बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात बेन्नीपट्टीजवळ 19 सप्टेंबर रोजी झालेल्या बस अपघातात तसेच पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील अत्तारी येथील मुहाबा गावाजवळ 20 सप्टेंबर रोजी झालेल्या बस अपघातातील मृत आणि जखमी व्यक्तींचे वृत्त ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून द्यायला त्यांनी मंजुरी दिली आहे.


