‘इंडिया-एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषद 26 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आलेले भूतानचे पंतप्रधान महामहिम त्शेरिंग तोबगे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.

या बैठकीदरम्यान, उभय  नेत्यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भूतानच्या अत्यंत यशस्वी दौऱ्यामुळे दोन्ही राष्‍ट्रांमध्‍ये झालेल्या सहकार्य उभारणीबरोबरच विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. पंतप्रधान तोबगे यांनी भूतानच्या 13 व्या पंचवार्षिक योजनेला तसेच ‘गेलेफू माइंडफुलनेस सिटी’ प्रकल्पाला भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. ऊर्जा, संपर्क यंत्रणा आणि विकास भागीदारी या प्राधान्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची दोन्ही पंतप्रधानांनी पुष्टी केली.

भारत आणि भूतान दोघांनीही विकास आणि समृद्धीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देत, अनुभव आणि कौशल्याची परस्पर देवाणघेवाण तसेच ‘एआय’ उपायांच्या संयुक्त विकासाद्वारे एआय आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यास पंतप्रधानांनी सहमती दर्शविली.

भारत आणि भूतानमध्ये विश्वास, सद्भावना आणि सामंजस्य यावर आधारित मैत्री आणि सहकार्याचे अद्वितीय संबंध आहेत. भूतानच्या पंतप्रधानांची ही भेट भारत आणि भूतानमधील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाणीच्या परंपरेला अनुसरून आहे.

‘एक्स’ या समाज माध्‍यमावरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये नरेंद्र  मोदी यांनी लिहिले:

"पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांच्याशी झालेली भेट उत्कृष्ट होती. वैश्विक कल्याणासाठी आणि शाश्वततेच्या तत्त्वांशी सुसंगत राहून आपण ‘एआय’ची शक्ती कशी वापरू शकतो यावर आम्ही चर्चा केली.

परस्पर विश्वास, सद्भावना आणि आपल्या दोन्ही देशातील  लोकांमध्ये असलेल्या  जवळच्या संबंधांवर आधारित आमची कायमस्वरूपी भारत-भूतान मैत्री, आपल्या भागीदारीला नवीन आणि परिवर्तनकारी क्षेत्रात मार्गदर्शन करत आहे.

@tsheringtobgay"

 

"བློན་ཆེན་ཚེ་རིང་སྟོབས་རྒྱས་དང་གཅིག་ཁར་ཕྱད་མི་འདི་ མཆོག་ཏུ་གྱུར་པ་ཅིག་ཨིན་མས། ང་བཅས་ཀྱིས་ ཡུན་བརྟན་གཞི་རྩ་དང་གཅིག་ཁར་ ཞི་བདེ་དང་ལྡནམ་སྦེ་ རྒྱལ་སྤྱིའི་ཁེ་ཕན་གྱི་དོན་ལུ་ བཅོས་རིག་གི་ནུས་པ་འདི་ ག་དེ་སྦེ་ལག་ལེན་འཐབ་ནི་ཨིན་ན་ གྲོས་བསྡུར་འབད་ཡི།

རྒྱ་གར་དང་འབྲུག་གི་བར་ན་ མཐུན་ལམ་ཡུན་བརྟན་སྦེ་གནས་མི་དང་ ཕན་ཚུན་གྱི་བློ་གཏད་དང་ མཐུན་ལམ་ལེགས་ཤོམ་ དེ་ལས་ མི་སེར་གཉིས་ཀྱི་བར་ན་ མཐུན་ལམ་དམ་ཟབ་སྦེ་ཡོད་མི་གིས་ ང་བཅས་རའི་མཉམ་འབྲེལ་འདི་ གནས་སྟངས་གསརཔ་ཅིག་ལུ་འགྱུར་ཚུགས་པའི་ལམ་སྟོན་འབད་དེ་ར་ཡོད།

@tsheringtobgay"

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre launches Bhavya scheme to set up 100 industrial parks across country

Media Coverage

Centre launches Bhavya scheme to set up 100 industrial parks across country
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 मे 2026
May 24, 2026

Strength, Growth & Global Trust: How PM Modi is Transforming India Across Frontiers