महामहिम,

आपण  आणि आपल्या  शिष्टमंडळाचे सातव्या भारत-जर्मनी आंतरसरकारी चर्चेमध्ये हार्दिक स्वागत.

महामहिम,

आपली  ही तिसरी भारतभेट आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळातील आयजीसीची ही पहिली बैठक आहे हे माझे भाग्य आहे.एका प्रकारे आपल्या मैत्रीचा हा तिहेरी आनंदोत्सव आहे.

महामहिम,

2022 मध्ये बर्लिन येथे झालेल्या गेल्या आंतरसरकारी चर्चेदरम्यान आपण द्विपक्षीय सहकार्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले.

गेल्या दोन वर्षात आपल्या धोरणात्मक भागीदारीच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्साहवर्धक प्रगती झाली आहे.संरक्षण, ऊर्जा आणि हरित आणि शाश्वत विकास यांसारख्या क्षेत्रातील वाढते सहकार्य परस्पर विश्वासाचे प्रतीक बनले आहे. 

महामहिम,

जगाची सध्या ताणतणाव, संघर्ष आणि अनिश्चिततेमधून वाटचाल सुरू आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात कायद्याचे राज्य आणि सागरी वाहतूक स्वातंत्र्य याबाबत देखील गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.अशा काळात भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारी एखादा  मजबूत नांगर म्हणून पुढे येऊ लागली  आहे.

हे परस्परांमधील व्यावहारिक संबंध नाहीत.

ती दोन समर्थ  आणि भक्कम लोकशाहींमधील परिवर्तनात्मक भागीदारी आहे, एक अशी भागीदारी जी जागतिक समुदाय आणि मानवतेकरिता एक स्थिर, सुरक्षित आणि शाश्वत भवितव्य निर्माण करण्यामध्ये योगदान देत आहे.  

या संदर्भात तुम्ही गेल्या आठवड्यात जारी केलेले  “फोकस ऑन इंडिया” हे धोरण स्वागतार्ह आहे.

महामहिम,

आपण, आपल्या भागीदारीचा विस्तार करण्यासाठी आणि ती नव्या उंचीवर नेण्यासाठी अनेक नवे आणि महत्त्वाचे उपक्रम हाती घेत आहोत याचा मला आनंद आहे. एक संपूर्ण सरकार या दृष्टीकोनापासून एक संपूर्ण देश या दृष्टीकोनाकडे आम्ही वाटचाल करत आहोत.

दोन्ही देशांचे उद्योग, नवोन्मेषकरर्ते आणि युवा प्रतिभा यांच्यासोबत जोडले जात आहेत. तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे वचनबद्ध आहोत. कृत्रिम प्रज्ञा, सेमीकंडक्टर्स आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये आमचे सहकार्य आणखी बळकट करणारा  नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचा आराखडा आज प्रसिद्ध केला जात आहे.

आताच आम्ही जर्मन व्यवसायांच्या आशिया-प्रशांत परिषदेत सहभागी झालो आणि लवकरच, आम्ही सीईओ फोरममध्ये देखील सहभागी होऊ. यामुळे आमचे सहकार्य आणखी बळकट होईल. आमच्या अर्थव्यवस्थांमध्ये विविधता आणण्याच्या आणि जोखीम कमी करण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती मिळेल, सुरक्षित, विश्वासार्ह आणि विश्वासार्ह पुरवठा मूल्य साखळी तयार करण्यात मदत होईल.

हवामानविषयक उपाययोजना करण्याच्या आमच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, आम्ही नवीकरणीय ऊर्जेमध्ये जागतिक गुंतवणुकीसाठी एक मंच तयार केला आहे. आज, हरित हायड्रोजन आराखडा देखील जारी करण्यात आला आहे.

भारत आणि जर्मनी दरम्यान शिक्षण, कौशल्य विकास आणि मोबिलिटी  मध्ये प्रगती होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. जर्मनीने जारी केलेल्या “स्किल्ड लेबर मोबिलिटी” धोरणाचे आम्ही स्वागत करतो. आजची बैठक आमची भागीदारी नव्या उंचीवर नेईल, असा मला विश्वास आहे.आता मला तुमचे विचार ऐकायला आवडतील.

त्यानंतर माझे सहकारी विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याला चालना देण्यासाठी उचललेल्या विविध पावलांबद्दल माहिती देतील.

पुन्हा एकदा मी आपले  आणि आपल्या  शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Inspiring India: Gujarat Woman's Solar Mission Earns PM Modi’s Praise, Invitation to I-Day Ceremony

Media Coverage

Inspiring India: Gujarat Woman's Solar Mission Earns PM Modi’s Praise, Invitation to I-Day Ceremony
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to address the 57th Convocation Ceremony of IIT Delhi on 8th August
August 07, 2026
PM to present Institute's Highest Honours to Meritorious Students
PM to inaugurate Param Pragya, an AI-powered high-performance supercomputing facility established at Sonipat Campus of IIT Delhi

Prime Minister Shri Narendra Modi will participate in the 57th Convocation Ceremony of the Indian Institute of Technology (IIT) Delhi as the Chief Guest on 8 August 2026 at 11 AM. He will address over 3000 graduating students including 587 Ph.D. scholars who will be conferred their degrees during the ceremony.

Recognizing outstanding academic excellence, Prime Minister will present the Institute's most prestigious honours, including the President's Gold Medal, Director's Gold Medal, Shankar Dayal Sharma Gold Medal, and Perfect Ten Gold Medals to the meritorious students.

Further emphasising India's commitment to advancing cutting-edge research and artificial intelligence, Prime Minister will inaugurate Param Pragya, an AI-powered high-performance supercomputing facility established at the Sonipat Campus of IIT Delhi. The state-of-the-art facility is expected to significantly enhance the institute's capabilities in AI, data science, advanced computing, and interdisciplinary research.