पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एटा (उत्तर प्रदेश) येथील पटना पक्षी अभयारण्य आणि कच्छ (गुजरात) येथील छारी-धंद यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचे स्वागत केले आहे. स्थानिक लोकसंख्या आणि पाणथळ जागांच्या संवर्धनाबद्दल आस्था असलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले की, या मान्यतांमुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि महत्त्वपूर्ण परिसंस्थांचे जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी होते.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी 'एक्स'वर पोस्ट केले:

"एटा (उत्तर प्रदेश) येथील पटना पक्षी अभयारण्य आणि कच्छ (गुजरात) येथील छरी-धंद यांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाल्याने आनंद झाला. तेथील स्थानिक लोकांना, तसेच पाणथळ जागांच्या संवर्धनाची आवड असलेल्या सर्वांचे अभिनंदन. ही मान्यता जैवविविधतेचे संरक्षण आणि महत्त्वाच्या परिसंस्थांचे रक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करते. ही पाणथळ जागा असंख्य स्थलांतरित आणि स्थानिक प्रजातींसाठी सुरक्षित अधिवास म्हणून सतत समृद्ध राहोत."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India Exports 3.15 lakh Tonnes Sugar in Oct-Feb of 2025-26 Marketing Year: AISTA

Media Coverage

India Exports 3.15 lakh Tonnes Sugar in Oct-Feb of 2025-26 Marketing Year: AISTA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 मार्च 2026
March 17, 2026

Resilient Bharat Rising: From Safe LPG Deliveries to UPI Dominance and Women's Empowerment Achievements Under PM Modi's Leadership