्ष दिवंगत डॉ. सॅम नुजोमा यांना आदरांजली अर्पण करतील. ते नामिबियाच्या संसदेतही भाषण करतील. पंतप्रधानांचा हा दौरा नामिबियाबरोबरच्या भारताच्या बहुआयामी आणि खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांचा पुनरुच्चार आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Engineering goods exports up 10.4% in January,2026, crosses $100 billion mark in April-January Period of FY26

Media Coverage

Engineering goods exports up 10.4% in January,2026, crosses $100 billion mark in April-January Period of FY26
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Eminent Malayali Litterateurs Meet PM to Express Gratitude for Renaming State to Keralam
February 27, 2026

A group of eminent Malayali litterateurs called upon the Prime Minister today to express their gratitude regarding the renaming of Kerala to Keralam.

The Prime Minister stated that he was very happy to receive the eminent Malayali litterateurs and noted that the interaction was extremely insightful. The Prime Minister, further highlighted that, the meeting reflected the litterateurs' passionate commitment to Keralam and the Malayalam .

Prime Minister shared on x;

Very happy to receive a group of eminent Malayali litterateurs who came to express their gratitude for renaming Kerala to Keralam.

The interaction was extremely insightful and it reflected their passionate commitment to Keralam and Malayalam.