देशाचा कोणताही भाग विकासाच्या मार्गापासून वंचित राहणार नाही हे सुनिश्चित करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेच्या मार्गदर्शनाअंतर्गत हा उपक्रम
या संवादाचा उद्देश मिशन मोडमध्ये जिल्हा स्तरावर शेवटच्या घटकापर्यंत विविध योजना पोहचवणे हा आहे


पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यातील सरकारी योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची प्रगती आणि सद्यस्थिती याबाबत पंतप्रधान थेट अभिप्राय जाणून घेतील. या संवादामुळे कामगिरीचा आढावा आणि उदभवणाऱ्या आव्हानांचे मूल्यमापन करण्यात मदत होईल.

जिल्ह्य़ातील विविध विभागांद्वारे मिशन मोडमध्ये, सर्व संबंधितांच्या समन्वयाने विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सरकारने देशभरात वाढ करण्यासाठी आणि विकासातील विषमता दूर करण्यासाठी सातत्याने अनेक पावले उचलली आहेत. सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सर्वांसाठी सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेशी अनुरूप हा संवाद आहे

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s continuing tradition of celebrating its teachers

Media Coverage

India’s continuing tradition of celebrating its teachers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा
September 05, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 27 सप्टेंबर रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही नाविन्यपूर्ण सूचना आणि विचार असतील तर ते प्रत्यक्ष पंतप्रधानांशी शेअर करण्याची आपल्यासाठी संधी आहे. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

आपली मते खाली दिलेल्या कमेंट्स विभागांत लिहा.