India is home to a unique heritage, where the overriding thought has always been the benefit of mankind: PM Modi 
Lord Buddha’s message of love and compassion can be of immense benefit to the world today: PM Modi 
Government is working with compassion to serve people, in line with the path shown by Lord Buddha: PM Modi

व्यासपीठावर उपस्थित, मंत्रिमंडळातले माझे सहकारी, डॉक्टर महेश शर्माजी, किरेन रिजीजू, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फाऊंडेशनचे महासचिव, डॉक्टर धम्मपियेजी, देशभरातून आलेले भाविक, महिला आणि सज्जनहो!

आपल्याकडे असे मानतात की जेव्हा एकाच वेळी, एकाच जागी, हजारो जण एकच मंत्र जपत असतील तर उर्जामंडल तयार होते आणि आपणा सर्वांनी या उर्जामंडळाची अनुभूती घेतली असेल.डोळे उघडल्यावर आपण एकमेकांना पाहत आहोत मात्र अंतर्मनात भगवान बुद्धांच्या नामाचा निर्माण झालेला नादध्वनी माझ्यात,आपणा सर्वांच्यात आपण अनुभवत आहोत.

भगवान बुध्दांप्रति आपणा सर्वांची भक्ती आणि भाव व्यक्त करायला शब्दही अपुरे ठरतील.लोक ज्याप्रमाणे मंत्रामुळे मुग्ध होतात त्याप्रमाणे आम्ही बुद्धांमुळेही मुग्ध होतो.आज बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी,आपणा सर्वामध्ये येण्याचे,आपणा सर्वांचा,विशेषतः सर्व धर्मगुरूंचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले.

महेश शर्माजी आणि किरेन रिजिजू यांनी सांगितले की मी इथे दुसऱ्यांदा आलो आहे.गेल्यावर्षीही आलो असतो पण गेल्या वर्षी अशाच एका समारंभासाठी वैशाखसाठी, प्रमुख पाहुणे म्हणून मी श्रीलंकेमध्ये गेलो होतो. श्रीलंकेमधे, तिथल्या लोकांसमवेत, तिथल्या सरकार समवेत आणि जगभरातून आलेल्या बौद्ध धर्मगुरु समवेत,बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याचे भाग्य मला लाभले.

आपण सर्वजण व्यग्र असतो,आपापल्या जबाबदाऱ्या असतात.मात्र या व्यग्रतेतून काही

क्षण आपण भगवान बुद्धांचे नाम स्मरण करून धन्य होतो.मात्र मी इथे धर्मगुरू पाहतो,भिक्षूकगण पाहतो,यांनी तर बुद्धांच्या करुणेच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी आपले सर्व जीवनच वेचले आहे.ते स्वतःच बुद्धांच्या मार्गावरून वाटचाल करत आहेत.जगभरात भगवान बुद्धांचा संदेश पोहोचवणाऱ्या या सर्व महा मानवांना मी या प्रसंगी आदरपूर्वक प्रणाम करतो, नमन करतो.

आपण सर्वजण देशाच्या वेग-वेगळ्या भागातून आला आहोत, आपणा सर्वांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.ज्यांनी या कार्यासाठी मग ती संस्था असो व्यक्ती असो, ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले त्यांचा सन्मान करण्याची संधी मला लाभली.या सर्व प्रयत्नांचे त्यांच्या योगदानाचे मी आदरपूर्वक अभिनंदन करतो आणि भविष्यासाठी त्यांना अनेक शुभेच्छा देतो.सारनाथच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज आणि बौद्ध गया इथल्या ऑल इंडिया भिक्षूक संघाचे वैशाख सन्मान मिळविल्याबद्दल आदररपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रहो,धरतीचा हा भूभाग,आपला भारत ज्याला हा अमूल्य वारसा लाभला आहे तो अतुलनीय आहे.जगभरात असे वारसा लाभण्याची समृद्धी क्कचितच पाहायला मिळते.

गौतम बुद्ध यांचा जन्म,त्यांचे शिक्षण,त्यांचे महापरिनिर्वाण यावर शेकडो वर्षापासून खूप सांगितले गेले आहे,खूप लिहिले गेले आहे आणि आजच्या पिढीचे हे भाग्य आहे की अनेक संकटातूनही यातल्या बऱ्याच गोष्टी आजही सुरक्षित आहेत.

आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे की भारताच्या या धरतीवरून निर्माण झालेल्या सर्व विचारांच्या केंद्रस्थानी केवळ मानव कल्याण,सृष्टी कल्याण हाच भाव राहिला आहे.नव-नव्या विचारांच्या या काळात, कधीही दुसऱ्याचे अधिकार किंवा त्याच्या भावनांवर अतिक्रमण केले गेले नाही. आप -पर भाव नाही, माझी विचारधारा तुमची विचारधारा हा भेद नाही, माझा ईश्वर तुझा ईश्वर हा भेद नाही.

भारतातून निर्माण झालेली विचारधारा,संपूर्ण मानवजातीचे कल्याण ध्यानात घेऊन पुढे जात राहिली.तुम्ही आमच्याबरोबर आलात तरच तुमचे भले होईल असे कोणाला सांगितले नाही,कधीच असे सांगितले नाही.बुद्धांच्या विचारांनी केवळ राष्ट्रात नव चेतना जागृत केली असे नव्हे तर आजही आशियातल्या अनेक देशांचे राष्ट्रीय चरित्र

बुद्धांचे विचार,त्यांची परंपरा परिभाषित करत आहेत.

मित्रहो, आपल्या भूमीचे हे वैशिष्ट्य राहिले आहे आणि प्रत्येक हिंदुस्तानी अभिमानाने सांगू शकतो,ताठ मानेने सांगू शकतो,जगाच्या नजरेला नजर देऊन सांगू शकतो की आपली संस्कृती,आपला इतिहास,आपली परंपरा या गोष्टीची साक्ष आहेत की हिंदुस्थान कधीही आक्रमणकर्ता देश राहिला नाही. हिंदुस्तानने कधीही दुसऱ्या देशावर आपणहून आक्रमण केले नाही.हजारो वर्षापासून आपली संस्कृती मूलभूत चिंतनामुळे या मार्गावरून वाटचाल करत आहे.

मित्रहो.सिद्धार्थ ते गौतम बुद्ध ही वाटचाल,ती कथा केवळ निर्वाण प्राप्तीच्या मार्गाची कथा नव्हे.ही कथा या सत्याची आहे जे सांगते की,जी व्यक्ती आपले ज्ञान आणि धनातून दुसऱ्याचे दुःख आणि वेदना दूर करण्याचा प्रयत्न करते, ती प्रत्येक व्यक्ती, सिद्धार्थ ते बुद्ध या मार्गावरून मार्गक्रमण करते, करू शकते आणि बुध्दत्व प्राप्त करू शकते.

बुद्ध पौर्णिमेला आपल्याला प्रत्येक क्षणी करूणा आणि मैत्रीचे स्मरण होते.एका अशा काळात जेव्हा हिंसा,दहशतवाद,जातीवाद,वंशवाद यांच्या सावलीने बुद्धांच्या संदेशाला काळ्या मेघाप्रमाणे झाकोळले आहे अशा काळात करूणा आणि मैत्री अधिकच आवश्यक ठरते, अधिकच महत्वपूर्ण होते.विध्वंस,घृणा आणि हिंसा करत जो आपल्या विरोधातल्या सर्वांवर हल्ला करतो त्याचे जीवन हे जीवन नव्हे तर घृणा,हिंसा यांच्यावर मैत्री आणि करूणा यांनी मात करत जगातला सर्वात मोठा विजय प्राप्त करतो त्याचे जीवन हे जीवन आहे.

ज्यांनी क्रुद्ध मनावर,बुद्धांच्या शांत मुद्रेने विजय मिळवला,तोच सफलही ठरला आणि अमरही झाला. सत्य आणि करुणा यांच्या संयोगातुन बुद्ध घडतो आणि आपल्यातला बुद्ध जागृत करतो.

बुद्ध म्हणजे हिंसेसाठी तयार झालेले मन,क्रुद्ध स्थितीतून शुद्ध स्थितीमधे आणणे.समाज,जात, वर्ण,भाषा यांच्या आधारे मनुष्य-मनुष्यात भेदभाव करा, हा भारताचा संदेश असूच शकत नाही, हा बुद्धाचा संदेश असू शकत नाही आणि या धरती वर या विचाराला थारा असू शकत नाही. इथे कोणीही कोणत्याही जाती,वर्ण, वर्गाचा असू दे,त्याला नेहमीच आपलेपणाने, आत्मीयतेने सजगपणाने स्वीकारले गेले आहे.यहुदी समाज असो,पारशी समाज असो,हजारो वर्षापासून एकरूप झाले आहेत,मग आमचे मानस, आमच्याशी हाडाचे नाते असणाऱ्याशी भेदभाव करण्याची आम्ही कधी कल्पनाही केली नाही.समता,समानतेचा भाव आपल्या जीवनात आणणे याचाच अर्थ बुद्धांचे विचार आचरणात आणणे होय.हीच समता,समरसता,समदृष्टी आणि संघ भाव यामुळे बुद्ध जगभरात सर्वाधिक स्वीकारार्ह महापुरुष ठरले आहेत.हा भाव बाबासाहेब आंबेडकर यांनी बाणवला,त्यांनीही बुद्धांच्या मार्गावर वाटचाल केली.

आज भारताचा सर्व श्रेष्ठ परिचय हा आपल्या भौतिक क्षेत्रातल्या प्रगती बरोबरच भगवान बुद्धांचा देश,यामुळेही जगभरात भारताचे महात्म्य वाढते आहे.धम्मम शरणम् गच्छामी, बुद्धम शरणम् गच्छामी,संघम शरणम् गच्छामी, हा आपल्या देशाच्या पवित्र भूमीतून निघालेला, संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारा, जनांचा मंत्र बनला आहे.म्हणूनच बुद्ध पौर्णिमेचा संदेश आहे,दुसऱ्याला बदलण्याआधी स्वतः बदलायला सुरवात करा,तुम्हीही बुद्धाप्रमाणे बनाल,बाहेर सर्वाना पाहण्याआधी आपल्यातल्या द्वंद्वावर विजय मिळवा,तर तुम्हीही बुद्धाप्रमाणे बनाल. ‘अपो दीप: आप भव:’ आपल्यातल्या प्रकाशाचा शोध घ्याल तर आपणही बुद्धाप्रमाणे बनाल.

भगवान बुद्धही नेहमी चित्त शांती आणि करुणेची प्रेरणा देत राहतात.समानता न्याय,स्वतंत्रता आणि मानवाधिकार,ही आजच्या लोकशाही जगाची प्रमुख मूल्ये आहेत.मात्र याबाबत अगदी स्पष्ट संदेश,भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी दिला होता.

भगवान बुद्धांनुसार,समानता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला या भूमीवर प्रतिष्ठा आहे.प्रत्येक व्यक्तीला, कोणताही भेदभाव न करता, संसाधने,अधिकार उपलब्धता सुनिश्चित केली जायला हवी.

मित्रहो, जगातला कोणताही देश असो,जातीयवादापासून दहशतवादापर्यंत, सामाजिक न्यायाला आव्हान देणारी प्रत्येक विषमता मानवाने स्वतःच निर्माण केली आहे.ही विषमताच, अन्याय,शोषण,अत्याचार,हिंसा,सामाजिक तणावाचे मूळ आहे.दुसऱ्या बाजूला, न्याय,स्वतंत्रता,आणि मानव अधिकाराचा सिद्धांत,एक प्रकारे समानतेच्या सिद्धांताचाच विस्तार आहे.याचाच अर्थ असा आहे की समानता या सिद्धांताचे आधार तत्व आहे.

आपल्या समाजात समानतेची भावना दृढ असेल तर सामाजिक न्याय,स्वतंत्रता,मानव अधिकार,सामाजिक परिवर्तन,व्यक्तिगत अधिकार,शांती,सौहार्द,समृद्धी,हे सारे मार्ग आपल्यासाठी मोकळे होऊन आपण वेगाने घोडदौड करू.

भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशात ‘अष्टांग’ बाबत चर्चा केली आहे. भगवान बुद्धांच्या संदेशात अष्टांग हा विषय येतो. अष्टांग मार्ग जाणून घेतल्यावाचून,मिळवल्यावाचून बुद्धांना जाणून घेणे अशक्य आहे. अष्टांग मार्गात भगवान बुद्धांनी सांगितले आहे,पहिला सम्यक दृष्टी,दुसरा सम्यक समकल्प, तिसरा सम्यक वाणी,चौथा सम्यक आचरण,पाचवा सम्यक आजीविका,सम्यक प्रयत्न, सम्यक चेतना आणि सम्यक ध्यान म्हणजेच योग्य दृष्टिकोन,योग्य विचार,योग्य वाणी,योग्य आचरण, योग्य उपजीविका, योग्य प्रयत्न, योग्य जाणीव, योग्य ध्यान हे अष्टमार्ग, भगवान बुद्धांनी आपल्यासाठी सूचित केले.

आज ज्या संकटांचा आपण मुकाबला करत आहोत,ज्या समस्यांना आपण तोंड देत आहोत,त्यांचे निराकरण, भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल केल्यावरच शक्य आहे.काळाची गरज आहे की जगाला संकटापासून मुक्त करायचे असेल तर बुद्धांनी सांगितलेला करूणा आणि प्रेमाचा मार्ग सर्वात उपयुक्त मार्ग आहे. बुद्धांचा मार्ग अनुसरणाऱ्या सर्वांनी सक्रिय व्हायला हवे.भगवान बुद्धांनीही सांगितले होते की या मार्गावर एकत्रित वाटचाल केल्यानेच सामर्थ्य प्राप्त होईल.

मित्रहो, भगवान बुद्ध अशा दार्शनिकांपैकी होते ज्यांना तर्कबुद्धी आणि भावनेचा संकल्प आवश्यक वाटत होता.आपल्या धम्म सिद्धांताबाबतच्या तार्किक परिक्षणाबाबत ते आग्रही होते.आपल्या शिष्यांनीही कोणत्याही विशेष आदर वा अनुरागावाचून आपल्या विचारांना, तर्काच्या कसोटीवर तावून सुलाखून घ्यावे यासाठी ते आग्रही होते.भगवान बुद्धांच्या संदेशाला ठोस,दार्शनिक रूप देणारे महान बौद्ध चिंतक नागार्जुन यांनी दुसऱ्या शताब्दीत सम्राट उदय यांना जो सल्ला दिला होता तो आजही प्रासंगिक आहे.

त्यांनी म्हटले होते,नेत्रहीन,आजारी,वंचित,असहाय,आणि गरिबाला कोणत्याही अवरोधावाचून भोजन आणि पाणी मिळण्याची व्यवस्था हवी आणि त्यांच्या प्रति करुणेचा भाव बाळगला पाहिजे.पीडित आणि आजारी व्यक्तीची योग्य देखभाल आणि अडचणीने ग्रासलेल्या शेतकऱ्याला बियाणे आणि इतर आवश्यक ते सहकार्य दिले गेले पाहिजे.

अवघ्या जगामधले सर्वांचे दुःख कायमचे कसे दूर होईल यावर भगवान बुद्धांचा वैश्विक दृष्टिकोन केंद्रित होता.कोणाचे दुःख पाहुन दुःखी होण्यापेक्षा, त्या व्यक्तीला ते दुःख दूर करण्यासाठी सक्षम बनवणे, तयार करणे आणि सशक्त करणे हे जास्त योग्य आहे अशी त्यांची शिकवण आहे.

भगवान बुद्धांनी दाखवलेल्या करुणा आणि सेवाभाव या मार्गावरूनच आमचे सरकार वाटचाल करत आहे याचा मला आनंद आहे.जीवनातले दुःख कसे कमी होईल,संकटे कशी कमी होतील,सर्वसामान्यांचे जीवन सुकर कसे होईल याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

सरकारने, जनधन योजने अंतर्गत 31 कोटी पेक्षा जास्त गरिबांचे बँकेत खाते उघडणे, दरदिवशी केवळ 90 पैसे आणि एक महिन्याचा एक रुपया प्रिमियम भरून सुमारे 19 कोटी गरिबांना विमा कवच देणे,3 कोटी 70 लाखाहून अधिक गरीब महिलांना मोफत गॅस जोडणी, गॅस चूली देणे, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत 3 कोटीपेक्षा जास्त शिशूंना आणि 80 लाखाहून अधिक, गरोदर महिलांचे लसीकरण करणे, मुद्रा योजने अंतर्गत बँक हमीशिवाय 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज देणे, अशी अनेक पाऊले गरिबांच्या सशक्तीकरणासाठी उचलली आहेत. आता तर आयुष्मान योजने अंतर्गत सुमारे 50 कोटी गरिबांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतची उपचार सुविधा सुनिश्चित करण्यासाठी सरकार पाऊले उचलत आहे.

मित्रहो, समावेशकतेचा हा विचार,सर्वांनी मिळून, एकत्र वाटचाल करण्याचा हा विचारच होता, ज्या विचाराने बुद्धांचे जीवन एकदम बदलले. बुद्ध हा एका राजाचा मुलगा होता,ज्याच्याकडे सर्व सुख- सुविधा होत्या,जेव्हा तो,गरिबाला पाहतो,त्याचे दुःख,त्याचा त्रास पाहतो,तेव्हा त्यांच्या मनात भाव जागृत होतो की मी यांच्यापेक्षा वेगळा नाही,मी यांच्या समान आहे. या सत्याने, जाण, तर्कक्षमता, चैतन्य,नैतिकतेचा भाव त्यांच्यामधे आपोआप एक शक्ती म्हणून उमलायला लागला.आज हा भाव आपण जेवढा आत्मसात करू,तेव्हढे आपण मनुष्य बनण्यासाठी योग्य ठरू.मानवतेसाठी 21 वे शतक जगभरात सर्वात महत्वाचे शतक बनवण्यासाठी हे करणे अतिशय आवश्यक आहे.

बंधू,- भगिनींनो,गुलामीच्या दीर्घ कालखंडानंतर अनेक कारणांमुळे आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे कार्य ज्या पद्धतीने व्हायला हवे होते त्या पद्धतीने झाले नाही. जो देश, आपल्या इतिहासाचे संरक्षण करत तो वारसा त्याच भव्यतेने भावी पिढीकडे सुपूर्द करत नाही, तो देश पूर्णत्व प्राप्त करू शकत नाही.ही बाब लक्षात घेऊन आमचे सरकार,आपला सांस्कृतिक वारसा,विशेष करून भगवान बुद्ध यांच्याशी जोडल्या गेलेल्या स्थळांबाबत एका बृहत आराखड्या वर काम करत आहे.

आपल्या देशात साधारणतः 18 अशी राज्ये आहेत ज्यामधे,भगवान बुद्धांशी जोडलेले कोणते ना कोणते तीर्थ क्षेत्र आहे.यापैकी काही क्षेत्रे तर 2 हजार वर्षापेक्षा प्राचीन असून जगभरातल्या लोकांना आकर्षित करत आहेत. अशा वेळी आवश्यक आहे,की ही स्थळे पाहायला लोक येतात त्या दृष्टीने या स्थळांचा विकास करायला हवा.हा विचार बाळगून स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत एका बुद्धिस्ट परिक्रमेबाबत काम सुरु आहे.

बुद्धिस्ट परिक्रमेसाठी सरकारने 360 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. यातून उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरातमधल्या बौद्ध स्थळांचा अधिक विकास केला जात आहे.

याशिवाय रस्ते वाहतूक मंत्रालय,गया- वाराणसी,कुशीनगर,या मार्गाच्या बाजूला आवश्यक सुविधा विकसित करत आहे.पर्यटन मंत्रालयाद्वारे दोन वर्षाआड बुद्धिझम वर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जाते.या वर्षी हा कार्यक्रम होईल तेव्हाही जगभरातले विद्धवान त्याला उपस्थिती लावतील.या कार्यक्रमांचा उद्देशच हा असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या सांस्कृतिक वारश्याची माहिती पोहोचावी,स्थानिक स्तरावर आणि दुसऱ्या देशातले पर्यटक ही बौद्ध स्थळे पाहायला यावेत,त्याबाबत माहिती घ्यावी.

याशिवाय केंद्र सरकार, भारताच्या शेजारी राष्ट्रातही बौद्ध वारसा स्थळांच्या जतनासाठी त्या देशांना मदत करत आहे.एएसआय अर्थात आर्कालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया द्वारे म्यानमार मध्ये बागान इथे आनंद मंदिराच्या पुनरुद्धारासाठी रासायनिक जतनाचे काम वेगाने सुरु आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात या मंदिराचे मोठे नुकसान झाले होते.

एएसआय, अफगाणिस्तानमधल्या बामियान इथे,कंबोडियात ओंकारवाट आणि तोप्रोहोम मंदिरात,लाओसच्या वतपोहू मंदिरात,व्हिएतनाम च्या माय सन मंदिराच्या संरक्षण आणि जतन कार्यात भारत सरकारचा सहभाग आहे.मंगोलिया बाबत बोलायचे झाल्यास भारत सरकार गंडेन मॉनेस्ट्रीच्या हस्त लिखितांचे संरक्षण आणि त्यांच्या डिजिटायझेशनचे काम ही करत आहे.

या मंचावरून आपल्या काही मंत्रालयांना माझे आवाहन आहे.बौद्ध दर्शनाशी संबधित देशांच्या वेग वेगळ्या भागात ज्या संस्था चालत आहेत, त्यामध्ये भगवान बुद्ध यांच्या ‘त्रिपिटिका’ ची जतन आणि संरक्षण आणि अनुवादाचे जे कार्य सुरु आहे ते एकाच मंचावर कसे आणता येईल.एक तपशीलवार पोर्टल करता येईल का,ज्यामध्ये सोप्या शब्दात भगवान बुध्दांचे विचार आणि त्या संबंधात या संस्थांमध्ये सुरु असलेले कार्य, याचे संकलन करता येईल का ?

मी महेश शर्माजींना आग्रह करतो की त्यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व आपल्या हाती घ्यावे आणि ते ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

मित्रहो, अडीच हजार वर्षानंतरही भगवान बुद्धांची शिकवण आपल्यात आहे हे आपले भाग्य आहे. मी भाग्य म्हणतो कारण त्यामागच्या परिस्थितीचा विचार करा,मी असं का म्हणतो ते.

आपल्या पूर्वीच्या लोकांची यात निश्चितच मोठी भूमिका राहिली आहे.आपल्या आधीच्या पिढ्यांचे हे योगदान होते,त्यांचे संरक्षण होते त्यामुळे आज आपण बौद्ध पौर्णिमेचा असा कार्यक्रम करू शकत आहोत.अडीच हजार वर्षापर्यंत आपल्या पूर्वजांनी हा वारसा जतन करून, सांभाळून ठेवण्यासाठी आणि प्रत्येक पिढीला देण्यासाठी निरंतर प्रयत्न केले आहेत.येणारा मानव इतिहास आपल्या सक्रिय भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे,आपल्या संकल्पाच्या प्रतीक्षेत आहे.

 

आज इथून निघतांना,मनात हा विचार करा की 2022 मध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होतील तेव्हा,असे कोणते 5 किंवा 10 संकल्प असतील जे आपण पूर्ण करू इच्छिता.

हे संकल्प,आपल्या वारसा स्थळांचे जतन आणि रक्षण,गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार, यांच्याशी संबंधित असू शकतात.मात्र इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती,प्रत्येक संस्था,प्रत्येक संघटनेने,2022 साठी लक्ष्य निश्चित करून संकल्प अवश्य करावा.

आपले हे प्रयत्न नव भारताचा संकल्प पूर्ण करण्यात फार मोठी भूमिका निभावतील.आव्हाने आपल्याला माहित आहेत,आपणा सर्वांवर भगवान बुद्धांचा आशीर्वाद आहे,म्हणूनच मला पूर्ण खात्री आहे की आपण जो संकल्प कराल तो नक्कीच पूर्णत्वाला न्याल.

मला आज बुद्ध पौर्णिमेच्या या पवित्र प्रसंगी भगवान बुद्धांच्या चरणांजवळ येऊन बसण्याची संधी मिळाली,त्यांना नमन करण्याची संधी मिळाली,आपण सर्वांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान मानतो.

आपण सर्वाना, बुद्ध पौर्णिमेच्या पुन्हा एकदा अनेक शुभेच्छा देतो आणि वाणीला विराम देतो.

खूप- खूप धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
10 Years of Jan-Dhan Yojana: Spurring Rural Consumption Through Digital Financial Inclusion

Media Coverage

10 Years of Jan-Dhan Yojana: Spurring Rural Consumption Through Digital Financial Inclusion
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi condoles loss of lives in drowning incident in Dehgam, Gujarat
September 14, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives in drowning incident in Dehgam, Gujarat.

The Prime Minister posted on X:

“ગુજરાતના દહેગામ તાલુકામાં ડૂબી જવાની ઘટનામાં થયેલ જાનહાનિના સમાચારથી અત્યંત દુઃખ થયું. આ દુર્ઘટનામાં જેમણે પોતાનાં સ્વજનોને ગુમાવ્યા છે એ સૌ પરિવારો સાથે મારી સંવેદના વ્યક્ત કરું છું. ઈશ્વર દિવંગત આત્માઓને શાંતિ અર્પણ કરે એ જ પ્રાર્થના….

ૐ શાંતિ….॥”