‘आरोग्यासाठी एक विश्व’ ही यावर्षीच्या जागतिक आरोग्य सभेची संकल्पना, जागतिक आरोग्याबाबत भारताने पाहिलेल्या स्वप्नाशी सुसंगत : पंतप्रधान
निरोगी विश्वाचे भवितव्य समावेशकता, एकात्मिक दूरदृष्टी आणि सहयोगावर अवलंबून : पंतप्रधान
सर्वात असुरक्षित असणाऱ्यांची आपण किती उत्तम काळजी घेतो यावर जगाचे आरोग्य अवलंबून : पंतप्रधान
ग्लोबल साऊथ देश आरोग्यविषयक आव्हानांमुळे विशेषत्वाने प्रभावित झाले आहेत, भारताचा दृष्टीकोन अनुकरणीय, प्रमाणबद्ध आणि शाश्वत प्रारूप देऊ करतो: पंतप्रधान
जून महिन्यात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन येत आहे,‘एक वसुंधरा, एक आरोग्य यासाठी योग’ ही यावर्षीची संकल्पना आहे : पंतप्रधान
निरोगी पृथ्वीची उभारणी करताना, कोणीही मागे राहून जाणार नाही याची सुनिश्चिती करूया: पंतप्रधान

मान्यवर आणि प्रतिनिधी,नमस्कार.

जागतिक आरोग्य सभेच्या 78 व्या सत्रातील सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

मित्रांनो,

या वर्षीच्या जागतिक आरोग्य सभेची संकल्पना 'आरोग्यासाठी एक जग' आहे. ती भारताच्या जागतिक आरोग्यविषयक दृष्टिकोनाशी सुसंगत  आहे. 2023 मध्ये जेव्हा मी या मेळाव्याला संबोधित केले तेव्हा मी 'एक पृथ्वी, एक आरोग्य' बद्दल बोललो होतो. निरोगी जगाचे भविष्य समावेशन, एकात्मिक दृष्टिकोन आणि सहकार्यावर अवलंबून असते.

मित्रांनो,

समावेशन हा भारताच्या आरोग्य सुधारणांचा गाभा आहे. आम्ही आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना चालवतो. ती 580 दशलक्ष  लोकांना कवच पुरविते आणि मोफत उपचार देते. अलिकडेच, हा कार्यक्रम 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व भारतीयांना आरोग्यकवच देण्यासाठी विस्तारण्यात  आला आहे. आमच्याकडे हजारो आरोग्य आणि निरामय  केंद्रांचे जाळे आहे. ते कर्करोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांची तपासणी करतात तसेच त्यांचे निदान करतात. हजारो जन औषधी  दुकाने बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत उच्च दर्जाची औषधे उपलब्ध करून देतात.

मित्रांनो,

आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचे उत्प्रेरक आहे. गर्भवती महिला आणि मुलांच्या लसीकरणाचा मागोवा घेण्यासाठी आमच्याकडे एक डिजिटल मंच आहे. लाखो लोकांची वैशिष्ट्यपूर्ण  डिजिटल आरोग्य ओळख आहे. ती आम्हाला लाभ, विमा, नोंदी तसेच माहिती एकत्रित करण्यास मदत करत असते. टेलिमेडिसिनमुळे कोणतीही व्यक्ती डॉक्टरपासून खूप दूर नाही. आमच्या मोफत टेलिमेडिसिन सेवेमुळे 340 दशलक्षाहून अधिक सल्लामसलती साकार झाल्या आहेत.

मित्रांनो,

आमच्या उपक्रमांमुळे एक आनंददायी विकास झाला आहे. एकूण आरोग्य खर्चाची टक्केवारी म्हणून होणाऱ्या खिशाबाहेरील खर्चात आता लक्षणीय घट झाली आहे. त्याच वेळी, सरकारी आरोग्य खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.

मित्रांनो,

जगाचे आरोग्य हे आपण सर्वात असुरक्षित लोकांची किती चांगली काळजी घेतो यावर अवलंबून असते. ग्लोबल साउथ हे विशेषतः आरोग्य आव्हानांमुळे प्रभावित आहे. भारताचा दृष्टिकोन अनुकरणीय, प्रमाणबद्ध  तसेच शाश्वत प्रारूप उपलब्ध करून करतो. आम्हाला आमचे शिक्षण आणि सर्वोत्तम पद्धती जगासोबत, विशेषतः ग्लोबल साउथसोबत सामायिक करण्यास आनंद होईल.

मित्रांनो,

जूनमध्ये 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन येत आहे. या वर्षी 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' ही संकल्पना आहे. जगाला योग देणाऱ्या राष्ट्रातून असल्याने, मी सर्व देशांना यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो.

मित्रांनो,

आय एन बी कराराच्या यशस्वी वाटाघाटीबद्दल मी जागतिक आरोग्य संघटना आणि सर्व सदस्य राष्ट्रांचे अभिनंदन करतो. भविष्यातील साथीच्या रोगांशी अधिक सहकार्याने लढण्याची ही एक सामायिक वचनबद्धता आहे.निरोगी ग्रहाची निर्मिती करताना कोणीही मागे राहणार नाही याची सुनिश्चिती करूया. वेदांमधील कालातीत प्रार्थनेने मी समारोप करतो.

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥

हजारो वर्षांपूर्वी, आपल्या ऋषीमुनींनी प्रार्थना केली होती की प्रत्येकजण निरोगी, आनंदी आणि रोगमुक्त असावा. हा दृष्टिकोन जगाला एकत्र आणो.

धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India remains fastest-growing major economy, domestic investors power market resilience

Media Coverage

India remains fastest-growing major economy, domestic investors power market resilience
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 मार्च 2026
March 14, 2026

Heartening Resolve Meets Bold Action: PM Modi's Transformative Push for a Developed Assam.