पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिनलँड चे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधला.
दोन्ही नेत्यांनी यावेळी डिजिटलायझेशन, शाश्वतता आणि गतिशीलता यासह इतर क्षेत्रांमधील परस्पर सहकार्याचा आढावा घेतला. क्वांटम, 5 जी -6 जी, एआय आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांसह इतर क्षेत्रांमधील भागीदारी अधिक मजबूत आणि दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीसह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली. भारत-युरोपियन युनियनमधील जवळचे संबंध आणि परस्पर हिताच्या मुक्त व्यापार करारा (एफटीए) बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायला फिनलंडचा पाठिंबा असल्याचे फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष स्टब यांनी यावेळी सांगितले.
दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्यावर सहमती दर्शवली.
Had a fruitful conversation with President Alexander Stubb. Finland is an important partner country in the EU. We are committed to elevating our ties. Exchanged our perspectives on regional and global issues, including the situation in Ukraine.@alexstubb
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2025


