In India's Make in India mission, Sweden has been a strong partner since its inception: PM
Innovation, Investment, Start-ups, Manufacturing etc. are our main dimensions of partnership (with Sweden): PM Modi
Sweden has been India's partner for a long time in the defense sector: PM Modi
We have decided to strengthen our security cooperation, especially cyber security cooperation (with Sweden): PM Modi

महामहिम पंतप्रधान स्टीफन लोवेन ,

माध्यम प्रतिनिधींनो,

ही माझी स्वीडनची पहिलीच भेट. भारताच्या पंतप्रधानांची स्वीडन भेट जवळपास तीन दशकानंतर होत आहे. स्वीडनमध्ये माझ्या खूपच उल्हासाने करण्यात आलेल्या स्वागत आणि सन्मानासाठी मी पंतप्रधान स्टीफन लोवेन आणि स्वीडनच्या जनतेचे अंतःकरणातून आभार मानतो. माझ्या या भेटी दरम्यान लोवेन यांनी अन्य नॉर्डिक देशांसह भारताच्या परिषदेचे ही आयोजन केले आहे. यासाठीही मी पंतप्रधानांचे हृदयापासून स्वागत करतो.

भारताच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानात स्वीडन सुरवातीपासून मजबूत भागीदार राहिला आहे.

२०१६ ला मुंबईत आमच्या मेक इन इंडिया कार्यक्रमात लोवेन खूप मोठ्या संख्येने व्यापारी प्रतिनिधी मंडळासह सामील झाले होते. भारता बाहेरील देशांमध्ये घेण्यात येणारा प्रमुख कार्यक्रम, मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये स्वीडनमध्ये आयोजित करण्यात आला होता. ही आमच्यासाठी अतिशय हर्ष आणि गर्वाची बाब आहे की, दस्तुर खुद्द पंतप्रधान लोवेन आमच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. भारताचा विकास या बाबीतील चर्चेमध्ये स्वीडनचा कशाप्रकारे भारतासह विन-विन भागीद्वारे सहभाग राहील यावर जोर देण्यात आला. ह्या चर्चेचे निष्पन्न की, आज आम्ही नावीन्यतां भागीदारी आणि संयुक्त कृती आराखडा यावर सहमती दर्शविली आहे.

नाविन्यता, गुंतवणूक, स्टार्ट-अप, निर्मिती हे आमचे काही प्रमुख मुद्दे आहेत. यामध्ये नवीनतम ऊर्जा, शहरी दळणवळण, टाकाऊ पदार्थांची व्हिलेवाट यासारख्या अन्य विषयांवर सुद्धा लक्ष देण्यात आले आहे जे भारतासाठी दर्जेदार जीवनशैलीशी संबंधित विषय आहे. व्यापार आणि गुंतवणुकीशी संलग्न विषयांवर आज पंतप्रधान लोवेन आणि मी, स्वीडनच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांसह चर्चा करणार आहोत.

आमच्या द्विपक्षीय संबंधांचा एक मुख्य स्तंभ आहे आमची सुरक्षा आणि सहकार्य. रक्षा क्षेत्रात स्वीडन खूप वर्षां पासून भारताचा भागीदार आहे. आणि मला खात्री आहे कि भविष्यात या क्षेत्रात विशेष रूपात रक्षा उत्पादनात आमच्या सहयोगाची नवीन संधी निर्माण होतील.

आम्ही आमचा सुरक्षा सहयोग, विशेष रूप से सायबर सुरक्षा सहकारितेला मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. आणखीन एक गोष्ट, ज्या वर आम्ही सहमत आहोत, ती हि की, आमच्या संबंधांचे महत्व क्षेत्रीय व वैश्विक स्तरावर होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर आमचे खूप जवळचे सहकार्य आहे. आणि पुढे ही ते राहतील.

आज आम्ही यूरोप आणि आशिया खंडात होणाऱ्या विकासा संदर्भात विस्ताराने विचारांचे आदान प्रदान केले आहे. शेवटी पुन्हा एकदा पंतप्रधान लोवेन यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. !

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s industrial output growth hits over two-year high of 7.8% in December

Media Coverage

India’s industrial output growth hits over two-year high of 7.8% in December
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The Beating Retreat ceremony displays the strength of India’s rich military heritage: PM
January 29, 2026
Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasising on wisdom and honour in victory

The Prime Minister, Shri Narendra Modi, said that the Beating Retreat ceremony symbolizes the conclusion of the Republic Day celebrations, and displays the strength of India’s rich military heritage. "We are extremely proud of our armed forces who are dedicated to the defence of the country" Shri Modi added.

The Prime Minister, Shri Narendra Modi,also shared a Sanskrit Subhashitam emphasising on wisdom and honour as a warrior marches to victory.

"एको बहूनामसि मन्य ईडिता विशं विशं युद्धाय सं शिशाधि।

अकृत्तरुक्त्वया युजा वयं द्युमन्तं घोषं विजयाय कृण्मसि॥"

The Subhashitam conveys that, Oh, brave warrior! your anger should be guided by wisdom. You are a hero among the thousands. Teach your people to govern and to fight with honour. We want to cheer alongside you as we march to victory!

The Prime Minister wrote on X;

“आज शाम बीटिंग रिट्रीट का आयोजन होगा। यह गणतंत्र दिवस समारोहों के समापन का प्रतीक है। इसमें भारत की समृद्ध सैन्य विरासत की शक्ति दिखाई देगी। देश की रक्षा में समर्पित अपने सशस्त्र बलों पर हमें अत्यंत गर्व है।

एको बहूनामसि मन्य ईडिता विशं विशं युद्धाय सं शिशाधि।

अकृत्तरुक्त्वया युजा वयं द्युमन्तं घोषं विजयाय कृण्मसि॥"