पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज संवाद झाला. भारतीय उत्पादनांवरील टॅरिफ अर्थात प्रशुल्क कमी करून 18% करण्याच्या घोषणेबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदी यांनी 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने आभार मानले.
जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठे लोकशाही देश एकत्र काम करतात, तेव्हा त्याचा आपल्या लोकांना फायदा होतो आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
“जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण असून शांततेसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर म्हटले आहे :
''आज माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून खूप आनंद झाला. 'मेड इन इंडिया' उत्पादनांवर टॅरिफ आता कमी होऊन 18% होणार आहे, याचा मला आनंद आहे. या शानदार घोषणेबद्दल भारताच्या1.4 अब्ज लोकांच्या वतीने मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठे लोकशाही देश एकत्र काम करतात, तेव्हा त्याचा आपल्या लोकांना फायदा होतो आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होतात
जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण असून शांततेसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा आहे.
आपली भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी त्यांच्यासोबत मिळून काम करण्यास मी उत्सुक आहे.''
@POTUS
@realDonaldTrump
Wonderful to speak with my dear friend President Trump today. Delighted that Made in India products will now have a reduced tariff of 18%. Big thanks to President Trump on behalf of the 1.4 billion people of India for this wonderful announcement.
— Narendra Modi (@narendramodi) February 2, 2026
When two large economies and the…


