गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी 14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान करणार प्रारंभ
अजमेरमध्ये 16,680 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन आणि पायाभरणी
नगरविकास, पिण्याचे पाणी, रस्ते, सिंचन, ऊर्जा आणि औद्योगिक पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमधील प्रकल्पांचा समावेश
राजस्थानमधील विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 21,800 पेक्षा जास्त युवकांना पंतप्रधान नियुक्ती पत्र प्रदान करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील अजमेरला भेट देणार आहेत. 28 फेब्रुवारी सकाळी साधारण 11:30 वाजता पंतप्रधानाच्या हस्ते 16,680 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या  विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ , उद्घाटन आणि पायाभरणी होईल. या निमित्ताने ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये नगरविकास, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते, सिंचन, ऊर्जा आणि औद्योगिक पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.

या भेटीत पंतप्रधान 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचाही प्रारंभ करणार आहेत. हा उपक्रम प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला बळकटी देण्याबरोबरच  महिलांच्या कल्याणाच्या दिशेने उचललेले एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा (Cervical Cancer) प्रतिबंध करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा कर्करोग  महिलांमधील कर्करोगाशी संबंधित आजारपणाच्या प्रमुख कारणांपैकी आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण विषयक हा उपक्रम देशभरातील मुली आणि महिलांच्या दीर्घकालीन आरोग्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

आपल्या या भेटीत पंतप्रधान रस्ते जोडणीलाही मोठी चालना देणार आहेत. त्याअनुषंगानेच पंतप्रधानाच्या हस्ते अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. याअंतर्गत  बांदीकुई ते जयपूर हा 4-पदरी हरीतक्षेत्र द्रुतगती महामार्ग, अमृतसर-जामनगर आर्थिक कॉरिडॉरच्या पॅकेज 7 अंतर्गत 6-पदरी प्रवेश नियंत्रित हरीत महामार्ग  आणि दिल्ली-वडोदरा प्रवेश नियंत्रित हरीत द्रूतगती महामार्गाच्या पॅकेज 14 अंतर्गत 8-पदरी कॅरेज-वे यांसह इतर प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच ते जोधपूर शहरातील 4-पदरी उन्नत रस्ता (Elevated Road) आणि बारान जिल्ह्यातील मलबमोरी-मांगरोल-बारान राज्य महामार्गाची  पायाभरणीही करतील.

सर्वांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल याची सुनिश्चिती करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. याच अनुषंगाने पंतप्रधानांच्या हस्ते नोनेरा  इथल्या मुख्य पेयजल प्रकल्पाच्या 4 पॅकेजची आणि परवान आकावद मुख्य पेयजल प्रकल्पाच्या 5 पॅकेजची पायाभरणीही होणार आहे.

राजस्थानमधील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांतून पारेषण प्रणालीचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा विषयक पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या उद्देशाने,तसेच राजस्थानमधील निर्मिती केंद्रांमधून अविरतपणे सुरळीत वीज पुरवठा होत राहील याची सुनिश्चिती करण्याकरता ही व्यवस्था उभारण्यात आली आहे. यासोबतच ते 220 किलोव्होल्ट क्षमतेच्या पाच ग्रीड सबस्टेशन (वीज पुरवठा व्यवस्था उपकेंद्र) आणि 400 किलोव्होल्ट क्षमतेच्या दोन ग्रीड सबस्टेशनसह संबंधित पारेषण वाहिन्यांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

रोजगार निर्मिती आणि युवा वर्गाच्या सक्षमीकरणाबदलची आपली वचनबद्धता पूर्ण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान राजस्थानमधील विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या सुमारे 21,800 पेक्षा जास्त युवकांना  नियुक्ती पत्रही प्रदान करणार आहेत.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total

Media Coverage

Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 ऑगस्ट 2026
August 28, 2026

India’s Growth Story, Grounded: Inclusion, Exports, and Infrastructure Under One Vision of PM Modi