अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी भेट घेतली.

परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन यांनी राष्ट्राध्यक्ष बायडन आणि उपाध्यक्ष हॅरिस यांच्या वतीने पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. या भेटीपूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार  यांच्याशी केलेल्या फलदायी देवाणघेवाणीविषयी पंतप्रधानांना माहिती दिली आणि संरक्षण, सागरी सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, हवामान बदल आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात भारत अमेरिका दरम्यानचे धोरणात्मक संबंध आणखी मजबूत करण्याची दृढ वचनबद्धता व्यक्त केली.

पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष बायडन आणि उपाध्यक्ष हॅरिस यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कोविड -19 विरुद्ध लढा आणि हवामान बदलाशी संबंधित राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी घेतलेल्या पुढाकारांबद्दल कौतुक केले.

परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात विविध द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्यांवरील वाढते  एकमत आणि या त्याला ठोस आणि व्यावहारिक सहकार्यात रूपांतरित करण्यासाठी उभयपक्षी धोरणात्मक भागीदारीच्या बांधिलकीचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिका आणि भारत येथील समाज  लोकशाही, स्वातंत्र्य आणि मुक्तता या मूल्यांविषयी सखोल प्रतिबद्धता दर्शवितात आणि अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांनी  द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की कोविड -19 मुळे निर्माण झालेली आव्हाने, जागतिक आर्थिक पुनर्प्राप्ती आणि हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही वर्षांत भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी जागतिक पातळीवर अधिक महत्त्वपूर्ण ठरेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Parliament passes Jan Vishwas Bill 2026, decriminalising 717 offences, fines up to Rs 1 crore

Media Coverage

Parliament passes Jan Vishwas Bill 2026, decriminalising 717 offences, fines up to Rs 1 crore
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 एप्रिल 2026
April 03, 2026

India’s Sweet, Fast & High-Tech Revolution: FY26 Milestones That Signal Viksit Bharat Has Arrived