पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक इथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

हे स्मारक दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलिश लोकांप्रति कोल्हापूर संस्थानाने दाखवलेल्या औदार्याला समर्पित आहे. युद्धकाळात कोल्हापूर जवळच्या वालिवडे गावात उभारण्यात आलेल्या छावणीत  पोलिश लोकांना आश्रय देण्यात आला होता. या छावणीत महिला आणि लहान मुलांसह सुमारे 5,000 निर्वासितांची व्यवस्था करण्यात आली होती. स्मारकाच्या ठिकाणी पंतप्रधानांनी कोल्हापूर छावणीत राहिलेल्या पोलिश लोकांची आणि त्यांच्या वंशजांची भेट घेतली.

या स्मारकाला पंतप्रधानांनी दिलेली भेट भारत आणि पोलंड यांच्यातील एक विशेष ऐतिहासिक संबंध अधोरेखित करते आणि हे संबंध आणखी  बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
103 Cr Internet Connections, 66 Cr Daily UPI Transactions: PM Modi Highlights Digital India Impact At 11

Media Coverage

103 Cr Internet Connections, 66 Cr Daily UPI Transactions: PM Modi Highlights Digital India Impact At 11
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 1 जुलै 2026
July 01, 2026

PM Modi's Vision: Driving Digital Empowerment, Inclusive Development and India's Global Rise