PM Modi pays homage to Dr. Sree Sree Sree Sivakumara Swamigalu during #MannKiBaat, remembers his teachings
I commend the Election Commission for continuous efforts to strengthen our democracy: PM During #MannKiBaat
Upcoming Lok Sabha elections an opportunity for the first time voters of 21st century to take the responsibility of the nation on their shoulders: PM during #MannKiBaat
Subhas Babu will always be remembered as a heroic soldier and skilled organiser: PM during #MannKiBaat
For many years it was being demanded that the files related to Netaji should be made public and I am happy that we fulfilled this demand: PM during #MannKiBaat
Netaji had a very deep connection with the radio and he made it a medium to communicate with the countrymen: PM refers to Azad Hind Radio during #MannKiBaat
We all know Gurudev Rabindranath Tagore as a wonderful writer and a musician. But Gurudev was also a great painter too: PM during #MannKiBaat
#MannKiBaat: PM Modi remembers Sant Ravidas’ invaluable teachings, says He always taught the importance of “Shram” and “Shramik”
The contribution of Dr. Vikram Sarabhai to India's space programme is invaluable: Prime Minister during #MannKiBaat
The number of space missions that took place since the country's independence till 2014, almost the same number of space missions has taken place in the past four years: PM #MannKiBaat
India will soon be registering it’s presence on moon through the Chandrayaan-2 campaign: PM Modi during #MannKiBaat
PM Modi during #MannKiBaat: We are using Space Technology to improve delivery and accountability of government services
#MannKiBaat: Our satellites are a symbol of the country's growing power today, says PM Modi
Those who play, shine; when a player performs best at the local level then there is no about his or her best performance best at global level: PM #MannKiBaat
With the support of the people of India, today the country is rapidly moving towards becoming an open defecation free nation: PM during #MannKiBaat
More than five lakh villages and more than 600 districts have declared themselves open defecation free. Sanitation coverage has crossed 98% in rural India: PM during #MannKiBaat

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. या महिन्याच्या 21 तारखेला देशासाठी एक अत्यंत दु:खद बातमी मिळाली. कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यातले श्री सिद्धगंगा मठाचे डॉक्टर श्री श्री शिवकुमार स्वामीजी आपल्यातून निघून गेले. शिवकुमार स्वामीजीनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले. भगवान बसवेश्वर यांनी आपल्याला शिकवलं आहे- `कायकवे कैलास’ म्हणजे कठोर परिश्रम करत आपल्या जबाबदारीचे पालन करत राहणं, म्हणजे भगवान शिवजींचे निवासस्थान, कैलाशधाम मध्ये राहण्यासारखे आहे. शिवकुमार स्वामीजी याच तत्वज्ञानाचे समर्थक होते आणि त्यांनी आपल्या 111 वर्षांच्या आयुष्यकालात हजारो लोकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्य केलं. त्यांची ख्याती असे विद्वान म्हणून होती, ज्यांचं  इंग्रजी, संस्कृत आणि कन्नड भाषांवर अद्भुत प्रभुत्व होतं. ते एक समाज सुधारक होते. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन लोकांना भोजन, आसरा, शिक्षण आणि अध्यात्मिक ज्ञान मिळेल, यासाठी वाहिलं होतं. शेतकऱ्यांचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं, याला स्वामीजीनी आयुष्यात प्राधान्य दिलं होतं. सिद्धगंगा मठ नियमितपणे पशुधन आणि कृषी मेळाव्यांचं आयोजन करत असे. मला अनेक वेळा परमपूज्य स्वामीजींचा आशीर्वाद प्राप्त करण्याचं भाग्य लाभलं आहे. 2007 मध्ये, श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारंभासाठी आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम तुमकुरला गेले होते. कलाम साहेबांनी यावेळी पूज्य स्वामीजींसाठी एक कविता ऐकवली होती. त्यांनी म्हटलं होतं:

“ओह माय फेलो सिटीझन्स-इन गिव्हिंग, यु रिसीव्ह हॅपिनेस,

इन बॉडी अँड सोल-यु हॅव एव्हरीथिंग टु गिव्ह

इफ यु हॅव नॉलेज-शेअर इट

इफ यु हॅव रिसोर्सेस – शेअर देम विथ द निडी

यु, युअर माईंड अँड हार्ट

टु रिमुव्ह द पेन ऑफ द सफरिंग, अँड चीअर द सॅड हार्ट् स.

इन गिव्हिंग, यु रिसीव्ह हॅपिनेस ऑलमाईटी विल ब्लेस, ऑल युअर अॅक्शन्स’’

डॉक्टर कलाम साहेब यांची ही कविता श्री श्री श्री शिवकुमार स्वामी जी यांचे जीवन आणि सिद्धगंगा मठाचे मिशन सुंदर प्रकारे सादर करते. पुन्हा एकदा, मी अशा महापुरुषाला माझी श्रद्धासुमने अर्पण करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झालं आणि त्या दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला आणि कालच आपण शानदाररित्या प्रजासत्ताक दिन साजराही केला, परंतु आज मी एक वेगळी गोष्ट सांगू इच्छितो. आपल्या देशात एक खूपच महत्वपूर्ण संस्था आहे, जी आपल्या लोकशाहीचा अविभाज्य भाग आहेच आणि आपल्या प्रजासात्ताकाहून जुनी आहे- मी भारतीय निवडणूक आयोगाबद्दल बोलत आहे. 25 जानेवारी निवडणूक आयोगाचा स्थापना दिन होता, जो राष्ट्रीय मतदार दिन नॅशनल व्होटर्स डे म्हणून साजरा केला जातो, भारतात ज्या विशाल स्तरावर निवडणुकीचं आयोजन केलं जातं, ते पाहून जगातील लोकांना आश्चर्य वाटतं आणि आपला निवडणूक आयोग ज्या कुशलतेनं त्यांचं व्यवस्थापन करतो, ते पाहून प्रत्येक देशवासियाला निवडणूक आयोगाबद्दल अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या देशात भारताचा प्रत्येक नागरिक, जो एक नोंदणीकृत मतदार आहे. रजिस्टर्ड मतदार आहे, त्याला मतदान करण्याची संधी मिळेल, याची खात्री करण्यासाठी कोणतीही कसूर सोडत नाही.

हिमाचल प्रदेशमध्ये सागरी तळापासून 15,000 फुट उंचीवरील भागात सुद्धा मतदान केंद्र सुरु केलं जातं, हे आपण ऐकतो, तर अंदमान आणि निकोबार बेटांसारख्या अत्यंत दूरवरच्या बेटांवरही मतदानाची व्यवस्था केली जाते. आणि आपण गुजरात संदर्भात हे ऐकलंच असेल की, गीरच्या जंगलात, एका अत्यंत दूरवरच्या भागात, एक मतदान केंद्र आहे, जे फक्त एका मतदारासाठी आहे. कल्पना करा, फक्त एका मतदारासाठी. जेव्हा या गोष्टी ऐकतो तेव्हा निवडणूक आयोगाबद्दल अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. त्या एका मतदाराला लक्षात ठेवून, त्याला आपल्या मताधिकाराचा उपयोग करण्याची संधी मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांचं  पथक दूरवरच्या भागांत जातं आणि मतदानाची व्यवस्था करतं, हेच तर आमच्या लोकशाहीचं सौंदर्य आहे.

मी आपली लोकशाही मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करणाऱ्या निवडणूक आयोगाची प्रशंसा करतो. मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन स्वतंत्र आणि निष्पक्षपाती निवडणूक होईल, याची खात्री करणाऱ्या सर्व राज्यांचे निवडणूक आयोग, सर्व सुरक्षा दले, इतर कर्मचार्यांचंही मला कौतुक वाटतं.

यावर्षी आपल्या देशात लोकसभा निवडणुका होतील, आणि 21 व्या शतकात जन्मलेल्या युवकांसाठी ही पहिलीच संधी असेल की ते मतदान करतील. त्यांच्यासाठी देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आली आहे. आता ते देशाच्या निर्णय प्रक्रियेतील एक भागीदार बनण्यास निघाले आहेत. स्वतःच्या स्वप्नांना देशाच्या स्वप्नांशी जोडण्याची वेळ आली आहे. मी युवा पिढीला आग्रहाने सांगेन की, जर ते मतदान करण्यास पात्र असतील तर त्यांनी मतदार म्हणून नोंदणी अवश्य करावी. आपल्यातल्या प्रत्येकाला याची जाणीव व्हावयास हवी की, देशात मतदार होणं, मताधिकार प्राप्त करणं हे आयुष्यातल्या महत्वपूर्ण यशातील एक महत्वपूर्ण थांबा आहे.त्याचबरोबर, मतदान करणं हे माझं कर्तव्य आहे-ही भावना आपल्यात रुजली पाहिजे. आयुष्यात कधी कोणत्या कारणपरत्वे, मतदान करू शकला नाहीत तर खूप  वेदना झाल्या पाहिजेत. कधी देशात कुठे चुकीचं होताना पाहीलं तरी दु:ख झालं पाहिजे. हो. मी त्या दिवशी मतदान केलं नव्हतं, त्या दिवशी मी मतदान करायला गेलो नव्हतो, त्याचाच परिणाम आज माझ्या देशाला भोगावा लागतोय. आपल्याला या जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. ही आमची वृत्ती, आमची प्रवृत्ती, बनली पाहिजे. हे आमचे संस्कार असले पाहिजेत. मी देशातल्या नामवंत व्यक्तीना आवाहन करतो की, आपण सर्वांनी मिळून मतदार नोंदणी व्हावी, किंवा लोकांनी मतदान करावं, यासाठी मोहीम चालवून लोकांना जागरूक करावं. मोठ्या प्रमाणात युवा मतदार म्हणून नोंदणीकृत होतील आणि आपल्या सहभागातून आपली लोकशाहीला आणखी मजबूत बनवतील, अशी मला आशा आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताच्या या महान भूमीनं अनेक महापुरूषांना जन्म दिला आहे आणि त्या महापुरूषांनी मानवतेसाठी काही अद्भुत आणि अविस्मरणीय कार्य केलं आहे. आमचा देश बहुरत्न वसुंधरा आहे. अशाच महापुरुषांपैकी एक होते, नेताजी सुभाषचंद्र बोस. 23 जानेवारीला पूर्ण देशानं एका वेगळ्याच पद्धतीनं त्यांची जयंती साजरी केली. नेताजींच्या जयंतीच्या दिवशी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या वीरांना समर्पित संग्रहालयाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं.आपल्याया माहित आहे की, लाल किल्ल्यात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अनेक खोल्या, इमारती बंद होत्या. लाल किल्ल्यातल्या बंद खोल्यांचं रुपांतर आता अत्यंत सुंदर संग्रहालयात केलं आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इंडियन नॅशनल आर्मी यांना समर्पित संग्रहालय; `याद-ए-जलियां’ आणि 1857 एटीन फिफ्टी सेवन,इंडिया’ज फर्स्ट वॉर ऑफ इंडीपेंडन्स ला समर्पित संग्रहालय आणि हा संपूर्ण परिसर क्रांती मंदिर म्हणून देशाला समर्पित केला आहे. या संग्रहालयातल्या प्रत्येक विटेमध्ये, आमच्या गौरवशाली इतिहासाचा सुगंध आहे. संग्रहालयात ठायी ठायी आमच्या स्वातंत्र्य संग्रमातल्या वीरांच्या कहाण्या सांगणाऱ्या गोष्टी, आम्हाला इतिहासात डोकावून पाहण्यास प्रेरित करतात. याच ठिकाणी, भारतमातेचे वीर सुपुत्र-कर्नल प्रेम सहगल, कर्नल गुरुबक्षसिंग धिल्लन आणि मेजर जनरल शहनवाज खान यांच्यावर ब्रिटीश राजवटीनं खटला चालवला होता.

जेव्हा मी लाल किल्ल्यातल्या, क्रांती मंदिरात, नेताजींशी जोडलेल्या आठवणींचं दर्शन घेत होतो, तेव्हा नेताजींच्या परिवारातील सदस्यांनी मला एक खूपच खास, कॅप टोपी  भेट दिली. नेताजी ती टोपी परिधान करत असत. मी ती टोपी संग्रहालयातच ठेवायला दिली, ज्यामुळे तिथं येणार्या लोकानी ती टोपी पहावी आणि तिच्यापासून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी. वास्तविक, आपल्या नायकांचं शौर्य आणि देशभक्ती नव्या पिढीपर्यंत वेगवेगळ्या रूपांत सतत पोहोचवण्याची गरज असते. महिन्याभरापूर्वी मी 30 डिसेंबरला अंदमान आणि निकोबार बेटांवर गेलो होतो.एका कार्यक्रमात अगदी त्याच ठिकाणी तिरंगा फडकवला गेला, जिथं नेताजी सुभाष बोस यांनी 75 वर्षांपूर्वी तिरंगा फडकवला होता. याच प्रमाणे, 2018 च्या ऑक्टोबरमध्ये लाल किल्ल्यात जेव्हा तिरंगा फडकवला गेला, तेव्हा सर्वाना आश्चर्य वाटलं, कारण इथं तर 15 ऑगस्टची परंपरा आहे. हे निमित्त आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं होतं.

सुभाष बाबू यांचं वीर जवान आणि कुशल संघटक म्हणून नेहमी स्मरण केलं जाईल. एक असा वीर जवान ज्यानं स्वातंत्र्याच्या संग्रामात प्रमुख भूमिका बजावली. “दिल्ली चलो” “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा” अशा अनेक तेजस्वी घोषणा देऊन नेताजींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान मिळवलं. अनेक वर्षांपासून नेताजींशी संबंधित फायली सर्वांसमोर आणाव्यात, अशी मागणी होत होती आणि मला याचा आनंद आहे की, हे काम आम्ही करू शकलो. मला नेताजींचं सारं कुटुंब पंतप्रधान निवासात आले होते, तो दिवस आठवतो. आम्ही सर्वांनी मिळून नेताजीशी संबंधित अनेक बाबींवर गप्पागोष्टी केल्या आणि नेताजी सुभाष बोस यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारताच्या महान नायकांशी संबंधित अनेक स्थळांचा दिल्लीत विकास करण्याचे प्रयत्न झाले, याचा मला आनंद आहे. मग ते बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित 26, अलीपूर रोड असो की सरदार पटेल संग्रहालय असो किंवा क्रांती मंदिर असो. आपण जर दिल्लीला आलात तर ही स्थळे जरूर पहा.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज जेव्हा आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत चर्चा करत आहोत आणि ते ही `मन की बात’, तर मी आपल्याला नेताजींच्या जीवनाशी संबंधित एक किस्सा सांगू इच्छितो. मी नेहमीच रेडिओ लोकांशी जोडण्याचं एक महत्वपूर्ण माध्यम मानल आहे, त्याचप्रमाणे नेताजींचंदेखील रेडिओशी अत्यंत निकटचं नातं होतं आणि त्यांनीही देशवासियांशी संवाद साधण्यासाठी रेडिओ हेच माध्यम निवडलं होतं.

1942 मध्ये, सुभाष बाबूंनी आझाद हिंद रेडिओ सुरु केला आणि रेडिओच्या माध्यमातून आझाद हिंद फौजेतले सैनिक आणि लोकांशी संवाद साधत असत.सुभाष बाबू यांची रेडिओवर संभाषण सुरु करण्याची एक वेगळीच शैली होती. ते संभाषण सुरु करताना सर्वात आधी असे म्हणत असत-धिस इज सुभाष चंद्र बोस स्पीकिंग टू यु ओव्हर द आझाद हिंद रेडिओ आणि इतक ऐकताच श्रोत्यांमध्ये जणू एक नवा जोश, एका नवीन उर्जेचा संचार होत असे.

मला असं सांगण्यात आलं की, हे रेडिओ स्टेशन आठवड्याच्या बातम्या प्रसारित करत असे, ज्या इंग्रजी, हिंदी, तमिळ, बांगला, मराठी, पंजाबी, पश्तू आणि उर्दू अशा अनेक भाषांमध्ये दिल्या जात. हे रेडिओ स्टेशन चालवण्यात गुजरातेतले रहिवासी एम.आर.व्यास यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली. आझाद हिंद रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम सामान्य लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते आणि त्यांच्या कार्यक्रमापासून आमच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या लढवय्यांना खूप मोठी शक्ती मिळाली.

याच क्रांती मंदिरात एक चित्रकला संग्रहालय उभं करण्यात आलं आहे. भारतीय कला आणि संकृती अत्यंत आकर्षक पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न इथं झाला आहे. संग्रहालयात चार ऐतिहासिक प्रदर्शनं आहेत आणि तिथं अनेक शतकं जुनी 450 हून अधिक पेंटिंग आणि कलाकृती आहेत. संग्रहालयात अमृता शेरगिल, राजा रविवर्मा, अवनिन्द्र नाथ टागोर, गगनेन्द्र नाथ टागोर, नंदलाल बोस, जेमिनी राय, सैलोज मुखर्जी यांसारख्या महान कलाकारांच्या उत्तम कलाकृतींचं सुरेख प्रदर्शन भरवलं आहे. आणि मी आपल्याला सर्वाना विशेष आग्रह करेन की, आपण तिथ जाऊन गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं कार्य जरूर पहा.

आता आपण विचार करत असाल की, इथं कलेची चर्चा सुरु आहे आणि मी आपल्याला गुरुदेव टागोर यांच्या उत्तम कलाकृती पाहण्याविषयी सांगतो आहे. आतापर्यंत आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना एक लेखक आणि संगीतकार म्हणून ओळखत असाल. परंतु मी हे सांगू इच्छितो की, गुरुदेव एक चित्रकारही होते. अनेक विषयांवर त्यांनी पेंटिंग्ज बनवली आहेत. त्यांनी पशु आणि पक्ष्यांची चित्रंही काढली आहेत, त्यांनी अनेक सुंदर निसर्गचित्रंही काढली आहेत आणि इतकच नव्हे तर त्यांनी अनेक मानवी पात्रांना कलेच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटण्याचं काम केलं आहे.आणि खास गोष्ट ही आहे की, त्यांनी आपल्या बहुतेक चित्रांना काही नाव दिलं नाही. त्यांचा असा विश्वास होता की, त्यांची पेंटिंग पाहणारा स्वतःच त्या पेंटिंगचा अर्थ समजून घेईल, पेंटिंग्जमधून त्यांनी दिलेल्या संदेशाचा अर्थ आपल्या दृष्टीकोनातून जाणून घेईल. त्यांच्या पेंटिंगचं प्रदर्शन युरोपीय देशांत, रशियात आणि अमेरिकेतही भरवण्यात आलं आहे. आपण क्रांती मंदिरात त्यांचं पेंटिंग पाहायला जरूर जाल, अशी मला आशा आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, भारत संतांची भूमी आहे. आमच्या संतांनी आपले विचार आणि कार्याच्या माध्यमातून सद्भाव, समानता आणि सामाजिक सबलीकरणाचा संदेश दिला आहे. असेच एक संत होते-संत रविदास. 19 फेब्रुवारीला रविदास जयंती आहे. संत रविदासजी यांचे दोहे प्रसिद्ध आहेत. संत रविदासजी थोड्या ओळीतूनच मोठ्यातला मोठा संदेश देत असत. त्यांनी म्हटल होतं –

जाती-जाती में जाती है

जो केतन के पात

रैदास मनुष न जुड सके

जब तक जाती ना जात

ज्याप्रकारे केळ्याचं खोड सोललं तर पानाच्या खाली पान, नंतर पुन्हा पानाच्या खाली पान आणि शेवटी काहीच निघत नाही, परंतु पूर्ण झाड संपुष्टात येतं, अगदी त्याचप्रमाणे मनुष्याला विविध जातींत वाटलं गेलं आहे आणि मनुष्य राहिलाच नाही.ते म्हणत असत की, जर वास्तवात ईश्वर प्रत्येक माणसात असतो तर त्याला जाती, पंथ आणि अन्य सामाजिक आधारावर वाटणं योग्य नाही.

गुरु रविदासजी यांचा जन्म वाराणसीच्या पवित्र भूमीत झाला होता.संत रविदासजी यांनी आपल्या संदेशांच्या द्वारे सर्व आयुष्यभर श्रम आणि श्रमिकांचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. इथं हे सांगणं चुकीचं होणार नाही की, त्यांनी जगाला श्रमाच्या प्रतिष्ठेचा खरा अर्थ समजावून सांगितला. ते म्हणत असत-

मन चंगा तो कठौती मे गंगा

याचा अर्थ, आपलं मन आणि हृदय पवित्र असेल तर साक्षात ईश्वर आपल्या हृदयात वास करत असतो. संत रविदासजी यांच्या संदेशांनी प्रत्येक स्तरातल्या, प्रत्येक वर्गातल्या लोकांना प्रभावित केलं आहे. मग त्यात चित्तोडचे महाराजा आणि राणी असो की मीराबाई असो, सर्व त्यांचे अनुयायी होते,

मी पुन्हा एकदा संत रविदासजी यांना वंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, किरण सिदर यांनी माय गव्ह वर लिहिल आहे की, मी भारताचा अंतराळ कार्यक्रम आणि त्याच्या भविष्याशी संबंधित पैलूंवर प्रकाश टाकावा.मी विद्यार्थ्यांना अंतराळ कार्यक्रमात रस घेऊन आणि काही वेगळा विचार करून आकाशापेक्षाही पुढे जाण्याचा विचार करण्याचा आग्रह करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. किरणजी, मी आपले हे विचार आणि विशेषतः आपल्या मुलांसाठी दिलेल्या या संदेशाची प्रशंसा करतो.

काही दिवसांपूर्वी, मी अहमदाबादमध्ये होतो, जेव्हा मला डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य प्राप्त झालं. डॉक्टर विक्रम साराभाई यांचं भारताच्या अंतराळ कार्यक्रमात एक महत्वपूर्ण योगदान राहिलं आहे.आमच्या अंतराळ कार्यक्रमात देशातल्या असंख्य युवा वैज्ञानिकांचं योगदान आहे. आज आमच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले सॅटेलाईट्स आणि साऊंडिंग रॉकेट्स अंतराळात पोहोचत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. याच 24 जानेवारीला आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं कलाम-सेट लॉंच केलं आहे. ओदिशामध्ये विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले साऊंडिंग रॉकेट्सनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून 2014 पर्यंत जितक्या अंतराळ मोहिमा झाल्या आहेत, जवळपास तितक्याच अंतराळ मोहिमांची सुरुवात गेल्या चार वर्षांत झाली आहे. आम्ही एकाच अंतराळ यानातून 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रमही केला आहे. आम्ही लवकरच चांद्रयान-2 मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर भारताची उपस्थिती दाखवणार आहोत.

आमचा देश, अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग जीवित आणि मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी उत्तम तर्हेने करत आहे. चक्रीवादळ असो की रेल्वे आणि रस्ते सुरक्षा, या सर्वांत अंतराळ तंत्रज्ञानाची चांगली मदत होत आहे. आमच्या मच्छिमार बांधवांना नेविक डिव्हाईस देण्यात आले आहेत, जे त्यांच्या सुरक्षेसह आर्थिक उन्नतीसाठीही सहाय्यक आहेत. आम्ही अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर सरकारी सेवांचं वितरण आणि उत्तरदायित्व अधिक चांगलं करण्यासाठी करत आहोत. हौसिंग फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी घरं या योजनेत जवळपास 23 राज्यांमध्ये सुमारे 40 लाख घरांना जिओ टॅग करण्यात आलं आहे. याचबरोबर, मनरेगाच्या अंतर्गत जवळपास साडेतीन कोटी मालमत्तानाही जिओ टॅग केलं गेलं आहे. आमचे सॅटेलाईट्स आज देशाच्या वाढत्या शक्तीचं प्रतिक बनले आहेत. जगातील अनेक देशांशी आमचे उत्कृष्ट संबंध होण्यात त्याचं योगदान मोठं आहे. दक्षिण आशिया सॅटेलाईट्स तर एक अद्वितीय पुढाकार राहिला आहे, ज्यामुळे आमच्या शेजारी मित्र राष्ट्रांनाही विकासाची भेट दिली आहे. आपल्या असीम स्पर्धात्मक लॉंच सेवेच्या माध्यमातून भारत आज केवळ विकसनशील देशच नव्हे तर विकसित देशांचे सॅटेलाईट्सही लॉंच करतो. मुलांसाठी आकाश आणि तारे नेहमीच मोठे आकर्षण असतात. आमचा अंतराळ कार्यक्रम मुलांनी वेगळा विचार करून आतापर्यंत ज्या मर्यादाच्या पुढे जाणं अशक्य वाटत होतं, त्याही पुढे जाण्याची संधी देतो.आमच्या मुलांनी तारे न्याहाळत राहण्याबरोबरच, नवीन नवीन तार्यांचा शोध लावण्यासाठी आणि प्रेरित करण्याचा आमचा दृष्टीकोन आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मी नेहमीच सांगतो की, जो खेळेल तो खुलेल आणि यंदा खेलो इंडियामध्ये खूप सारे तरुण आणि युवा खेळाडू खुलून समोर आले आहेत. जानेवारी महिन्यात पुण्यात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 18 खेळांमध्ये सुमारे 6,000 खेळाडूंनी भाग घेतला. जेव्हा आमच्या स्पोर्ट्सची स्थानिक परिस्थिती मजबूत होईल म्हणजे जेव्हा आमचा पाया मजबूत होईल तेव्हाच आमचे युवा खेळाडू देश आणि जगात आपल्या क्षमतांचं सर्वोत्तम प्रदर्शन करू शकतील. जेव्हा स्थानिक पातळीवर खेळाडू सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करेल, तेव्हाच तो जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करेल. यावेळी खेलो इंडिया मध्ये प्रत्येक राज्यातल्या खेळाडूंनी आपापल्या स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. पदक जिंकणाऱ्या अनेक खेळाडूंचं जीवन जबरदस्त प्रेरणा देणारं आहे.

मुष्टीयुद्धात युवक खेळाडू आकाश गोरखा यानं रजत पदक जिंकलं. मी वाचलं की, आकाशचे वडील, रमेशजी, पुण्यात एका संकुलात चौकीदाराचं काम करतात. ते आपल्या कुटुंबासह एका पार्किंग शेडमध्ये राहतात. महाराष्ट्राची 21 वर्षाखालील महिला कबड्डी संघाची कप्तान सोनाली हेल्वी सातार्याची राहणारी आहे खूप लहानपणी तिचे वडील  गेले आणि तिचा भाऊ आणि तिच्या आईन सोनालीच्या कौशल्याला प्रोत्साहन दिलं. नेहमीच असं पाहण्यात येतं की, कबड्डीसारख्या खेळामध्ये मुलीना इतकं प्रोत्साहन मिळत नाही. अस असूनही, सोनालीनं कबड्डीची निवड केली आणि उत्कृष्ट प्रदर्शन केलं. असनसोलच्या दहा वर्षाचा अभिनव शॉ, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा सुवर्ण पदक विजेता आहे. कर्नाटकातल्या एका शेतकर्याची मुलगी अक्षता बासवाणी कमती हिनं वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिकलं. तिनं आपल्या विजयाचं श्रेय आपल्या वडलाना दिलं. त्यांचे वडील बेळगावात शेतकरी आहेत. जेव्हा आम्ही भारत निर्माणाची गोष्ट करतो तेव्हा युवा शक्तीच्या संकल्पाचा तर नवीन भारत न्यू इंडिया आहे. न्यू इंडिया-नव्या भारताच्या निर्माणात केवळ मोठ्या शहरांच योगदान नाही तर लहान शहरं, गावं, कसब्यातून येणारे युवक, मुलं, यंग स्पोर्टिंग टॅलेंट्स, यांचंही मोठं योगदान आहे, हेच खेलो इंडियाच्या या कहाण्या सांगत आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण अनेक प्रतिष्ठित ब्युटी कॉंटेस्टच्या बाबतीत ऐकलं असेल.पण आपण टॉयलेट चमकवण्याच्या स्पर्धेबद्दल कधी ऐकलं आहे का? अरे गेल्या जवळपास महिनाभरापासून सुरु असलेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत 50 लाखाहून अधिक शौचालयांनी भाग घेतला आहे. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचं नाव आहे स्वच्छ सुंदर शौचालय. लोक आपली शौचालयं स्वच्छ ठेवण्याबरोबरच त्यांची रंगरंगोटी करून, काही पेंटिंग बनवून सुंदर बनवत आहेत. आपल्याला काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ ते कामरूपपर्यंत स्वच्छ सुंदर शौचालयांची छायाचित्रं सोशल मिडियावरही  कितीतरी पाहायला मिळतील. मी सर्व सरपंच आणि गाव प्रमुखांना आपल्या पंचायतीत या मोहिमेचं नेतृत्व करण्याचं आवाहन करतो. आपल्या स्वच्छ सुंदर शौचालयाचं छायाचित्र #Mylzzatghar सह सोशल मिडियावर अवश्य टाकावं.

मित्रांनो, 2 ऑक्टोबर, 2014 रोजी आपण देशाला स्वच्छ आणि उघड्यावरील शौचापासून  मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून एक कायम लक्षात राहील, असा प्रवास सुरु केला. भारतातल्या प्रत्येक जणाच्या सहकार्यानं आज भारत 2 ऑक्टोबर, 2019 च्या खूप अगोदर, उघड्यावरील शौचापासून मुक्त होण्याच्या दिशेनं अग्रेसर आहे, ज्यामुळे बापुंना त्यांच्या 150 व्या जयंतीला श्रद्धांजली अर्पण करू शकू.

स्वच्छ भारताच्या या अविस्मरणीय प्रवासात `मन की बात’ च्या श्रोत्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे आणि म्हणून तर आपण सर्वापुढे हे जाहीर करण्यात मला आनंद होत आहे की, पाच लाख पन्नास हजार गावं आणि 600 जिल्ह्यांनी स्वतःला उघड्यावरील शौचापासून मुक्त घोषित केलं आहे आणि ग्रामीण भारतात स्वच्छता कव्हरेज 98 टक्के ओलांडून पुढे गेलं आहे. आणि सुमारे 9 कोटी परिवारांसाठी शौचालयांची सुविधा प्राप्त करून देण्यात आली आहे.

माझ्या छोट्या दोस्तांनो, परीक्षांचे दिवस आता येणार आहेत. हिमाचल प्रदेशचे रहिवासी अंशुल शर्मा यांनी  MyGov वर लिहिलं आहे की, मला परीक्षा आणि परीक्षा योद्ध्यांविषयी बोललं पाहिजे. अंशुल जी, हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद. अनेक परीवारांसाठी वर्षाचा पहिला भाग परीक्षांचा मोसम असतो. विद्यार्थी, त्यांच्या आईवडलांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वच लोक परीक्षांशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असतात.

मी सर्व विद्यार्थी, त्यांचे आईवडील आणि शिक्षकांना शुभेच्छा देतो. मला आज या विषयावर `मन की बात’ च्या या कार्यक्रमात चर्चा करणं निश्चितच आवडलं असतं, पण आपल्याला हे ऐकून आनंद होईल की, दोन दिवसांनंतर 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता `परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी विद्यार्थ्याबरोबरच पालक आणि शिक्षकही या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. आणि यावेळी अनेक परदेशांतले विद्यार्थीही या कार्यक्रमात भाग घेतील. या `परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात परीक्षेशी संबंधित सर्व पैलू, विशेषत: stress free exam म्हणजे तणावमुक्त परीक्षेबद्दल मी आपल्या नवतरुण मित्रांशी खूप गोष्टी बोलणार आहे. यासाठी मी लोकांना इनपुट आणि आयडिया पाठवण्याचा आग्रह केला होता आणि मला आनंद आहे की, खूप मोठ्या संख्येनं MyGov वर लोक आपले विचार व्यक्त करत आहेत. यापैकी काही विचार आणि सूचना टाऊन हॉलमधल्या कार्यक्रमात मी निश्चितच आपल्या समोर ठेवणार आहे. आपण अवश्य या कार्यक्रमात भाग घ्यावा. …सोशल मीडिया आणि नमो ॲपच्या माध्यमातनं आपण त्याचं लाईव्ह प्रसारणही पाहू शकता.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 30 जानेवारी पूज्य बापूंची पुण्यतिथी आहे. 11 वाजता संपूर्ण देश हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपणही दोन मिनिटे शहीदाना श्रद्धांजली अर्पण करा.पूज्य बापूंचं पुण्यस्मरण करा आणि पूज्य बापूंचं स्वप्न साकार करणं, नव्या भारताचं निर्माण करणं,नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांचं पालन करणं-या संकल्पासह आपण पुढे जाऊ या. 2019 ची ही यात्रा यशस्वीपणे पुढे नेऊ या. माझ्या आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
In a historic first, Constitution of India translated in Kashmiri

Media Coverage

In a historic first, Constitution of India translated in Kashmiri
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Cabinet approves Rs 1,526.21 crore upgrade of NH-326 in Odisha
December 31, 2025

The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi today approved the widening and strengthening of existing 2-Lane to 2-Lane with Paved Shoulder from Km 68.600 to Km 311.700 of NH-326 in the State of Odisha under NH(O) on EPC mode.

Financial implications:

The total capital cost for the project is Rs.1,526.21 crore, which includes a civil construction cost of Rs.966.79 crore.

Benefits:

The upgradation of NH-326 will make travel faster, safer, and more reliable, resulting in overall development of southern Odisha, particularly benefiting the districts of Gajapati, Rayagada, and Koraput. Improved road connectivity will directly benefit local communities, industries, educational institutions, and tourism centres by enhancing access to markets, healthcare, and employment opportunities, thereby contributing to the region’s inclusive growth.

Details:

  • The section of Mohana–Koraput of the National Highway (NH-326) at present have sub-standard geometry (intermediate lane/2-lane, many deficient curves and steep gradients); the existing road alignment, carriageway width and geometric deficiencies constrain safe, efficient movement of heavy vehicles and reduce freight throughput to coastal ports and industrial centres. These constraints will be removed by upgrading the corridor to 2-lane with paved shoulders with geometric corrections (curve realignments and gradient improvements), removal of black spots and pavement strengthening, enabling safe and uninterrupted movement of goods and passengers and reducing vehicle operating costs.
  • The upgradation will provide direct and improved connectivity from Mohana–Koraput into major economic and logistics corridors — linking with NH-26, NH-59, NH-16 and the Raipur–Visakhapatnam corridor and improving last-mile access to Gopalpur port, Jeypore airport and several railway stations. The corridor connects important industrial and logistic nodes (JK Paper, Mega Food Park, NALCO, IMFA, Utkal Alumina, Vedanta, HAL) and education/tourism hubs (Central University of Odisha, Koraput Medical College, Taptapani, Rayagada), thereby facilitating faster freight movement, reducing travel time and enabling regional economic development.
  • The project lies in southern Odisha (districts of Gajapati, Rayagada and Koraput) and will significantly improve intra-state and inter-state connectivity by making vehicle movement faster and safer, stimulating industrial and tourism growth and improving access to services in aspirational and tribal areas. Economic analysis shows the project’s EIRR at 17.95% (base case) while the financial return (FIRR) is negative (-2.32%), reflecting the social and non-market benefits captured in the economic appraisal; the economic justification is driven largely by travel-time and vehicle-operating-cost savings and safety benefits (including an estimated travel-time saving of about 2.5–3.0 hours and a distance saving of ~12.46 km between Mohana and Koraput after geometric improvements).

Implementation strategy and targets:

  • The work will be implemented on EPC mode. Contractors will be required to adopt proven construction and quality-assurance technologies, which may include precast box-type structures and precast drains, precast RCC/PSC girders for bridges and grade separators, precast crash barriers and friction slabs on Reinforced-Earth wall portions, and Cement Treated Sub-Base (CTSB) in pavement layers. Quality and progress will be verified through specialized survey and monitoring tools such as Network Survey Vehicle (NSV), periodic drone-mapping. Day-to-day supervision will be carried out by an appointed Authority Engineer and project monitoring will be conducted through the Project Monitoring Information System (PMIS).
  • The work is targeted to be completed in 24 months from the appointed date for each package, followed by a five-year defect liability/maintenance period (total contract engagement envisaged as 7 years: 2 years construction + 5 years DLP). Contract award will follow after completion of statutory clearances and required land possession.

Major impact, including employment generation potential:

  • This project is aimed at providing faster and safer movement of traffic and improving connectivity between the southern and eastern parts of Odisha, particularly linking the districts of Gajapati, Rayagada, and Koraput with the rest of the State and neighbouring Andhra Pradesh. The improved road network will facilitate industrial growth, promote tourism, enhance access to education and healthcare facilities, and contribute to the overall socio-economic development of the tribal and backward regions of southern Odisha.
  • Various activities undertaken during the construction and maintenance period are expected to generate significant direct and indirect employment opportunities for skilled, semi-skilled and unskilled workers. The project will also boost local industries involved in the supply of construction materials, transportation, equipment maintenance, and related services, thus supporting the regional economy.
  • The project is located in the State of Odisha and traverses three districts — Gajapati, Rayagada, and Koraput. The corridor connects major towns such as Mohana, Rayagada, Laxmipur, and Koraput, providing improved intra-state connectivity within Odisha and enhancing inter-state linkage with Andhra Pradesh through the southern end of NH-326.

Background:

Government has declared the stretch “the Highway starting from its junction with NH-59 near Aska, passing through Mohana, Raipanka, Amalabhata, Rayagada, Laxmipur and terminating at its junction with NH-30 near Chinturu in the State of Odisha” as NH-326 vide Gazette Notification dated 14th August 2012.