पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका सक्रिय सेनानी पासून संविधान सभेचे अध्यक्षस्थान भूषवण्यापर्यंत आणि देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांनी अद्वितीय प्रतिष्ठा, समर्पण आणि हेतूंमधील स्पष्टता या गुणांनी राष्ट्राची सेवा केली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. "सार्वजनिक जीवनातील त्यांचा दीर्घ प्रवास साधेपणा, धाडस आणि राष्ट्रीय एकतेप्रती असलेल्या श्रद्धेने परिपूर्ण आहे. त्यांची आदर्श सेवा आणि दूरदृष्टी पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत राहील." असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे :
"राजेंद्र प्रसाद जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सेनानी म्हणून कार्य करण्यापासून ते संविधान सभेचे अध्यक्षस्थान भूषवण्यापर्यंत आणि देशाचे पहिले राष्ट्रपती बनण्यापर्यंत, त्यांनी अद्वितीय प्रतिष्ठा, समर्पण आणि हेतूंमधील स्पष्टता यांसह राष्ट्राची सेवा केली. सार्वजनिक जीवनातील त्यांचा दीर्घ प्रवास साधेपणा, धाडस आणि राष्ट्रीय एकतेप्रती असलेल्या श्रद्धेने परिपूर्ण आहे. त्यांची आदर्श सेवा आणि दूरदृष्टी येणाऱ्या कित्येक पिढयांना प्रेरणा देत राहील."
Tributes to Dr. Rajendra Prasad Ji on his birth anniversary. From being an active participant in India’s freedom struggle, presiding over the Constituent Assembly to becoming our first President, he served our nation with unmatched dignity, dedication and clarity of purpose. His… pic.twitter.com/oeOdtiZOVP
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2025


