विकसित भारताच्या संकल्पनेसाठी, पूर्व भारताचा विकास ही प्राथमिकता आहे आणि या ध्येयाने केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे: पंतप्रधान
काल, देशातील पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे पश्चिम बंगालमधून सुरू करण्यात आली; राज्याला जवळपास अर्धा डझन नवीन अमृत भारत जलदगती रेल्वेगाड्या देखील मिळाल्या आहेत आणि आज आणखी तीन अमृत भारत जलद रेल्वेगाड्यांचे परिचालन सुरू झाले आहे: पंतप्रधान
बालागढ येथे बांधली जाणारी विस्तारित बंदर प्रवेशद्वार प्रणाली हुगळी आणि आसपासच्या भागासाठी नवीन संधींचे मार्ग उघडेल: पंतप्रधान
आज भारत बहुविध वाहतूक जोडणी आणि हरित गतीशीलता यावर विशेष भर देत आहे; अखंड वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बंदरे, नदी जलमार्ग, महामार्ग आणि विमानतळ हे सर्व एकमेकांशी जोडले जात आहेत: पंतप्रधान

पश्चिम बंगालचे राज्यपाल सीवी आनंद बोस, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल, सुकांता मजुमदार, शांतनू ठाकूर, संसदेतील माझे मित्र शौमिक भट्टाचार्य, सौमित्र खान, पश्चिम बंगालच्या विधान सभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी, अन्य लोकप्रतिनिधी आणि बंधुभगिनींनो!

काल मी मालदामध्ये होतो आणि आज इथे हुगळीमध्ये तुमच्याशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले आहे. विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास हे उद्दीष्ट ठेवून केंद्र सरकार सातत्यान  काम करत आहे. कालचा आणि आजचा कार्यक्रम हाच निर्धार बळकट करणारे आहेत. या दोन दिवसांत पश्चिम बंगालमधील करोडो रुपयांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. देशातली पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे काल पश्चिम बंगालमधून सुरू झाली. बंगालमध्ये जवळपास अर्धा डझन नवीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत आणि आज आणखी तीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या. यातील एका रेल्वेमुळे काशी वाराणसी या माझ्या मतदारसंघाची पश्चिम बंगालसोबतची संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होणार आहे.  शिवाय, दिल्ली आणि तमिळनाडूमध्ये जाणाऱ्या अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील रेल्वे वाहतुकीसाठी हे दोन दिवस अभूतपूर्व असेच म्हणावे लागतील. गेल्या 100 वर्षांत 24 तासांत इतके काम कदाचित कधीच झाले नसेल.

 

मित्रांनो,

बंगालमध्ये जलमार्ग तयार होऊ शकतात आणि केंद्र सरकार यासाठीही काम करत आहे. इथे बंदर आधारित विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी केंद्र सरकार मदतदेखील करत आहे. थोड्याच वेळापूर्वी बंदर आणि जलमार्गाशी संबंधित विकास प्रकल्पांचेही भूमीपूजन तसेच उद्घाटन करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या विकासासाठी, भारताच्या विकासासाठी हे प्रकल्प खूप महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांच्या आधारे पश्चिम बंगालमधे उत्पादन, व्यापार आणि मालवाहतूक तसेच साठवणुकीचे मोठे केंद्र उभारले जाऊ शकते. या सर्व प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो,

बंदर आणि त्याच्याशी निगडीत परिसंस्था विकसित करण्यावर आपण जितका भर देऊ तितकी जास्त रोजगार निर्मिती इथे होईल. केंद्र सरकारने गेल्या 11 वर्षांमध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्टची क्षमता वाढविण्यासाठी खूप मोठी गुंतवणूक केली आहे. या बंदराला जोडणारी संपर्कव्यवस्था मजबूत करण्यासाठी सागरमाला योजनेअंतर्गत रस्तेदेखील बांधले आहेत. या सगळ्याचा परिणाम आज आपल्याला दिसून येत आहे. गेल्या वर्षी कोलकता बंदराने मालवाहतूक आणि साठवणुकीचे नवे विक्रम प्रस्थापित केले.  

 

मित्रांनो,

बालागडमध्ये उभारण्यात येत असलेल्या विस्तारित बंदर प्रवेश प्रणालीमुळे हुगळी आणि आसपासच्या परिसरात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. कोलकता शहरातील वाहतूक आणि मालसाठवणुकीवरचा ताणदेखील यामुळे कमी होईल. गंगा नदीवरील जलमार्गामुळे मालवाहतूक आणखी वाढेल. या सर्व पायाभूत सुविधांच्या आधारे हुगळी मालसाठवणूक आणि व्यापाराचे केंद्र होऊ शकेल. यातून इथे करोडो रुपयांची गुंतवणूक होईल, हजारो युवकांना रोजगार मिळेल, छोटे व्यापारी आणि माल वाहतूकदारांचा फायदा होईल तसेच शेतकरी आणि उद्योजकांसाठी नव्या बाजारपेठा खुल्या होतील.

मित्रांनो,

आम्ही देशात बहुआयामी संपर्कव्यवस्था आणि हरित वाहतूक व्यवस्था उभारण्यावर जास्त भर देत आहोत. सुरळीत माल वाहतुकीसाठी बंदर, नदीतील जलमार्ग, महामार्ग आणि विमानतळ एकमेकांशी जोडले जात आहेत. यामुळे माल वाहतूक आणि साठवणुकीसाठी लागणार वेळ आणि पैसे या दोन्हीमध्ये बचत होत आहे.

 

मित्रांनो,

आपली वाहतूक व्यवस्था पर्यावरणपूरक असावी म्हणूनही आम्ही प्रयत्न करतो. हायब्रिड इलेक्ट्रिक नावेमुळे नदीतील वाहतूकीबरोबरच हरित वाहतूक व्यवस्थादेखील सक्षम होईल. हुगळी नदीतून प्रवास सोपा होईल, प्रदूषण कमी होईल आणि जल पर्यटनालाही चालना मिळेल.

 

मित्रांनो,

मत्स्यव्यवसाय आणि सागरी खाद्यान्नाच्या निर्मिती आणि निर्यातीत भारत आता वेगाने प्रगती करत आहे. पश्चिम बंगालने या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करावे, असे माझे स्वप्न आहे. नदी जलमार्गांच्या बाबतीतल्या उद्दीष्टपूर्तीसाठी केंद्र सरकार पश्चिम बंगालला प्राधान्याने मदत करत आहे. याचा लाभ इथल्या शेतकऱ्यांसह मच्छिमारांनाही होत आहे.

मित्रांनो,

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या सर्व प्रकल्पांमुळे पश्चिम बंगालच्या विकासाला गती मिळेल. या प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. इथे जवळच हजारो लोक बराच वेळापासून माझी वाट पहात आहेत, त्यांच्याशीदेखील मला बरेच काही बोलायचे आहे. ते ऐकण्यासाठी कदाचित लोक जास्त उत्सुक असतील, तिथे जरा जास्त मोकळेपणाने बोलेन. म्हणूनच माझे भाषण आटोपते घेतो. पुढच्या सभेला जाण्यासाठी आता अनुमती द्या. सर्वांना खूप खूप धन्यवाद.  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s gem and jewellery exports surge 26% in June

Media Coverage

India’s gem and jewellery exports surge 26% in June
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister extends best wishes to Skyroot Aerospace
July 18, 2026
Prime Minister invites citizens to witness launch of Orbital Launch Vehicle, Vikram-1

Prime Minister Shri Narendra Modi, today, extended his best wishes to Skyroot Aerospace ahead of the maiden orbital launch of Vikram-1, India's first privately developed launch vehicle, describing it as a historic milestone in the nation's space journey. Shri Modi said that the launch of Vikram-1 marks the opening of a new frontier for India's space ambitions and reflects the country's growing capabilities in innovation, technology and entrepreneurship.

The Prime Minister also urged citizens, particularly the youth, to witness this landmark mission.

The Prime Minister posted on X:

A historic new frontier for India’s space journey!

At 11:30 AM today, Skyroot Aerospace will undertake the maiden orbital launch of Vikram-1, India’s first privately developed launch vehicle.

This four-stage rocket is designed to provide rapid and on-demand launch services. This mission highlights the talent, determination and entrepreneurial spirit of our youth. It also shows how our space-sector reforms are unlocking new opportunities for innovation and enterprise.

My best wishes to the entire Skyroot Aerospace team for a successful launch. May Vikram-1 soar high, create history and inspire a generation of innovators.

I urge all Indians, especially my young friends, to follow this historic mission and join in wishing Team Skyroot success using #IndiaWithVikram1.

@SkyrootA