विजयादशमीच्या पवित्र उत्सवाचे औचित्य साधत, उद्या म्हणजेच, 15 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12:10 वाजता, संरक्षण मंत्रालयाच्या विशेष कार्यक्रमात सात संरक्षण कंपन्यांचे राष्ट्रार्पण केले जाणार आहे. विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री आणि संरक्षण उद्योगांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

सात नव्या संरक्षण कंपन्यांविषयी माहिती:-

केंद्र सरकारने आयुध निर्माणी मंडळाचे,100 टक्के सरकारी मालकीच्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रुपांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आपली संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी, देशाला संरक्षण उत्पादन क्षेत्रात, आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रातील कार्यान्वयन स्वायत्तता वाढवली जाईल, कार्यक्षमताही वाढेल आणि विकास तसेच नवोन्मेषाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. 

ज्या सात संरक्षण कंपन्यांचे कोर्पोरेटीकरण केले जाणार आहे, त्यांची नावे- म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL),आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVANI), ॲडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (AWE India); ट्रूप कम्फर्ट लिमिटेड (TCL); यंत्र इंडिया लिमिटेड (YIL); इंडिया ओप्टेल लिमिटेड (IOL); आणि ग्लाईडर्स इंडिया लिमिटेड (GIL) अशी आहेत.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Can we have a picture? BRICS delegates gather around PM Modi for candid photo op

Media Coverage

Can we have a picture? BRICS delegates gather around PM Modi for candid photo op
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 सप्टेंबर 2026
September 12, 2026

President Putin, Partners, and a Photograph: How PM Modi Turned BRICS Into India’s Showcase

16 Crore Domestic Flyers. ₹22 Lakh Crore Tourism. The Holiday Stayed Home.