रोजगार मेळे युवा वर्गाचे सक्षमीकरण करत आहेत आणि त्यांच्या क्षमतांचा सुयोग्य वापर करत आहेत,नवनियुक्तांना माझ्याकडून शुभेच्छा : पंतप्रधान
भारताचा आजचा युवा वर्ग नव्या आत्मविश्वासाने भरलेला आहे, प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहेः पंतप्रधान
नव्या भारताची उभारणी करण्यासाठी एका आधुनिक शिक्षण प्रणालीची देशाला अनेक दशकांपासून प्रतीक्षा होती,राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून देश आता त्या दिशेने आगेकूच करत आहे : पंतप्रधान
आज आमच्या सरकारची ही धोरणे आणि निर्णयांमुळे, ग्रामीण भारतातही रोजगारांच्या आणि स्वयंरोजगारांच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, त्यांना त्यांच्या पसंतीचे काम करण्याची एक संधी प्राप्त झाली आहे : पंतप्रधान

नमस्कार!

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाच्या कानाकोपऱ्यात उपस्थित इतर मान्यवर आणि माझ्या युवा मित्रहो,

मी काल रात्री उशिरा कुवेतहून परत आलो आहे… तिथे मी भारतीय युवा आणि व्यावसायिकांची भेट घेतली आणि खूप गप्पा मारल्या. आता इथे आल्यानंतर माझा पहिला कार्यक्रम देशातील युवा वर्गासोबत आयोजित केला आहे. हा अतिशय सुखद योगायोग आहे. आज देशातील हजारो युवांसाठी,आपणा सर्वांच्या आयुष्याची नवी सुरुवात होते आहे. तुमचे कित्येक वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे, वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीला यश आले आहे. 2024  हे सरणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नवीन आनंद देऊन जाते आहे. मी तुम्हा सर्व युवांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो.

 

मित्रहो,

भारतातील युवा वर्गाची क्षमता आणि प्रतिभा यांचा पुरेपूर वापर करणे, ही आमच्या सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आम्ही या दिशेने सातत्याने काम करत आहोत. गेल्या 10 वर्षांपासून सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये सरकारी नोकऱ्या देण्याची मोहीम सुरू आहे. आजही 71 हजारपेक्षा जास्त युवक-युवतींना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. गेल्या दीड वर्षात आमच्या सरकारने सुमारे 10 लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. हा एक मोठा विक्रम आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारच्या काळात भारत सरकारमध्ये अशा मिशन मोडमध्ये तरुणांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या नाहीत. मात्र आज देशातील लाखो युवक-युवतींना सरकारी नोकऱ्याच मिळत आहेत, असं नाही तर या नोकऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने दिल्या जात आहेत. या पारदर्शी परंपरेतून येणारे युवक-युवतीसुद्धा पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे देशसेवा करत आहेत याचा मला आनंद वाटतो.

मित्रहो

कोणत्याही देशाचा विकास हा तेथील युवक-युवतींची मेहनत, क्षमता आणि नेतृत्वातून होत असतो. भारताने 2047 सालापर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे वचन दिले आहे. आमचा या संकल्पावर विश्वास आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करू असा विश्वास आम्हाला वाटतो. भारतातील प्रतिभावान युवक-युवती भारताचे प्रत्येक धोरण आणि प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी असतात. तुम्ही गेल्या दशकातील धोरणे पहा, मेक इन इंडिया, स्वावलंबी भारत अभियान, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, डिजिटल इंडिया, अशा प्रत्येक योजना युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आल्या आहेत.

भारताने आपल्या अंतराळ क्षेत्रातील धोरणे बदलली, भारताने आपल्या संरक्षण क्षेत्रात उत्पादनाला चालना दिली आणि याचा सर्वाधिक फायदा भारतातील युवा वर्गाला झाला. आज भारतातील युवा वर्ग नवीन आत्मविश्वासाने भरलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात ते मुसंडी मारत आहेत. आज आपण जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इको-सिस्टम बनली आहे. आज, जेव्हा एखादा तरुण स्वत:चा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी एक संपूर्ण परिसंस्था मिळते. आज युवा वर्ग जेव्हा खेळात करिअर करण्याचा विचार करतो, तेव्हा तो अपयशी ठरणार नाही, असा आत्मविश्वास त्याच्यात असतो. आज प्रशिक्षणापासून ते क्रीडा स्पर्धांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर युवा वर्गासाठी आधुनिक व्यवस्था केली जात आहे. आज आपण अनेक क्षेत्रांमध्ये संपूर्ण परिवर्तन पाहत आहोत. आज भारत मोबाईल उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. आज अक्षय ऊर्जेपासून ते सेंद्रिय शेतीपर्यंत, अवकाश क्षेत्रापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत, पर्यटनापासून ते आरोग्यापर्यंत, प्रत्येक क्षेत्रात देश नवीन उंची गाठत आहे आणि नवीन संधी निर्माण होत आहेत.

 

मित्रहो,

देशाची प्रगती साधण्यासाठी युवा वर्गाच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. ही जबाबदारी देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर असते. त्यामुळेच अनेक दशकांपासून देशाला नवीन भारत घडवण्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धतीची गरज भासत होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे देशाने आता त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. जी शिक्षणपद्धती पूर्वी निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना ओझे वाटत होती, ती आता त्यांना नवे पर्याय देत आहे. अटल टिंकरिंग लॅब आणि आधुनिक पीएम-श्री शाळांद्वारे लहानपणापासूनच नवोन्मेषाची मानसिकता आकाराला येत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील युवा, दलित, मागास, आदिवासी समाजातील युवा वर्गासाठी भाषा ही मोठी अडचण ठरत असे. आम्ही मातृभाषेतून अभ्यास आणि परीक्षा असे धोरण तयार केले. आज आमचे सरकार युवा वर्गाला 13 भाषांमध्ये भरती परीक्षा देण्याचा पर्याय देत आहे. सीमावर्ती जिल्ह्यातील युवा वर्गाला अधिक संधी देण्यासाठी आम्ही त्यांचा कोटा वाढवला आहे. सीमाभागातील युवा वर्गाला कायमस्वरूपी शासकीय नोकऱ्या देण्यासाठी आज विशेष भरती मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. आजच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरतीसाठी 50  हजारपेक्षा जास्त युवांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत. या सर्व युवांना मी विशेष शुभेच्छा देतो.

मित्रांनो, 

आज चौधरी चरण सिंह जी  यांची जयंती आहे.  चौधरी साहेबांना यावर्षी भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची संधी मिळाली हे आमच्या सरकारचे सद्भाग्य आहे.  मी त्यांना आदरांजली अर्पण करतो.  आजचा दिवस आपण शेतकरी दिन म्हणून साजरा करतो.  या निमित्ताने मी देशातील सर्व शेतकरी आणि अन्नदाते यांना अभिवादन करतो.

मित्रांनो, 

चौधरी साहेब म्हणायचे की भारताच्या ग्रामीण भागाची प्रगती होईल, तेव्हाच भारताची प्रगती होईल.  आज आमच्या सरकारची धोरणे आणि निर्णयांमुळे ग्रामीण भारतातही रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.  कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार मिळाला आहे, त्यांना त्यांच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळाली आहे.  जेव्हा सरकारने गोबरधन (शेण) योजने अंतर्गत देशात शेकडो गोबर गॅस प्लांट (शेणापासून ज्वलनशील वायू निर्मिती प्रकल्प) उभारले तेव्हा त्यातून वीजनिर्मिती तर झालीच शिवाय आपल्या हजारो तरुणांना रोजगारही मिळाला.  जेव्हा सरकारने देशातील शेकडो कृषी बाजारांना ई-नाम योजनेच्या माध्यमातून जोडण्याचे काम सुरू केले तेव्हाही तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या.  जेव्हा सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण  20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला,  तेव्हा त्यामुळे शेतकऱ्यांना मदत तर झालीच, सोबत साखर क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण झाल्या.  जेव्हा आम्ही सुमारे 9 हजार शेतकरी उत्पादक संघटना…एफपीओ( फार्मर प्रॉडक्ट ऑर्गनायझेशन) तयार केल्या, तेव्हा यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठ निर्माण करण्यात मदत झाली आणि ग्रामीण भागात रोजगारही निर्माण झाला.  आज सरकार अन्न साठवणुकीसाठी हजारो गोदामे बांधण्याची जगातील सर्वात मोठी योजना राबवत आहे.  या गोदामांच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.  काही दिवसांपूर्वीच सरकारने विमा सखी योजना सुरू केली आहे.  देशातील प्रत्येक नागरिकाला विमा संरक्षणाशी जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.  यामुळे देखील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.  ड्रोन दीदी अभियान ही मोहीम असो, लखपती दीदी अभियान ही मोहीम असो, बँक सखी योजना असो…या सर्व प्रयत्नांमुळे… या सर्व मोहिमांमुळे.. आपल्या कृषी क्षेत्रात आणि आपल्या ग्रामीण भागात रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत.

 

मित्रांनो

आज इथे हजारो मुलींना देखील नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. मुलींनो, तुमचे हे यश इतर महिलांना प्रेरणा देईल.  महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे.  गर्भवती महिलांना 26 आठवड्यांची रजा देण्याच्या आमच्या निर्णयामुळे लाखो मुलींची नोकरीची कारकीर्द वाचली आहे, त्यांच्या स्वप्नांचा भंग होणे टळले आहे. महिलांच्या प्रगती आड येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला आहे.   स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्षे, शाळांमध्ये स्वतंत्र (स्वतःची वेगळी) स्वच्छतागृहे नसल्यामुळे अनेक विद्यार्थिनी शाळेला मुकून अभ्यास थांबल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत होत्या. स्वच्छ भारत अभियानाच्या मध्यमातून, आम्ही या प्रश्नावर तोडगा काढला.  मुलींना त्यांच्या शिक्षणात आर्थिक समस्या येऊ नयेत याची काळजी सुकन्या समृद्धी योजनेने घेतली.  आमच्या सरकारने 30 कोटी महिलांची जन धन खाती उघडली, ज्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळू लागला.  महिलांना मुद्रा योजनेअंतर्गत, तारणा विना कर्ज मिळू लागले.  महिला संपूर्ण घर सांभाळायच्या, पण घर-मालमत्ता- संपत्ती त्यांच्या नावावर नसायच्या.  आज पीएम आवास योजने अंतर्गत उपलब्ध घरांपैकी बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत.  पोषण अभियान, सुरक्षित मातृत्व अभियान आणि आयुष्मान भारत या मोहिमांच्या माध्यमातून महिलांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहेत.  आपल्या सरकारमुळे महिलांना नारीशक्ती वंदन कायद्याच्या माध्यमातून विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण मिळाले आहे.  आज आपला समाज, आपला देश, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 

मित्रांनो

आज ज्या तरुण मित्र- मैत्रिणींना  नियुक्तीपत्रे मिळाली आहेत, ते एका नव्या प्रकारच्या सरकारी यंत्रणेचा भाग होणार आहेत.  सरकारी कार्यालये आणि सरकारी कामाची जुनी प्रतिमा गेल्या 10 वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलली आहे.  आज सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अधिक कार्यक्षमता- कर्तव्यदक्षता आणि उत्पादकता दिसून येते.  शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मन लावून काम करण्याच्या वृत्तीने आणि मेहनतीने हे यश मिळवले आहे.  शिकण्याची तळमळ आणि पुढे जाण्याची आस असल्यामुळेच तुम्ही देखील या टप्प्या पर्यंत पोहोचला आहात. तुम्ही भविष्यातही हा दृष्टिकोन असाच कायम ठेवा.  iGOT कर्मयोगी या उपक्रमाच्या  माध्यमातून तुम्हाला शिकत राहण्यासाठी खूप मदत मिळेल.  तुमच्यासाठी iGOT मध्ये 1600 हून अधिक विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.  याद्वारे तुम्ही विविध विषयांमधील अभ्यासक्रम अतिशय कमी वेळात आणि परिणामकारकतेने पूर्ण करू शकता.  तुम्ही तरुण आहात, तुम्ही देशाची ताकद आहात.  आणि, असे कोणतेही ध्येय नाही जे आमची तरुणाई साध्य करू शकत नाहीत. तुम्हाला, नव्या उर्जेसह नव्याने सुरुवात करावी लागेल.  आज नियुक्तीपत्रे मिळालेल्या तरुण-तरुणींचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो.  उज्ज्वल भविष्यासाठी, तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress

Media Coverage

Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi
March 23, 2026
Today, India is moving forward with a new confidence; Now India faces challenges head-on: PM
From the Gulf to the Global West and from the Global South to neighbouring countries, India is a trusted partner for all: PM
What gets measured gets improved and ultimately gets transformed: PM
This is the new India, It is leaving no stone unturned for development: PM

नमस्कार!

पिछले कुछ समय में मुझे एक-दो बार टीवी9 भारतवर्ष देखने का मौका मिला है। नॉर्मली भी युद्धों और मिसाइलों पर आपका बहुत फोकस होता है और आजकल तो आपको कंटेंट की ओवरफीडिंग हो रही है। बड़े-बड़े देश टीवी9 को इतना सारा कंटेंट देने पर तुले हुए हैं, लेकिन On a Serious Note, आज विश्व जिन गंभीर परिस्थितियों से गुजर रहा है, वो अभूतपूर्व है और बेहद गंभीर है। और इन स्थितियों के बीच, आज टीवी-9 नेटवर्क ने विचारों का एक बेहद महत्वपूर्ण मंच बनाया है। आज इस समिट में आप सभी India and the world, इस विषय पर चर्चा कर रहे हैं। मैं आप सबको बधाई देता हूं। इस समिट के लिए अपनी शुभकामनाएं देता हूं। सभी अतिथियों का अभिनंदन करता हूं।

साथियों,

आज जब दुनिया, conflicts के कारण उलझी हुई है, जब इन conflicts के दुष्प्रभाव पूरी दुनिया पर दिख रहे हैं, तब India and the world की बात करना बहुत ही प्रासंगिक है। भारत आज वो देश है, जिसकी अर्थव्यवस्था तेजी से आगे बढ़ रही है। 2014 के पहले की स्थितियों को पीछे छोड़कर के आज भारत एक नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहा है। अब भारत चुनौतियों को टालता नहीं है बल्कि चुनौतियों से टकराता है। आप बीते 5-6 साल में देखिए, कोरोना की महामारी के बाद चुनौतियां एक के बाद एक बढ़ती ही गई हैं। ऐसा कोई साल नहीं है, जिसने भारत की, भारतीयों की परीक्षा न ली हो। लेकिन 140 करोड़ देशवासियों के एकजुट प्रयास से भारत हर आपदा का सामना करते हुए आगे बढ़ रहा है। इस समय युद्ध की परिस्थितियों में भी भारत की नीति और रणनीति देखकर, भारत का सामर्थ्य देखकर दुनिया के अनेकों देश हैरान हैं। हमारे यहां कहावत है, सांच को आंच नहीं। 28 फरवरी से दुनिया में जो उथल-पुथल मची है, इन कठोर विपरीत परिस्थितियों में भी भारत प्रगति के, विकास के, विश्वास के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है। इन 23 दिनों में भारत ने अपनी Relationship Building Capacity दिखाई है, Decision Making Capacity दिखाई है और Crisis Management Capacity दिखाई है।

साथियों,

आज जब दुनिया इतने सारे खेमों में बंटी हुई है, भारत ने अभूतपूर्व और अकल्पनीय bridges बनाए हैं। Gulf से लेकर Global West तक, Global South से लेकर पड़ोसी देशों तक भारत सभी का trusted partner है। कुछ लोग पूछते हैं, हम किसके साथ हैं? तो उनको मेरा जवाब यही है कि हम भारत के साथ हैं, हम भारत के हितों के साथ हैं, शांति के साथ हैं, संवाद के साथ हैं।

साथियों,

संकट के इसी समय में जब global supply chains डगमगा रही हैं, भारत ने diversification और resilience का मॉडल पेश किया है। Energy हो, fertilizers हों या essential goods अपने नागरिकों को कम से कम परेशानी हो, इसके लिए भारत ने निरंतर प्रयास किया है और आज भी कर रहे है।

साथियों,

जब राष्ट्रनीति ही राजनीति का मुख्य आधार हो, तब देश का भविष्य सर्वोपरि होता है। लेकिन जब राजनीति में व्यक्तिगत स्वार्थ हावी हो जाता है, तब लोग देश के फ्यूचर के बजाय अपने फ्यूचर के बारे में सोचते हैं। आप ज़रा याद कीजिए 2004 से 2010 के बीच क्या हुआ था? तब कांग्रेस सरकार के समय पेट्रोल-डीजल और गैस की कीमतों का संकट आया था और तब कांग्रेस ने देश की नहीं बल्कि अपनी सत्ता की चिंता की। उस वक्त कांग्रेस ने एक लाख अड़तालीस हज़ार करोड़ रुपए के ऑयल बॉन्ड जारी किए थे और प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने खुद कहा था कि वो आने वाली पीढ़ी पर कर्ज का बोझ डाल रहे हैं। यह जानते हुए भी कि ऑयल बॉन्ड का फैसला गलत है, जो रिमोट कंट्रोल से सरकार चला रहे थे, उन लोगों ने अपनी सत्ता बचाने के लिए यह गलत निर्णय किया क्योंकि जवाबदेही उस समय नहीं होनी थी, उस बॉन्ड पर री-पेमेंट 2020 के बाद होनी थी।

साथियों,

बीते 5-6 वर्षों में हमारी सरकार ने कांग्रेस सरकार के उस पाप को धोने का काम किया है, और इस धुलाई का खर्चा कम नहीं आया है, ऐसी लाँड्री आपने देखी नहीं होगी। 1 लाख 48 हज़ार करोड़ रुपए की जगह, देश को 3 लाख करोड़ रुपए से अधिक की पेमेंट करनी पड़ी क्योंकि इसमें ब्याज भी जुड़ गया था। यानी हमने करीब-करीब दोगुनी राशि चुकाने के लिए मजबूर हुए। आजकल कांग्रेस के जो नेता बयानों की मिसाइलें दाग रहे हैं, मिसाइल आई तो टीवी9 को मजा आएगा, उनकी इस विषय का जिक्र आते ही बोलती बंद हो जाती है।

साथियों,

पश्चिम एशिया में बनी परिस्थितियों पर मैंने आज लोकसभा में अपना वक्तव्य दिया है। दुनिया में जहां भी युद्ध हो रहे हैं, वो भारत की सीमा से दूर हैं। लेकिन आज की व्यवस्थाओं में कोई भी देश युद्धों से दुष्प्रभाव से दूर रहे, ऐसा संभव नहीं होता। अनेक देशों में तो स्थिति बहुत गंभीर हो चुकी है। और इन हालातों में हम देख रहे हैं कि राजनीतिक स्वार्थ से भरे कुछ लोग, कुछ दल, संकट के इस समय में भी अपने लिए राजनीतिक अवसर खोज रहे हैं। इसलिए मैं टीवी9 के मंच से फिर कहूंगा, यह समय संयम का है, संवेदनशीलता का है। हमने कोरोना महासंकट के दौरान भी देखा है, जब देशवासी एकजुट होकर संकट का सामना करते हैं, तो कितने सार्थक परिणाम आते हैं। इसी भाव के साथ हमें इस युद्ध से बनी परिस्थितियों का सामना करना है।

साथियों,

दुनिया की हर उथल-पुथल के बीच, भारत ने अपनी प्रगति की गति को भी बनाए रखा है। अगर मैं 28 फरवरी को युद्ध शुरू होने के बाद, बीते 23 दिनों का ही ब्यौरा दूं, तो पूरब से पश्चिम तक, उत्तर से दक्षिण तक देश में हजारों करोड़ के डेवलपमेंट प्रोजेक्ट्स का काम हुआ है। दिल्ली मेट्रो रेल के महत्वपूर्ण कॉरिडोर्स का लोकार्पण, सिलचर का हाई स्पीड कॉरिडोर का शिलान्यास, कोटा में नए एयरपोर्ट का शिलान्यास, मदुरै एयरपोर्ट को इंटरनेशनल एयरपोर्ट का दर्जा देना, ऐसे अनेक काम बीते 23 दिनों में ही हुए हैं। बीते एक महीने के दौरान ही औद्योगिक विकास को गति देने के लिए भव्य स्कीम को मंजूरी दी गई है। इसके तहत देशभर में 100 plug-and-play industrial parks विकसित किए जाएंगे। देश में Small Hydro Power Development Scheme को भी हरी झंडी दी गई है। इससे आने वाले वर्षों में 1,500 मेगावाट नई hydro power capacity जोड़ी जाएगी। इसी दौरान जल जीवन मिशन को साल 2028 तक बढ़ाने का निर्णय लिया गया है। किसानों के हित में भी अनेक बड़े निर्णय लिए गए हैं। बीते एक महीने में ही पीएम किसान सम्मान निधि के तहत 18 हजार करोड़ रुपए से अधिक सीधे किसानों के खातों में ट्रांसफर किए गए हैं। और जो हमारे MSMEs हैं, जो हमारे निर्यातक हैं, उनके लिए भी करीब 500 करोड़ रुपए के राहत पैकेज की भी घोषणा की गई है। यह सारे कदम इस बात का प्रमाण हैं कि विकसित भारत बनाने के लिए देश कितनी तेज गति से काम कर रहा है।

साथियों,

Management की दुनिया में एक सिद्धांत कहा जाता है - What gets measured, gets managed. लेकिन मैं इसमें एक बात और जोड़ना चाहता हूं, What gets measured, gets improved और ultimately, gets transformed. क्योंकि आकलन जागरूकता पैदा करता है। आकलन जवाबदेही तय करता है और सबसे महत्वपूर्ण आकलन संभावनाओं को जन्म देता है।

साथियों,

अगर आप 2014 से पहले के 10-11 साल और 2014 के बाद के 10-11 साल का आप आकलन करेंगे, तो यही पाएंगे कि कैसे इसी सिद्धांत पर चलते हुए, भारत ने हर सेक्टर को Transform किया है। जैसे पहले हाईवे बनते थे, करीब 11-12 किलोमीटर प्रति दिन की रफ्तार से, आज भारत करीब 30 किलोमीटर प्रतिदिन की स्पीड से हाईवे बना रहा है। पहले पोर्ट्स पर शिप का Turnaround Time, 5-6 दिन का होता था। आज वही काम, करीब-करीब 2 दिन से भी कम समय में पूरा हो रहा है। पहले Startup Culture के बारे में चर्चा ही नहीं होती थी। 2014 से पहले, हमारे देश में 400-500 स्टार्ट अप्स ही थे। आज भारत में 2 लाख से ज्यादा रजिस्ट्रर्ड स्टार्ट अप्स हैं। पहले मेडिकल education में सीटें भी सीमित थीं, करीब 50-55 हजार MBBS seats थीं, आज यह बढ़कर सवा लाख से ज्यादा हो चुकी हैं। पहले देश के Banking system से भी करोड़ों लोग बाहर थे। देश में सिर्फ 25 करोड़ के आसपास ही बैंक account थे। वहीं जनधन योजना के माध्यम से 55 करोड़ से ज्यादा बैंक अकाउंट खुले हैं। पहले हमारे देश में airports की संख्या भी 70 से कम थी। आज एयरपोर्ट्स की संख्या भी बढ़कर 160 से ज्यादा हो चुकी है।

साथियों,

पहले भी योजनाएं तो बनती थीं, लेकिन आज फर्क है, आज परिणाम दिखते हैं। पहले गति धीमी थी, आज भारत fastrack पर है। पहले संभावनाएं भी अंधकार में थीं, आज संकल्प सिद्धियों में बदल रहे हैं। इसलिए दुनिया को भी यह संदेश मिल रहा है कि यह नया भारत है। यह अपने विकास के लिए कोई कोर-कसर बाकी नहीं छोड़ रहा है।

साथियों,

आज हमारा प्रयास है कि अतीत में विकास का जो असंतुलन पैदा हो गया था, उसको अवसरों में बदला जाए। अब जैसे हमारा पूर्वी भारत है। हमारा पूर्वी भारत संसाधनों से समृद्ध है, दशकों तक वहां जिन्होंने सरकारें चलाई हैं, उनकी उपेक्षा ने पूर्वी भारत के विकास पर ब्रेक लगा दी थी। अब हालात बदल रहे हैं। जिस असम में कभी गोलियों की आवाज सुनाई देती थी, आज वहां सेमीकंडक्टर यूनिट बन रही है। ओडिशा में सेमीकंडक्टर से लेकर पेट्रोकेमिकल्स तक अनेक नए-नए सेक्टर का विकास हो रहा है। जिस बिहार में 6-7 दशक में गंगा जी पर एक बड़ा पुल बन पाया था एक, उस बिहार में पिछले एक दशक में 5 से ज्यादा नए पुल बनाए गए हैं। यूपी में कभी कट्टा मैन्युफैक्चरिंग की कहानियां कही जाती थीं, आज यूपी, मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग में दुनिया में अपनी पहचान बना रहा है।

साथियों,

पूर्वी भारत का एक और बड़ा राज्य पश्चिम बंगाल है। पश्चिम बंगाल, एक समय में भारत के कल्चर, एजुकेशन, इंडस्ट्री और ट्रेड का हब होता था। बीते 11 वर्षों में केंद्र सरकार ने पश्चिम बंगाल के विकास के लिए बड़ी मात्रा में निवेश किया है। लेकिन दुर्भाग्य से, आज वहां एक ऐसी निर्मम सरकार है, जो विकास पर ब्रेक लगाकर बैठी है। TV9 बांग्ला के जो दर्शक हैं, वो जानते हैं कि बंगाल में आयुष्मान योजना पर निर्मम सरकार ने ब्रेक लगाया हुआ है। पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना पर ब्रेक लगाया हुआ है। पीएम आवास योजना पर ब्रेक लगाया हुआ है। चाय बागान श्रमिकों के लिए शुरू हुई योजना के लिए ब्रेक लगाया हुआ है। यानी विकास और जनकल्याण से ज्यादा प्राथमिकता निर्मम सरकार अपने राजनीतिक स्वार्थ को दे रही है।

साथियों,

देश में इस तरह की राजनीति की शुरुआत जिस दल ने की है, वो अपने गुनाहों से बच नहीं सकती और वो पार्टी है - कांग्रेस। कांग्रेस पार्टी की राजनीति का एक ही लक्ष्य रहा है, किसी भी तरह विकास का विरोध और कांग्रेस यह तब से कर रही है, जब मैं गुजरात में था। गुजरात में वर्षों तक जनता ने हमें आशीर्वाद दिया, तो कांग्रेस ने उस जनादेश को स्वीकार नहीं किया। उन्होंने गुजरात की छवि पर सवाल उठाए, उसकी प्रगति को कटघरे में खड़ा किया और जब यही विश्वास पूरे देश में दिखाई दिया, तो कांग्रेस का विरोध भी रीजनल से नेशनल हो गया।

साथियों,

जब राजनीति में विरोध, विकास के विरोध में बदल जाए, जब आलोचना देश की उपलब्धियों पर सवाल उठाने लगे, तब यह सिर्फ सरकार का विरोध नहीं रह जाता, यह देश की प्रगति से असहज होने की मानसिकता बन जाती है। आज कांग्रेस इसी मानसिकता की गुलाम बन चुकी है। आज स्थिति यह है कि देश की हर सफलता पर प्रश्न उठाया जाता है, हर उपलब्धि में कमी खोजी जाती है और हर प्रयास के असफल होने की कामना की जाती है। कोविड के समय, देश ने अपनी वैक्सीन बनाई, तो कांग्रेस ने उस पर भी संदेह जताया। Make in India की बात हुई, तो कहा गया कि यह सफल नहीं होगा, बब्बर शेर कहकर इसका मजाक उड़ाया गया। जब देश में डिजिटल इंडिया अभियान शुरू हुआ, तो उसका मजाक उड़ाया गया। लेकिन हर बार यह कांग्रेस का दुर्भाग्य और देश का सौभाग्य रहा कि भारत ने हर चुनौती को सफलता में बदला। आज भारत दुनिया की सबसे बड़ी वैक्सीनेशन ड्राइव का उदाहरण है। भारत डिजिटल पेमेंट्स में दुनिया का अग्रणी देश है। भारत मैन्युफैक्चरिंग और स्टार्टअप्स में नई ऊंचाइयों को छू रहा है।

साथियों,

लोकतंत्र में विरोध जरूरी होता है। लेकिन विरोध और विद्वेष के बीच एक रेखा होती है। सरकार का विरोध करना लोकतांत्रिक अधिकार है। लेकिन देश को बदनाम करना, यह कांग्रेस की नीयत पर सवाल खड़ा करता है। जब विरोध इस स्तर तक पहुंच जाए कि देश की उपलब्धियां भी असहज करने लगें, तो यह राजनीति नहीं, यह दृष्टिकोण की समस्या है। अभी हमने ग्लोबल AI समिट में भी देखा है। जब पूरी दुनिया भारत में जुटी हुई थी, तो कांग्रेस के लोग कपड़े फाड़ने वहां पहुंच गए थे। इन लोगों को देश की इज्जत की कितनी परवाह है, यह इसी से पता चलता है। इसलिए आज आवश्यकता है कि देशहित को, दलहित से ऊपर रखा जाए क्योंकि अंत में राजनीति से ऊपर, राष्ट्र होता है, राष्ट्र का विकास होता है।

साथियों,

आज का यह दिन भी हमें यही प्रेरणा देता है। आज के ही दिन शहीद भगत सिंह, शहीद राजगुरु और शहीद सुखदेव ने देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया था। आज ही, समाजवादी आंदोलन के प्रखर आदर्श डॉ. राम मनोहर लोहिया जी की जयंती भी है। यह वो प्रेरणाएं हैं, जिन्होंने देश को हमेशा स्व से ऊपर रखा है। देशहित को सबसे ऊपर रखने की यही प्रेरणा, भारत को विकसित भारत बनाएगी। यही प्रेरणा भारत को आत्मनिर्भर बनाएगी। मुझे पूरा विश्वास है कि टीवी9 की यह समिट भी भारत के आत्मविश्वास और दुनिया के भरोसे पर, भारतीयों पर जो भरोसा है, उस भरोसे को और सशक्त करेगी। आप सभी को मेरी तरफ से बहुत-बहुत शुभकामनाएं हैं और आपके बीच आने का अवसर दिया, आप सबसे मिलने का मौका लिया, इसलिए बहुत-बहुत धन्यवाद!

नमस्‍कार!