पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा- 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या  भारतीय पथकाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधतील.  या संवादाला सर्व खेळाडू तसेच त्यांचे प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानांचा हा संवाद म्हणजे प्रमुख क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याआधी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.  गेल्या वर्षी, पंतप्रधानांनी टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी सज्ज  असलेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी तसेच टोकियो 2020 पॅरालिम्पिक खेळांसाठी भारतीय पॅरा-एथलीट्सच्या पथकाशी संवाद साधला होता.

या क्रीडा स्पर्धा सुरू असतांना देखील पंतप्रधान खेळाडूंची  प्रगती जाणून  घेतात.  अनेकदा  त्यांनी वैयक्तिकरित्या खेळाडूंना त्यांच्या यशाबद्दल आणि प्रामाणिक प्रयत्नांबद्दल अभिनंदन करण्यासाठी स्वतःहून दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित  केले.  शिवाय खेळाडूंचे  पथक  देशात परतल्यानंतर पंतप्रधान त्यांची भेट घेतात आणि संवाद साधतात.

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2022 बर्मिंगहॅम येथे 28 जुलै ते 08 ऑगस्ट 2022 यादरम्यान होणार आहे. एकूण 215 क्रीडापटू, 19 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या 141 स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले:

"ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनातील सर्व सहभागींचे भावपूर्ण स्मरण. त्यांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन दिलेला 'भारत छोडो'चा एल्गार आपल्या स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा भरून गेला आणि वसाहतवादी शासनातून मुक्त होण्याच्या आपल्या लोकांच्या अढळ निश्चयाचे त्याने प्रतीक बनले."