सुमारे 11,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह विकसित करण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान उद्घाटन करणार
सुरळित वाहतुकीसाठी रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि प्रादेशिक वाहतूक प्रणालींशी जोडलेले बहुविध वाहतूक केंद्र म्हणून नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियोजन .
वार्षिक 2.5 लाख मेट्रिक टनांहून अधिक मालवाहतूक करता येईल तसेच ही क्षमता सुमारे 18 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवता येईल अशा पद्धतीने डिझाइन केलेल्या मल्टीमोडल कार्गो हबचा देखील विमानतळामध्ये समावेश.
विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळण्याची क्षमता (एमपीपीए) सुरुवातीच्या 12 दशलक्षवरून 70 दशलक्ष एमपीपीएपर्यंत वाढवणे शक्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मार्च 2026 रोजी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ते गौतम बुद्ध नगर, जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीला भेट देतील. त्यानंतर, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार असून यानिमित्त होणाऱ्या जाहीर सभेलाही ते संबोधित करतील.

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन भारताच्या जागतिक विमान वाहतूक केंद्र बनण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचे (एनसीआर) प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार ठरावे अशा कल्पनेतून उभारण्यात आलेले हे विमानतळ, देशाच्या विमानतळ पायाभूत सुविधांना बळकट करण्याच्या आणि प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय संपर्क सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. दिल्ली एनसीआर क्षेत्राकरिता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूरक असे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात आले आहे. ही दोन्ही विमानतळे मिळून एकात्मिक विमान वाहतूक प्रणालीसारखे काम करतील, यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासी क्षमतेत वाढ होईल, परिणामी दिल्ली एनसीआरला जागतिक स्तरावरील प्रमुख विमान वाहतूक केंद्र म्हणून स्थान मिळू शकेल.

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत अंदाजे एकूण ₹11,200 कोटींच्या गुंतवणुकीतून विकसित करण्यात आला आहे. या विमानतळाची सुरुवातीची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता (एमपीपीए) 12 दशलक्ष प्रवासी असेल, विमानतळाचे पूर्ण काम झाल्यानंतर ती 70 दशलक्ष एमपीपीएपर्यंत वाढवता येऊ शकेल. विमानतळावरची 3,900 मीटर लांबीची धावपट्टी मोठ्या आकाराच्या- जास्त रुंदीच्या विमानांना हाताळण्यास सक्षम आहे. तसेच, कार्यक्षम, सर्व-हवामानात आणि चोवीस तास विमानतळाचे परिचालन करण्यास सहाय्यक असणारी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (आयएलएस) आणि प्रगत एअरफिल्ड लायटिंगसह आधुनिक नेव्हिगेशन प्रणालीही येथे उपलब्ध आहे.

विमानतळावर एकात्मिक मालवाहतूक टर्मिनल आणि लॉजिस्टिक्स झोन अशा सुविधांनीयुक्त मल्टीमोडल मालवाहतूक केंद्रासह भक्कम मालवाहतूक परिसंस्थेचाही समावेश. या मालवाहतूक सुविधेद्वारे वार्षिक 2.5 लाख मेट्रिक टनांहून अधिक मालाची हाताळणी करता येईल अशा पद्धतीने तिची रचना करण्यात आली असून ती सुमारे 18 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवता येऊ शकेल त्याचबरोबर यामध्ये 40 एकर जागेवर देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) साठी उभारण्यात आलेल्या समर्पित सुविधेचाही समावेश आहे.

ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली आणि पर्यावरणदृष्ट्या जबाबदार पद्धतींचे एकत्रीकरण करून, निव्वळ-शून्य उत्सर्जन सुविधा म्हणून कार्यरत राहण्याचा उद्देश ठेवून पर्यावरणपूरक आणि भविष्यातही उपयुक्त ठरेल असा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची रचना करण्यात आहे. याची वास्तुरचना भारतीय परंपरेपासून प्रेरित असून त्यात पारंपरिक घाट आणि हवेलींची आठवण करून देतील अशा घटकांचा समावेश आहे, यामुळे सांस्कृतिक सौंदर्यशास्त्र आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा मेळ घातला गेला आहे.

यमुना द्रुतगती मार्गासारख्या मोक्याच्या ठिकाणाच्या जवळ असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी आणि मालवाहतुकीची तत्परतेने सोय सुनिश्चित होण्यासाठी रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि प्रादेशिक वाहतूक प्रणालींमध्ये अखंड एकीकरण साधणारे बहुविध वाहतूक केंद्र म्हणून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PMAY-U Nears 1.25 Crore Homes: Top 10 States With The Highest PMAY-U Completion Rates

Media Coverage

PMAY-U Nears 1.25 Crore Homes: Top 10 States With The Highest PMAY-U Completion Rates
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 जून 2026
June 24, 2026

Appreciation for PM Modi’s Vision for Holistic Growth, Furthering Technology as well as Traditions