3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
सनथनगर-मौला अली रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणासह सहा नवीन स्थानकांच्या इमारतींचे केले उद्घाटन
घाटकेसर-लिंगमपल्ली मार्गे मौला अली-सनथनगर येथून
एमएमटीएस रेल्वे सेवेला दाखवला हिरवा झेंडा
इंडियन ऑईल पारादीप-हैदराबाद उत्पादन वाहिनेचे उद्घाटन
हैदराबाद येथे नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थेच्या (सी. ए. आर. ओ.) केंद्राचे उद्घाटन
"राज्यांच्या विकासाच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासाच्या मंत्रावर माझा विश्वास"
"आजच्या प्रकल्पांमुळे 'विकसित तेलंगणा' च्या माध्यमातून 'विकसित भारत' साध्य करण्यात होईल मदत" "हैदराबादमधील बेगमपेट विमानतळावरील नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थेचे (सी. ए. आर. ओ.) केंद्र, अशा आधुनिक मानकांवर आधारित या प्रकारचे पहिलेच केंद्र"

तेलंगणाच्या राज्यपाल तामिलीसै सौंदरराजन, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे साथीदार किशन रेड्डीजी, तेलंगणा सरकारातील मंत्री कोंडा सुरेखा जी,  के वेंकट रेड्डीजी, संसदेतील माझे मित्र डॉक्टर के. लक्ष्मणजी अन्य सर्व मान्यवर,  महिला आणि सज्जन हो!

 

संगारेड्डी प्रजालकु न नमस्कारम्।

तेलंगणाला विकासाच्या नव्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकार गेल्या दहा वर्षापासून सातत्याने काम करत आहे. या मोहिमेंतर्गत आज मी सलग दुसऱ्या दिवशी आपणा सर्वांमध्ये, तेलंगणात आहे. काल आदिलाबादहून मी तेलंगणा आणि देशासाठी जवळपास 56 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांच्या प्रकल्पांंचा आरंभ केला. आज मला संगारेड्डीच्या जवळच 7000 कोटी रुपयांच्या परियोजनांचे लोकार्पण तसेच भूमीपूजनाची संधी मिळाली आहे. महामार्ग , रेल्वे आणि हवाई मार्ग यांच्याशी संलग्न अशा आधुनिक पायाभूत सुविधांचे काम यामध्ये आहे. पेट्रोलियमचे संबंधित  प्रकल्प सुद्धा यात आहेत.

गतकाळातही ज्या विकास कामांचा लाभ तेलंगणाला मिळाला,  ती कामे ऊर्जा आणि पर्यावरणापासून पायाभूत सुविधांपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित होती. राज्याच्या विकासातून देशाचा विकास या माझ्या भावना आहेत. आमची कामाची हिच पद्धत आहे आणि याच संकल्पना घेऊन केंद्र सरकार तेलंगणाची सेवा करत आहे. मी आज या क्षणाला आपणा सर्वांचे आणि सर्व तेलंगणावासियांचे या विकास कामांबद्दल खूप खूप अभिनंदन करतो.

मित्र हो,

आज तेलंगणा ला हवाई क्षेत्रातील एक मोठी भेट मिळाली आहे. हैदराबादच्या बेगमपेठ विमानतळावर हवाई उड्डाण संशोधन संस्था म्हणजेच ‘कारो’ची स्थापना केली केली आहे. एक प्रकारे देशातील हे पहिले असे हवाई उड्डाण केंद्र आहे जे आधुनिक निकषांवर उभारले आहे. हैदराबाद आणि तेलंगणाला या केंद्रामुळे एक नवी ओळख मिळेल. हवाई उड्डाण क्षेत्रात नवीन झेप घेण्याचे मार्ग तेलंगणातील युवकांना यामुळे मिळतील. देशातील हवाई प्रवासाच्या विकासासाठी यामुळे एक नवीन मंच मिळेल, मजबूत जमीन मिळेल. भारत आज ज्या प्रकारे हवाई उड्डाण क्षेत्रात नवीन विक्रम करत आहे, ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षात देशातील विमानतळांची संख्या दुप्पट झाले आहे, ज्या प्रकारे या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत,त्याप्रमाणे या सर्व शक्यता अजून विस्तारण्यात हैदराबादची ही आधुनिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

 

मित्र हो,

140 कोटी देशवासीयांनी आज विकसित भारताच्या निर्माणाचा संकल्प केला आहे, आणि विकसित भारतासाठी आधुनिक पायाभूत सुविधा असणे तेवढेच गरजेचे आहे. म्हणून या वर्षाच्या अर्थसंकल्पात आम्ही पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख कोटी रुपये दिले आहेत. तेलंगणाला याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा असाच आमचा प्रयत्न आहे. आज इंदोर हैदराबाद आर्थिक कॉरिडॉरच्या महत्वपूर्ण भागाच्या निमित्ताने नॅशनल हायवेचा विस्तार झाला आहे. कंडी ते रासमपल्ले हा भाग लोकांच्या सेवेत समर्पित केला गेला आहे. याच प्रकारे मिरयालगुडा ते कोडाड हा भाग सुद्धा पुर्ण केला आहे. त्यामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लोकांना ये जा करण्याची सुविधा मिळेल. यामुळे सिमेंट आणि कृषीशी संबंधित उद्योगांचाही फायदा होईल. आज इथे संगारेड्डी आणि  मदिनागुडा यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची आधारशीलासुद्धा ठेवली गेली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होईल तेव्हा तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यामधील कनेक्टिव्हिटी अधिक वाढेल. 1300 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला वेग येईल.

मित्र हो,

तेलंगणाला दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते. तेलंगणातील रेल्वे सुविधा अधिक उत्तम करण्यासाठी विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाचे कामसुद्धा वेगाने सुरू आहे. सनतनगर ते मौलाअली मार्गावर दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाबरोबरच सहा नवीन स्थानकेसुद्धा उभारली गेली आहेत. आज इथून घटकेसर लिंगपल्लीच्यामध्ये एमएमटीएस रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला गेला आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे आता हैदराबाद आणि सिकंदराबादमधील अजून काही भाग आपापसात जोडले जातील. या दोन्ही शहरांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होईल.

 

मित्र हो,

पारादीप - हैदराबाद पाईपलाईन प्रकल्प देशाला अर्पण करण्याचे भाग्य ही मला आज लाभले आहे. याच्या माध्यमातून पेट्रोलियम उत्पादने कमी खर्चात आणि सुरक्षित पद्धतीने घेऊन जाण्याची सुविधा मिळेल. शाश्वत विकासाच्या आमच्या संकल्पनांना हा प्रकल्प मजबुती देईल. येणाऱ्या काळात विकसित तेलंगणा ते विकसित भारत या अभियानाला आम्ही अजून वेग देऊ.

मित्र हो,

हा छोटासा सरकारी कार्यक्रम इथे संपन्न होत आहे मी आता आजूबाजूच्या जनता जनार्दनामध्ये जाणार आहे.तिथेही या विषयात लोकांना काही अधिक ऐकायचे आहे. तिथे आता दहा मिनिटानंतर होणाऱ्या जनसभेत मी काही गोष्टी विस्ताराने सांगेन. परंतु आत्तासाठी एवढेच आणि आपणा सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद!

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
PM Modi greets nation on Dev Deepawali, shares pictures of Varanasi ghats

Media Coverage

PM Modi greets nation on Dev Deepawali, shares pictures of Varanasi ghats
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 नोव्हेंबर 2025
November 06, 2025

Appreciation for PM Modi’s Leadership From Kashi’s Million Diyas to World Cup Victory – This is Viksit Bharat on Kartik Purnima!