माझे बंधू दुबईचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक महामहिम शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांच्या निमंत्रणावरून मी १ डिसेंबर रोजी होणाऱ्या कॉप २८ जागतिक हवामान बदल कृती परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दुबईला जात आहे. हवामान बदल क्षेत्रात भारताचा निकटचा भागीदार असलेल्या दुबईच्या अध्यक्षतेखाली ही अतिशय महत्वाची परिषद होत असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.

भारताने सामाजिक आणि आर्थिक विकासाचा पाठपुरावा करताना नेहमीच आपल्या नागरी सभ्यतेच्या मूल्यांना अनुसरून हवामान बदल कृतींवर भर दिला आहे.

आमच्या जी ट्वेन्टी परिषदेच्या अध्यक्षतेच्या कालखंडात हवामानाला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले. सर्व प्रमुख नेत्यांच्या नवी दिल्ली घोषणपत्रामध्ये हवामान कृती आणि शाश्वत विकास या दोन्ही गोष्टींवर अनेक ठोस उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. या विषयांवर झालेल्या सहमतीला कॉप २८ परिषद अधिक जोमाने पुढे नेईल अशी मी अपेक्षा करतो.

पॅरिस करारानंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी कॉप २८ परिषदेत मिळेल तसेच हवामान बदल विषयक भविष्यकालीन रूपरेषा देखील स्पष्ट होईल. भारताने आयोजित केलेल्या  व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ परिषदेत, ग्लोबल साऊथने समानता,  न्याय आणि समान परंतु भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्त्वांवर आधारित हवामान कृतीची गरज तसेच अनुकूलनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. विकसनशील देशांच्या प्रयत्नांना पुरेशा हवामान निधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचा पाठिंबा असणे महत्वाचे आहे. शाश्वत विकास साधण्यासाठी त्यांच्याकडे न्याय्य कार्बन उत्सर्जनाचा अधिकार आणि विकासाकरता अनुकूल वातावरण असणे  आवश्यक आहे.

हवामान बदलाच्या क्षेत्रात भारताने बोलल्याप्रमाणे कृती केली आहे. नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता, वनीकरण, ऊर्जा संवर्धन, मिशन LiFE यांसारख्या विविध क्षेत्रातील आमची कामगिरी वसुंधरेसाठी आमच्या नागरिकांच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

मी हवामान निधी , ग्रीन क्रेडिट उपक्रम आणि लीड आयटी यासह विशेष कार्यक्रमांमध्ये सहभागीहोण्यास उत्सुक आहे

मी दुबई इथे उपस्थित असलेल्या इतर काही नेत्यांना भेटण्याची आणि जागतिक हवामान कृतीला गती देण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी संधीची वाट पाहत आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India to add 100 merchant ships to its fleet in 5 years: Sarbananda Sonowal

Media Coverage

India to add 100 merchant ships to its fleet in 5 years: Sarbananda Sonowal
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.