पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करतील. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान बिहारमधील 75 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये थेट हस्तांतरित करतील, अशा प्रकारे एकूण 7,500 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
बिहार सरकारचा हा उपक्रम महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींद्वारे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आर्थिक मदत दिली जाईल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीचे रोजगार किंवा उपजीविकेचे उपक्रम सुरू करता येतील, ज्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळेल.
या योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थीला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सुरुवातीला 10,000 रुपयांचे अनुदान मिळेल, त्यानंतरच्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. शेती, पशुपालन, हस्तकला, शिवणकाम, विणकाम आणि इतर लघु उद्योग अशाप्रकारे लाभार्थी आपापल्या पसंतीच्या क्षेत्रातील उपजीविकेसाठी हे अनुदान वापरु शकतील.
ही योजना समुदाय-केंद्रित असेल ज्यामध्ये, आर्थिक पाठिंब्यासह, बचत गटांशी जोडलेली समुदायातील तज्ञ व्यक्ती त्यांच्या प्रयत्नांना सहाय्य करत प्रशिक्षणही देतील. त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीला पाठिंबा देण्यासाठी, राज्यात ग्रामीण हाट-बाजार अधिक विकसित केले जातील.
मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ राज्यातील जिल्हा, तालुका, केंद्र आणि गाव अशा विविध प्रशासकीय स्तरांवर हा राज्यव्यापी उपक्रम साजरा करण्यात घेण्यात येईल.सुमारे 1 कोटीहून अधिक महिला या कार्यक्रमाच्या साक्षीदार असतील.


