भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी नेत्यांनी केला वचनबद्धतेचा पुनरुच्चार
युक्रेनमधील संघर्ष शांततापूर्ण मार्गाने आणि लवकर सोडवण्यावर नेत्यांमध्ये चर्चा
भारत-ईयू मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्यास पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांचा पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, नवोन्मेष, ऊर्जा, जल व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया आणि शाश्वत विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या त्यांच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. 

युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद यशस्वीपणे पार पडावे यासाठी तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत डेन्मार्कचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे यासाठी पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या.

नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा केली. युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आणि शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्यासाठी भारताचा निरंतर पाठिंबा असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

परस्परांना फायदेशीर ठरणारा भारत-युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आणि 2026 मध्ये भारताने आयोजित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषदेच्या यशस्वितेसाठी डेन्मार्कचा भक्कम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनी केला.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature

Media Coverage

IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 जून 2026
June 18, 2026

PM Modi’s Leadership Delivers: Electronic Interlocking, Semiconductor Push & Tariff-Free UK Access